spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि राज ठाकरे पुन्हा एकदा एकाच मंचावर येणार

काही दिवसांपासून एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि राज ठाकरे एकाच मंचावर अनेक वेळा आले आहेत. कधी कुठल्या कार्यक्रमासाठी तर कधी गणपतीच्या दर्शनासाठी एकत्रित आले आहेत. आज राज ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांची भेट झाली ती महेश मांजरेकरांच्या वेडात मराठे वीर दौडले सात या चित्रपटाच्या मुहूर्त सोहळ्यानिमित्त. आता पुन्हा एकदा राज ठाकरे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे एका कार्यक्रमात एकत्र दिसणार आहेत.

आज प्रशांत दामले यांच्या साडेबारा हजाराव्या प्रयोगाला तिघे एकत्र येणार आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमवेत मनसे अध्यक्ष राज ठाकरेही उपस्थित राहणार आहेत. शिवाजी पार्कवरील दीपोत्सवानंतर आज तिन्ही नेते पुन्हा एकत्र येणार आहेत. या सतत होणाऱ्या भेटींमागे आगामी काळातील युतीची नांदी तर नाही ना अशी चर्चाही आता रंगू लागली आहे.

राज ठाकरे यांची परप्रांतीयांबाबत असलेली भूमिका भाजप मनसे युतीसाठी मारक आहे असं वारंवार भाजपच्या नेत्यांकडून ऐकायला मिळालं होतं. मात्र सध्या भाजपसोबत असणारा शिंदे गट मात्र मनसे युतीसाठी पुरक असल्याची चर्चा भाजपच्या गोटात आहे. त्यामुळे शिंदे- ठाकरे युती झाल्यास याचा थेट फायदा भाजपला होण्याची शक्यता आहे. याचा प्रत्यय देखील दीपोत्सवाच्या निमित्ताने तिन्ही पक्षाच्या नेत्यांनी एकत्र येऊन महाराष्ट्राला दिला आहे. सध्याची राजकीय परिस्थिती पाहता महाविकास आघाडीविरोधात दुसऱ्या बाजूने मजबूत आघाडी देणं गरजेचं आहे. फक्त भाजप आणि शिंदे हे महाविकास आघाडी किंवा मुंबईत शिवसेनेचा पराभव करु शकत नाहीत. त्यामुळे मनसेला सोबत घेणं ही काळाची गरज असल्याचे भाजप आणि शिंदे गटाने मनाशी पक्के केले आहे.

हे ही वाचा :

‘महाराष्ट्रतील सरकार हे शेतकरी विरोधी आहे’; नाना पाटोलेंचा सरकारवर हल्लाबोल

Andheri By Poll Result 2022 : अंधेरी पोटनिवडणुकीच्या निकालानंतर ऋतुजा लटकेंची पहिली प्रतिक्रिया; हा माझ्या पतीचा विजय

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss