एकनाथ शिंदे मुख्यमंत्री आहेत, तोपर्यंत त्यांच्यासोबत आहोत – आमदार बच्चू कडू

जिकडे आमचा राजकीय फायदा असेल तिकडे आम्ही जाण्याचा विचार करू. जस प्रत्येकजण आपलं चांगभलं पाहतो, तसा आम्हीही विचार करु.

एकनाथ शिंदे मुख्यमंत्री आहेत, तोपर्यंत त्यांच्यासोबत आहोत – आमदार बच्चू कडू

राष्ट्रवादी पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार (SHARAD PAWAR) यांनी आमदार बच्चू कडू (BACCHU KADU) यांची भेट घेतली. राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) नेते शरद पवार यांचे आमदार बच्चू कडू यांच्या निवासस्थानी कुरळपूर्णा येथे आगमन झाले. त्यानंतर दोन्हीं शेतकरी नेत्यांमध्ये बंदद्वार चर्चा झाली. शरद पवार यांच्यासोबत यावेळी माजी गृहमंत्री अनिल देशमुख (ANIL DESHMUKH), माजी मंत्री हर्षवर्धन देशमुख (HARSHVARDHAN DESHMUKH) हे देखील उपस्थित होते. शरद पवार हे  २७ डिसेंबर पासून दोन दिवसांच्या अमरावती (AMRAVATI) दौऱ्यावर आहेत.

शरद पवार (SHARAD PAWAR) यांनी आमदार बच्चू कडू (BACCHU KADU) यांच्या घरी भेट दिली. यावेळी शरद पवार यांना संत गुलाबराव महाराज यांचं ग्रंथ आणि संत तुकाराम महाराजांची प्रतिमा भेट देऊन बच्चू कडू (BACCHU KADU) आणि नयना कडू यांनी शरद पवार यांचं स्वागत केले. शरद पवार यांच्यासोबत राजकीय (POLITICAL) आणि सामाजिक विषयांवर चर्चा झाली परंतु, जास्त करून शेतीच्या विषयावर चर्चा झाल्याची  माहिती बच्चू कडू यांनी दिली. बऱ्याच गोष्टी उघड करायच्या नसतात, तेवढ तारतम्य ठेवावं लागतं. पेरणी ते कापणीपर्यंत सगळी काम हे रोजगार हमी योजनेत व्हावे. हे तुमच्या अजेंड्यामध्ये असावे, असं शरद पवार यांना सांगितल्याची माहिती आमदार बच्चू कडू यांनी यावेळी दिली.

मदतीची जाणीव म्हणून त्यांना आम्ही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM EKNATH SHINDE) यांना फोन केला आणि घरी येण्याच निमंत्रण दिले आहे. आम्ही सध्या एकनाथ शिंदे यांच्या सोबत आहोत. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री आहेत, तोपर्यंत त्यांच्यासोबत आहोत. शिंदे मुख्यमंत्री नसले तर आम्ही वेगळा निर्णय घेण्याबदल बघू. जिकडे आमचा राजकीय फायदा असेल तिकडे आम्ही जाण्याचा विचार करू. जस प्रत्येकजण आपलं चांगभलं पाहतो, तसा आम्हीही विचार करु. जोपर्यंत एकनाथ शिंदे मुख्यमंत्री आहेत, तोपर्यंत वेगळा निर्णय नाही, अशी माहिती आमदार बच्चू कडू (BACCHU KADU) यांनी दिली.

हे ही वाचा:

देशासह महाराष्ट्रात कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ, काळजी घेण्याचे आवाहन

नवीन वर्षाच्या स्वागतासाठी शिमला मनालीमध्ये पर्यटकांची मोठी गर्दी

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा. 

Exit mobile version