संजय राऊत यांना मिळालेल्या धमकी पत्राचा आम्ही…. एकनाथ शिंदे यांनी दिले आश्वासन

संजय राऊत यांनी मंगळवारी २१ फेब्रुवारी रोजी महाराष्ट्राचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना पत्र लिहिले या पत्रात संजय राऊत यांच्या जीवाला धोका आहे असे त्यांनी नमूद केले आहे.

संजय राऊत यांना मिळालेल्या धमकी पत्राचा आम्ही…. एकनाथ शिंदे यांनी दिले आश्वासन

संजय राऊत यांनी मंगळवारी २१ फेब्रुवारी रोजी महाराष्ट्राचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना पत्र लिहिले या पत्रात संजय राऊत यांच्या जीवाला धोका आहे असे त्यांनी नमूद केले आहे. श्रीकांत शिंदे (Shrikant Shinde) यांनी संजय राऊत यांना मारण्यासाठी सुपारी दिली आहे असा आरोप संजय राऊत यांनी या पत्रात केला होता. यावर प्रतिक्रिया देत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, ‘संजय राऊत यांना मिळालेल्या जीवे मारण्याच्या धमकी प्रकरणाचा तपास केला जाईल. या प्रकरणी जोकोणी दोषी असेल त्याच्याविरोधात कारवाई केली जाईल’. ‘आमच्याकडे असलेली पोलिसांची एक समिती ,जी सुरक्षेचा आढावा घेते आणि ज्यांना जशी सुरक्षा गरजेची आहे, तशी सुरक्षा दिली जाईल. ‘परंतु जर कोणी स्टंटबाजीसाठी असे आरोप करत असेल तर त्याच्याविरोधातही कारवाई केली जाईल,’ असा इशाराही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राऊतांना दिला.

संजय राऊत यांनी लिहिलेल्या पत्रात त्यांनी म्हंटले आहे कि, माझ्या जीवाला धोका आहे. मला जीवे मारण्यासाठी खासदार श्रीकांत शिंदे यांनी ठाण्यातील गुन्हेगार राजा ठाकूरला (Raja Thakur) सुपारी दिली आहे.तसेच राऊत यांनी पेटंट पुढे म्हटले आहे कि, ‘राज्यातील सत्ताबदल झाल्यानंतर माझी सुरक्षाही काढण्यात आली. याबाबत माझी कोणतीही तक्रार नाही. हे राजकीय निर्णय होत असतात. राज्यातील सध्याची परिस्थिती पाहता तुमच्यापर्यंत ही बाब पोहोचवणं मला गरजेचं होतं. मला कोणतीही सुरक्षा नको, कारण मी एकटा वाघ आहे.’

उद्धव ठाकरे गटाचे नेते आणि खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांना मिळालेल्या धमकी प्रकरणाचा तपास करुन जो कोणी दोषी असेल त्यावर कडक कारवाई केली जाईल, असे आश्वासन महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी दिलं.या प्रकरणाचा तपास सुररू आहे. यामागे कोणाचा हात आहे याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

हे ही वाचा :

प्रेम व्यक्त करणं होणार आता आणखी सोप्पं! नवीन रोमँटिक गाणं ‘सपान’ आलंय प्रेक्षकांच्या भेटीला!

दीपक केसरकरांचा उद्धव ठाकरेंना इशारा, शिवसैनिकांचा पैसा त्यांना मिळाला पाहिजे…

एकनाथ शिंदे यांना शिवसेनेचे पक्षप्रमुखपद मिळणार का, काय असणार बैठकीनंतरचा निर्णय

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version