spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

एकनाथ शिंदेनी दिले ‘वन नेशन, वन इलेक्शन’ ला समर्थन

मोदी सरकारने शुक्रवारी म्हणजेच १ सप्टेंबर २०२३ रोजी एक देश, एक निवडणूक या विषयावर एक समिती स्थापन केली असून, देशाचे माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद हे या समितीचे अध्यक्ष असणार आहेत. तसेच केंद्र सरकारने १८ सप्टेंबर ते २२ सप्टेंबर दरम्यान संसदेचे विशेष अधिवेशन देखील बोलावले आहे.

विरोधकांच्या ‘इंडिया’ आगाडीची आज (शुक्रवार) मुंबईत बैठक होत आहे. या बैठकीकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे. या दरम्यान महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधकांच्या या बैठकीवर टीका केली आहे. सगळे विरोधक एकत्र आले तरी काही फरक पडणार नाही. लोकांनी मोदींना पंतप्रधान पदी निवडण्याचा निर्णय केला असल्याचा विश्वास शिंदे यांनी व्यक्त केला.

मोदी सरकारने शुक्रवारी म्हणजेच १ सप्टेंबर २०२३ रोजी एक देश, एक निवडणूक या विषयावर एक समिती स्थापन केली असून, देशाचे माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद हे या समितीचे अध्यक्ष असणार आहेत. तसेच केंद्र सरकारने १८ सप्टेंबर ते २२ सप्टेंबर दरम्यान संसदेचे विशेष अधिवेशन देखील बोलावले आहे. या अधिवेशनात सरकार एक देश, एक निवडणूक विधेयक आणणार असल्याच्या चर्चा आहेत.यादरम्यान महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वन नेशन, वन इलेक्शन या धोरणाचे देखील स्वागत केले आहे. “मी ‘वन नेशन, वन इलेक्शन’चे स्वागत करतो. यामुळे निवडणुकीवर खर्च होणारा पैसा वाचेल आणि तो पैसा कल्याणकारी योजनांसाठी वापरता येईल आणि केंद्र सरकारने आतापर्यंत घेतलेले निर्णय लोकांच्या हिताचेच आहेत. इंडिया आघाडीच्या बैठकीचा महायुतीवर किती परिणाम होईल? असा प्रश्न मुख्यमंत्री शिंदे यांना विचारण्यात आला होता. यावर उत्तर देताना ते म्हणाले की, “ती इंडिया आघाडी नसून ती इंडी आघाडी आहे. I.N.D.I.A असं आहे, मध्ये डॉट आहेत. ज्या विरोधकांची ही बैठक झाली ते २०१४ मध्ये मोदी पंतप्रधान झाल्यापासून हे विस्थापित झाले आहेत. २०१४ मध्ये त्यांनी प्रयत्न केले. २०१९ मध्ये केले. पण २०१९ साली मोदी यांच्या अधिक जागा आल्या आणि ते पंतप्रधान बनले. लोकांनी २०२४ मध्ये पुन्हा पंतप्रधान मोदींना निवडून देण्याचा निर्णय घेतला आहे.

एकनाथ शिंदे यांनी असा विश्वास दाखवला आहे की , २०२४ च्या निवडणुकीत मोदी सरकारच पुन्हा येणार असे मत त्यांनी मांडलेआहे. त्याचबरोबर लोकांना विकास पाहिजे, लोकांना भांडणं नको आहेत.अशी टीका देखील विरोधकानावर केली आहे. अजयचा बैठकीला अनेक बड्या लोकांनी हजेरी जरी लावली असली तरी देखील या लोकांमध्ये घोटाळे करणारी लोक जास्त आशेत असे एकनाथ शिंदे म्हणाले आहेत. आज किती टोळ्या आल्या आहेत. त्यांचे नावे बघितले तरी लक्षात येईल की मोठमोठे घोटाळे त्यांच्या नावावर आहेत. हे यापूर्वीही एकत्र आले होते. पण यामुळे काही फरक पडणार नाही. त्यांनी कितीही प्रयत्न केले तरी जनतेने ठरवलं आहे. एका सर्व्हेमध्ये समोर आलं की ८५ टक्के लोक मोदींना पुन्हा पंतप्रधान पदी पाहू इच्छीतात. हे सगळे (विरोधक) एकत्र येत आहेत हाच मोदींचा विजय आहे” असेही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यावेळी म्हणाले.

हे ही वाचा:

I.N.D.I.A आघाडीच्या लोगोचं अनावरण ढकलले पुढे

एक देश , एक निवडणूक मोदींचा नवा नारा

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss