मी घेतलेला भूमिकेवर राज्यभरातून प्रतिसाद, एकनाथ शिंदेंचा दावा

आज उल्हासनगरच्या 18 नगरसेवक शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची साथ सोडत एकनाथ शिंदे गटात सामिल झाले आहेत.

मी घेतलेला भूमिकेवर राज्यभरातून प्रतिसाद, एकनाथ शिंदेंचा दावा

मी घेतलेला भूमिकेवर राज्यभरातून प्रतिसाद, एकनाथ शिंदेंचा दावा

ठाणे : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज गुरुपौर्णिमेनिमित्त सर्वप्रथम दादर मधील शिवाजी पार्क येथे जाऊन हिंदुरुदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिस्थळावर बाळासाहेबांना अभिवादन केले. त्यानंतर दुपारी दोन वाजता धर्मवीर आनंद दिघे यांच्या शक्तीस्थळावर जाऊन नतमस्तक झाले. त्यामुळे आज शिवसैनिक आणि शिंदे गटाचे या ठिकाणी एका प्रकारे शक्ती प्रदर्शन पाहायला मिळाले.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माध्यमांशी संवाद साधला त्यात त्यांनी म्हटले की, “मी एक सर्वसामान्य शिवसैनिक होतो. बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने आता मी मुख्यमंत्रीपदी विराजमान झालेलो आहे. राज्याचा विकास हेच आमचे ध्येय आहे. शिंदे आणि फडणवीस सरकार हे लोकशाहीचं नवे सरकार आहे. राज्यातून ठिकठिकाणी मला पाठिंबा दिला जातोय. आज या राज्यातील आमदारांसोबत अनेक नगरसेवक, शाखाप्रमुख, शिवसैनिक आमच्यासोबत आहेत, आज उल्हासनगरचे 18 शिवसैनिक आपल्यासोबत आले आहेत”.असे मुख्यमंत्र्यांनी म्हटले.

आज उल्हासनगरच्या 18 नगरसेवक शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची साथ सोडत एकनाथ शिंदे गटात सामिल झाले आहेत. त्यामुळे शिवसेनेला आता स्थानिक पातळीवरही धक्का बसत असल्याचे दिसून येत आहे.

हेही वाचा : 

गुरुपौर्णिमेनिमित्त आनंद दिघे यांना एकनाथ शिंदेंकडून अभिवादन

Exit mobile version