spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

एकनाथ शिंदे करतायत डबल ड्युटी

मुख्यमंत्री रजेवर असल्याच्या चर्चेवरून ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे याना टोला लगावला होता. “मुख्यमंत्री तीन दिवस रजेवर असल्याचं सांगण्यात येत आहे. त्यांच्या गावात महापुजेचं आयोजन करण्यात आल्याची माहिती मला मिळाली आहे.

मुख्यमंत्री रजेवर असल्याच्या चर्चेवरून ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे याना टोला लगावला होता. “मुख्यमंत्री तीन दिवस रजेवर असल्याचं सांगण्यात येत आहे. त्यांच्या गावात महापुजेचं आयोजन करण्यात आल्याची माहिती मला मिळाली आहे. असे वक्तव्य सुषमा अंधारे यांनी केले होते. माणूस संकट काळात पुजा अर्चना करत असतो. आता त्यांच्यासाठी जरा संकटाचा काळ सुरु होणार आहे.आणि म्हणूनच त्यांनी शिर्डी आणि कामाख्याला जाऊनही पुजा केली होती”, असे त्या म्हणाल्या. आणि आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तीन दिवस रजेवर असल्याची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली होती. यावरून महाविकास आघाडीनेही मुख्यमंत्री शिंदे यांना लक्ष्य केलं होतं. दरम्यान, याबाबत आता स्वत: मुख्यमंत्र्यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. मी सुट्टीवर नसून डबल ड्युटीवर आहे, असे एकनाथ शिंदे म्हणाले. तसेच विरोधकांच्या आरोपांनाही एकनाथ शिंदे यांनी प्रतिउत्तर दिलं.

साताऱ्यात पत्रकारांशी बोलताना याबाबत माध्यम प्रतिनिधींकडून विचारणा केली असता “मी आता सातारा दौऱ्यावर आहे. इथे येऊन मी तापोळ्यातील पुलाची पाहणी केली आणि तापोळा महाबळेश्वर रस्त्याचे भूमिपूजनही केले. तसेच महाबळेश्वर येथील पर्यटनांच्या दृष्टीनेही आढावा बैठकही घेतलीमी सुट्टीवर नसून डबल ड्युटीवर आहे असे खणखणीत बोल एकनाथ शिंदे यांनी विरोधकांना सुनावले आहे. तसेच विरोधक माझ्यावर आरोप करतात कारण त्यांच्याकडे काहीही कामं शिल्कल उरलेले नाही. त्यांना आरोप केल्याशिवाय दुसरं कोणतंही काम नाही. आम्ही त्यांना घरी बसवलं आहे. त्यामुळे ते आरोप करतीलच. मात्र, आम्ही त्यांना आरोपाचं उत्तर आरोपाने नाही, तर कामाने देऊ”, असे ते म्हणाले. तसेच “मी साताऱ्यात येऊन आराम केलेला नाही. साताऱ्यात आल्यानंतर अनेक जण भेटायला आले. येथील जनतेचे प्रश्न सोडवण्यावर माझा भर आहे. त्यासाठी सातत्याने बैठका होत आहेत”, असंही त्यांनी नमूद केलं.

हे ही वाचा : 

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ३ दिवसांच्या रजेवर? गेले की पाठवले? चर्चाना उदान

पर्यावरण संवर्धनाच्या कामात नागरिकांचा सहभाग महत्वाचा, TMC च्या वतीने वसुंधरा दिन साजरा

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

Latest Posts

Don't Miss