एकनाथ शिंदे जे बोलतो तेच करून दाखवतो, एकनाथ शिंदे कसबा निवडणुकीच्या प्रचारामध्ये म्हणाले

कसबा निवडणूक प्रचाराचा (Kasbah preparation campaign) आज शेवटचा दिवस होता आणि या शेवटच्या दिवशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Chief Minister Eknath Shinde) यांनी हजेरी लावली होती.

एकनाथ शिंदे जे बोलतो तेच करून दाखवतो, एकनाथ शिंदे कसबा निवडणुकीच्या प्रचारामध्ये म्हणाले

कसबा निवडणूक प्रचाराचा (Kasbah preparation campaign) आज शेवटचा दिवस होता आणि या शेवटच्या दिवशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Chief Minister Eknath Shinde) यांनी हजेरी लावली होती. कसबा मतदारसंघ हा भाजपचा बालेकिल्ला आहे. विश्वास काय असतो ते मुक्ताताई टिळक (Muktatai Tilak) आणि गिरीश बापट (Girish Bapat) यांनी दाखवून दिले आहे. गिरीश बापट हे आजारी आहेत आणि त्यामुळे आम्ही त्यांना प्रचारामध्ये येऊ नका असे सांगितले होते परंतु त्यांनी काही ऐकले नाही गिरीश बापट हे प्रचारामध्ये येऊन त्यांनी हेमंत रासणे याना आधार दिला. मुंबईमध्ये भरलेला उमेदवाराचा फॉर्म माघारी घेतला आहे असे एकनाथ शिंदे म्हणाले. परंतु इथे असे घडले नाही कारण विरोधकांकडून गलिच्छ राजकारण सुरु आहे. आमची इच्छा होती कि कसब्याची निवडणूक बिनविरोध व्हावी पण मावियाने तसे होऊ दिले नाही. असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले

कसब्यामध्ये भाजपचे उमेदवार हेमंत रासणे (Hemant Rasane) यांच्या प्रचारासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रॉड शो केला त्यावेळी ते बोलत होते. पुढे बोलताना एकनाथ शिंदे म्हणाले आम्ही लोकांना सामोरे जाणारे आहोत. एमपीएससीच्या (MPSC) विद्यार्थ्यांना जे यश मिळाले आहे त्याचे श्रेय आम्हाला अजिबात घ्यायचे नाही. जी विद्यार्थ्यांची भूमिका आहे तीच आमची भूमिका असणार आहे. एकनाथ शिंदे जे बोलतो तेच करून दाखवतो. एमपीएससीच्या प्रश्नावर उपाय काढणार हा शब्द दिला होता आणि तो शब्द आम्ही पूर्ण केला. जेव्हा मी माध्यमाशी बोलत होतो तेव्हा माझ्या तोंडून चुकून लोकसेवा आयोगाऐवजी निवडणूक आयोग हा शब्द निघाला कोणताही आयोग असू द्या निकाल महत्वाचा आहे. निकाल देण्याचे काम मी आणि देवेंद्र फडणवीस यांनी करून दाखवले आहे असे एकनाथ शिंदे म्हणाले.

पुण्यामध्ये कसबा विधानसभा मतदारसंघामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वतीने रोड शो काढण्यात आला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत भाजपचे उमेदवार हेमंत रासणे आणि सर पदाधिकारी सहभागी झाले होते. आज प्रचाराचा शेवटचा दिवस असल्यामुळे भाजप आणि महाविकास आघाडीकडून जोरदार प्रचार करण्यात आला होता. कसबा विधानसभा पोटनिवडणुकीत भाजप, शिवसेना आणि मित्रपक्षांनी संपूर्ण ताकत शेवटच्या दिवशी झोकून दिल्याचे दिसत आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यासह केंद्रीय मंत्री रामदास आठवले हे प्रचारात सहभागी झाले आहेत.

हे ही वाचा : 

भारतामधील प्रसिद्ध दिगर्शक संजय लीला भन्साळी यांचे काही हिट चित्रपट

ICC T20, महिला विश्वचषकामध्ये भारताचा सेमी फायनलमध्ये संपला प्रवास

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version