एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरेंना भुजबळांबद्दल विचारला प्रश्न म्हणाले; यातना होत नाहीत का ?

एकनाथ शिंदे यांनी ट्विटर वर एक व्हिडिओ पोस्ट केला आहे.

एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरेंना भुजबळांबद्दल विचारला प्रश्न म्हणाले; यातना होत नाहीत का ?
महाराष्ट्र सरकार समोर सध्या मोठा पेच निर्माण झाला आहे. राज्यात संघर्षाला रोज एक वेगळे वळण मिळत आहे. सुप्रीम कोर्टात हे प्रकरण पोहोचले असून आता न्यायालय यावर काय निर्णय देतं याकडे सर्वांचेच लक्ष लागून राहिले आहे. शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी आज ट्विटर वर माजी आमदार सुभाष साबणे यांचा एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. या व्हिडिओ सध्या ची सगळीकडे चर्चा सुरू आहे.
एकीकडे मुंबईसह ठाण्यात कार्यकर्ते रस्त्यावर उतरून आक्रमक झाल्याचे चित्रं दिसुन येत आहे. गुवाहाटी मध्ये ४० आमदारांसह असलेले नेते एकनाथ शिंदे हे ट्विटर वरुन आदित्य ठाकरेंनी केलेल्या आरोपांना उत्तर देत आहेत. तर आज पुन्हा एकनाथ शिंदे यांनी ट्विटर वर एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. या व्हिडिओ मध्ये माजी आमदार सुभाष साबणे म्हणतात, “हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना अटक करणाऱ्या छगन भुजबळ यांच्यासोबत मांडीला मांडी लावून मंत्रिमंडळात बसताना आपल्याला काहीच यातना होत नाहीत का?” असा सवाल शिवसेनेचे माजी आमदार सुभाष साबणे यांनी मुख्यमंत्री तथा शिवसेनापक्षप्रमुख श्री.उद्धव ठाकरे यांना विचारला आहे.
Eknath Shinde questioned Uddhav Thackrey
गुवाहाटी मध्ये हॉटेलमध्ये वास्तव्यास असलेले एकनाथ शिंदे यांच्यासह आठ मंत्र्यांविरोधात उच्च न्यायालयात जनहित याचिका करण्यात आली आहे. मंत्र्यांनी बंडखोरी केल्यामुळे जनतेची कामे, प्रशासकीय कामे रखडली आहेत. असे आरोप या याचिकेत करण्यात आले आहेत. मुख्य न्यायमूर्तींच्या उपस्थितीत खंडपीठासमोर ही याचिका सोमवारी सादर करण्यात आली. यावर काय निर्णय येतो हे पहावे लागेल.
Exit mobile version