बी. के.सी मैदानातून एकनाथ शिंदेंचा महाविकास आघाडीवर जोरदार हल्लाबोल

बी. के.सी मैदानातून एकनाथ शिंदेंचा महाविकास आघाडीवर जोरदार हल्लाबोल

आज मुंबईमध्ये विविध कामांचं लोकार्पण करण्यासाठी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मुंबईमध्ये उपस्थित झाले आहे. या वेळी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भाषण केलं. भाषणाची सुरवातीलाच महविकास आघाडी सरकारवर टीका कारण्यापासूनच सुरवात झाली. येत्या दोन अडीच वर्षात आम्ही मुंबईची कायापालट करू. महाविकास आघाडीच्या काळात महाराष्ट्रामध्ये विकास किती झाला ते माहित आहे असा टोला शिंदेनी लगावला.

नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या मुळे विकास कामं वेगात सुरु आहे. मुंबईचे चारशे किमीचे रस्ते सिमेंटचे करत आहोत. जगभरात नरेंद्र मोदी यांचं नाव प्रसिद्ध आहे. डांबरीकरणाच्या नावाखाली काळं पांढरं करणायचं दुकान बंद होईल असा टोला एकनाथ शिंदे यांनी विरोधकांना लगावला. सहा महिन्यातच काहींना धडकी भरली आहे. टीकेला आम्ही उत्तर हे कामातून देऊ असं शिंदेनी संगीत.

दावोसला (Davos) अनेक देशाचे नेते देखील मोदींबाबत विचारायचे. मी मोदी भक्त आहे सांगितल्यानंतर माझ्यसोबात फोटो काढायचे. रस्ते दुरुस्तीच्या (Road Repair) नावाखाली होणार भ्र्रष्टाचार आता थांबेल. एकनाथ शिंदे पुढे म्हणाले, “मागच्यावर्षीच्या डिसेंबरमध्ये गेमचेंजर अशा समृद्धी महामार्गाचे लोकर्पण मोदी साहेबांच्याहस्ते राज्याच्या उपराजधानीत नागपूर येथे झाले. आज वर्षाच्या पहिल्याच महिन्यात राज्याच्या राजधानीत एक अभुतपूर्व सोहळा संपन्न होतो आहे. वंदनीय बाळासाहेब ठाकरे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांचे जिव्हाळ्याचे नाते होते. हिंदुत्त्व आणि हिंदुत्त्वाचा अभिमान या दोहोंच्या विचारांचा पाया होता. पंतप्रधान यांचे मुंबईकरांच्यावतीने स्वागत करतो. ते आमच्या निमंत्रणाचा मान ठेवून आले याबद्दल त्यांचे आभार व्यक्त करतो.”

हे ही वाचा:

PM Narendr Modi Mumbai Visit Live, पंतप्रधान नरेंद्र मोदी जगातील लोकप्रिय नेते , देवेंद्र फडणवीस

नरेंद्र मोदी एकनाथ शिंदेंना देणार धनुष्यबाण ?

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version