एकनाथ शिंदे गटाकडून निवडणूक आयोगला ‘या’ ३ नव्या चिन्हांचा प्रस्ताव

केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेनेचे धनुष्यबाण हे निवडणूक चिन्ह गोठवल्यानंतर दोन्ही गटाकडून चिन्हे सादर करण्यात आली होती. निवडणूक आयोगाने शिंदे गटाची चिन्हे नाकारल्यानंतर शिंदे गटाकडून पुन्हा तीन चिन्हे निवडणूक आयोगाकडे सादर करण्यात आली आहेत.

एकनाथ शिंदे गटाकडून निवडणूक आयोगला ‘या’ ३ नव्या चिन्हांचा प्रस्ताव

केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेनेचे धनुष्यबाण हे निवडणूक चिन्ह गोठवल्यानंतर दोन्ही गटाकडून चिन्हे सादर करण्यात आली होती. निवडणूक आयोगाने शिंदे गटाची चिन्हे नाकारल्यानंतर शिंदे गटाकडून पुन्हा तीन चिन्हे निवडणूक आयोगाकडे सादर करण्यात आली आहेत. इमेल करून हे तीन पर्याय सादर करण्यात आली आहेत. तळपता सूर्य, ढाल तलवार आणि पिंपळाचे झाड हे तीन पर्याय शिंदे गटाकडून देण्यात आली आहेत.

दरम्यान, शिंदे गटाकडून रिक्षा हे चिन्ह सादर करण्यात येणार असल्याची चर्चा होती. दुसरे चिन्ह तुतारी फुंकणारा व्यक्ती आणि तिसरे चिन्ह शंख अशी चर्चा सध्या होत होती पण शिंदे गटाकडून तळपता सूर्य, ढाल तलवार आणि पिंपळाचे झाड हे तीन चिन्ह सादर करण्यात आली आहेत.

उद्धव ठाकरे गटाला ‘शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे’ हे नाव तर ‘मशाल’ हे चिन्ह मिळालं आहे. तर शिंदे गटाला ‘बाळासाहेबांची शिवसेना’ हे नाव मिळालं आहे. उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे या दोन्ही गटांच्य वतीनं आज निवडणूक आयोगामध्ये चिन्ह आणि नावासाठी कागदपत्र जमा केली होती. त्यावर निवडणूक आयोगाने हा निर्णय घेतला आहे. तर शिंदे गटाने उगवता सूर्य, त्रिशूळ आणि गदा या चिन्हांचा पर्याय देण्यात आला होता. पहिल्या दोन चिन्हांबाबत निवडणूक आयोगाने आधीच भूमिका स्पष्ट केली. तर गदा हे चिन्ह धार्मिक चिन्ह असल्याने ते देता येणार नाही असं सांगत शिंदे गटाने तीन नव्या चिन्हांचा पर्याय द्यावा असं सांगितलं आहे. अखेर शिंदे गटाने ३ नवीन चिन्हे निवडणूक आयोगाला ई – मेल केली आहेत.

दरम्यान, निवडणूक आयोगाने दिलेल्या आदेशानुसार शिंदे गटानेही तीन चिन्ह सादर केले होते. त्यामध्ये उगवता सूर्य, त्रिशूळ आणि गदा हे तीन पर्याय दिले होते तर दोन्ही गटाने सादर केलेल्या चिन्हांपैकी दोन चिन्ह सारखे असल्यामुळे ते कुणालाच देण्यात आले नाहीत. गदा हे चिन्ह निवडणूक आयोगाने नाकारत शिंदे गटाला दुसरे पर्याय देण्यास सांगितलं होतं. त्यानंतर आता इमेल करत शिंदे गटाने तीन निवडणूक चिन्हे सादर केली आहेत.

हे ही वाचा :

सर्व केंद्रीय विद्यापीठांमध्ये, उच्च संस्थांमध्ये हिंदीचा वापर बंधनकारक करा, अमित शाह यांची समितीला शिफारस

चिन्ह आणि नावावर शिंदे गटाचे नरेश म्हस्के आणि भारत गोगावले यांची प्रतिक्रिया

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version