एकनाथ शिंदे हे भाजप चे मुख्यमंत्री; संजय राऊतांचा टोला

जर कुणी म्हणत असेल मी शिवसेनेचा मुख्यमंत्री आहे तर, शिवसेनेचं हायकमांड हे मुंबईत आहे. मातोश्रीवर आहे दिल्लीत नाही.

एकनाथ शिंदे हे भाजप चे मुख्यमंत्री; संजय राऊतांचा टोला

मुंबई: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे (Eknath Shinde)  उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत आज दिल्ली दौऱ्यावर आहेत  (Devendra Fadnavis) मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या भेटीसाठी दिल्लीला गेले आहेत. मुख्यमंत्र्यांच्या दिल्ली दौऱ्याबाबत संजय राऊत यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. जर कुणी म्हणत असेल मी शिवसेनेचा मुख्यमंत्री आहे तर, शिवसेनेचं हायकमांड हे मुंबईत आहे. मातोश्रीवर आहे दिल्लीत नाही. मंत्रिमंडळ ठरवण्यासाठी शिवसेनेचा मुख्यमंत्री कधी दिल्लीत जात नाही. आज पर्यंत गेला नाही. त्यामुळे हळूहळू सगळ्यांचे मुखवटे गळून पडतायत. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्यांच्याकडून राज्याच्या अपेक्षा आहेत. यावेळी संजय राऊत यांनी आता महाराष्ट्रात मुख्यमंत्री भाजपचे आहेत असं विधान करत एकानाथ शिंदे यांना टोला लगावला आहे. शिवसेनेचे नाही तर भाजपचेच असं निक्षून त्यांनी सांगितले.
बेळगाव सह सीमा भागात ठाकरे सरकार गेल्यापासून पुन्हा मराठी माणसांवर अत्याचार होत असल्याचे संजय राऊत म्हणाले. त्यामुळे सरकारने तो भाग केंद्रशासित करावं अशी मागणी मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्याकडे करायला पाहिजे असं ही राउत म्हणाले.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना टोला
मुख्यमंत्र्यांची भूमिका दिल्लीतील आदेशावरून ठरते. महाराष्ट्रच्या मुख्यमंत्र्यांचे हायकमांड दिल्लीत आहे. त्यांच्यात रात्री – मध्यरात्री विचारांचं आदान प्रदान होतं. मुंबईचे तीन तुकडे करण्याचा केंद्राचा डाव असल्याचं संजय राऊत म्हणाले. मुंबई महाराष्ट्राबाहेर नेण्याचा प्रयत्न होईल. असे गंभीर चित्र महाराष्ट्रा समोर उभे आहे. भाजपच्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी याकडे लक्ष द्यायला पाहिजे. शिवसेनेचे बारा खासदार भाजपच्या संपर्कात आहेत, अशी विचारणा पत्रकारांनी संजय राऊत यांना केली तेव्हा त्यांनी “असं कुणी जाहीर केलं का ? असा सवाल करत यावर अधिक बोलण्याचं बोलण्याचे टाळले.
Exit mobile version