8 वाजताचा ‘भोंगा’ आता बंद, मुख्यमंत्र्यांचा राऊतांना टोला

राऊत यांच्या भांडुप येथील निवासस्थानी ईडीने छापे घालून सुमारे साडेअकरा लाखांची रोख रक्कम जप्त केली आहे.

मुख्यमंत्र्यांचा राऊतांना टोला

मुंबई : गोरेगाव इथल्या पत्राचाळ पुनर्विकास प्रकल्पातल्या आर्थिक घोट्याळ्या प्रकरणी शिवसेना खासदार संजय राऊत यांना ईडीने काल मध्यरात्री उशिरा अटक केले. राऊत यांच्या भांडुप येथील निवासस्थानी ईडीने छापे घालून सुमारे साडेअकरा लाखांची रोख रक्कम जप्त केली आहे. सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात संजय राऊतांची चर्चा होत आहे. भाजपने राऊतांना टीकेचे केंद्रबिंदू केले आहे. अशातच राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ‘सकाळचा भोंगा आता बंद’ असा म्हणत राऊतांवर निशाणा साधला आहे.

औरंगाबादमध्ये माध्यमांशी संवाद साधताना मुख्यमंत्री शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली, “तो 8 वाजताचा भोंगा आता बंद झाला आहे. ज्यांनी ज्यांनी आम्हाला त्रास दिला, ते आपापल्या कर्माने जातील”, अशी खोचक टीका शिंदे यांनी राऊतांवर केली.

राऊतांच्या अटकेवर उद्धव ठाकरेंचा संताप म्हणाले…

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी महाराष्ट्राचा अवमान केला आणि लगेच दुसऱ्या दिवशी संजय राऊत यांच्या घरी ‘ईडी’चे पाहुणे दाखल झाले. हे काय चालले आहे? असा प्रश्न उपस्थित करत ठाकरे पुढे म्हणाले, हे सगळे कारस्थान इतक्या निर्लज्जपणाने चालले आहे की, लाज-लज्जा सोडून देशात दडपशाही सुरू आहे, अशी संतापजनक प्रतिक्रिया उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केली.

हेही वाचा : 

सत्ताकारण विनोदी पद्धतीने मांडणारी वेब सीरिज ‘मी पुन्हा येईन’ झाली प्रदर्शित

Exit mobile version