Eknath Shinde : दसरा मेळाव्यापूर्वी मुख्यमंत्र्यानी केली मोठी घोषणा

गेल्या अनेक दिवसांपासून शिवसेनाचा ठाकरे गट विरुद्ध शिंदे गट असे वाद होताना दिसत आहेत. शिवसेना पक्ष कोणाचा यावरून देखील मोठे वाद सुरु आहेत आणि अशातच आता हे दोन्ही गट दसरा मेळावा देखील करणार आहे.

Eknath Shinde : दसरा मेळाव्यापूर्वी मुख्यमंत्र्यानी केली मोठी घोषणा

गेल्या अनेक दिवसांपासून शिवसेनाचा ठाकरे गट विरुद्ध शिंदे गट असे वाद होताना दिसत आहेत. शिवसेना पक्ष कोणाचा यावरून देखील मोठे वाद सुरु आहेत आणि अशातच आता हे दोन्ही गट दसरा मेळावा देखील करणार आहे. दसरा मेळाव्यासाठी अवघ्या दोन दिवस राहिलेले आहेत. अश्यातच राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी एक मोठी घोषणा केली आहे. त्यांच्या या घोषणेनंतर शिंदे हे खरोखरीच बाळासाहेब ठाकरेंच्या विचारांवर चालणारे सरकार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाने राज्यात ७०० दवाखाने सुरू करण्यात येणार असून, ‘बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना’ या नावाने हे दवाखाने सुरू करण्यात येणार आहेत. दसरा मेळाव्यापूर्वीच शिंदे यांनी ही घोषणा केल्याने त्याला अधिक महत्त्व आले आहे. राज्यात सुमारे ७०० ठिकाणी ‘बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना’ सुरू करण्यात येणार असून, मुंबईत २२७ ठिकाणी हे दवाखाने सुरू करण्यात येणार आहेत. त्यापैकी ५० दवाखाने २ ऑक्टोबरपासून सुरू झाल्याचेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले आहे. याशिवाय राज्यात कॅथलॅबदेखील सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ज्या भागातील आरोग्य संस्थांचे काम ८० ते ९० टक्के पूर्ण झाले आहे तेथे निधी उपलब्ध करून ते काम शंभर टक्के पूर्ण करण्यासाठी आणि नागरिकांना आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी प्राधान्य दिले जात आहे.

ग्रामीण भागातील आरोग्याच्या क्षेत्रात आशा स्वयंसेविकांचे योगदान महत्वाचे आहे. कोरोना काळातही त्यांनी उल्लेखनीय काम केले आहे. त्यांना अधिक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी राज्य शासन प्रयत्न करेल, असेही मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले. वैद्यकीय महाविद्यालयांच्या माध्यमातून पुरेशा प्रमाणात डॉक्टर, नर्स यांची उपलब्धता होईल. वैद्यकीय महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना ग्रामीण भागात काम करण्यासाठी प्रोत्साहन दिले जाईल, असेही त्यांनी सांगितले.

हे ही वाचा:

Navaratri 2022 : अवयवदानाची जनजागृती करत ताडदेवच्या अंबेमातेने दिला भक्तांना आशीर्वाद

गोव्यातून विना परवाना एक बाटली दारु आणली तरी थेट मोक्का – शंभूराज देसाई

Bigg Boss Marathi 4 : ‘ऑल इज वेल’ म्हणत ‘बिग बॉस’चं दार उघडलं

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version