Eknath Shinde : एकनाथ शिंदे सरकारचं भवितव्य अडचणीत

राज्याच्या मुख्यमंत्रीपदावर आतापर्यंत अनेक दिग्गज बसले. मात्र व्यक्तिगत कलंक लावून न घेता सलग पाच वर्षे यशस्वीपणे रहाण्याची किमया माजी मुख्यमंत्री आणि विद्यमान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीच केली.

Eknath Shinde : एकनाथ शिंदे सरकारचं भवितव्य अडचणीत

राज्याच्या मुख्यमंत्रीपदावर आतापर्यंत अनेक दिग्गज बसले. मात्र व्यक्तिगत कलंक लावून न घेता सलग पाच वर्षे यशस्वीपणे रहाण्याची किमया माजी मुख्यमंत्री आणि विद्यमान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीच केली. त्यासाठी उच्च शिक्षण, अभ्यासूवृत्ती, वेळेच नियोजन, पक्षनिष्ठा, राजकीय समज हे गुण कारणीभूत असले तरी प्रशासकीय पकड हा यातला सगळ्यात प्रमुख भाग होता. त्यामुळेच देवेंद्र फडणवीस हे प्रचंड यशस्वी झाले, स्वपक्षीयांसह विरोधकांवर त्यांची जरब बसली त्याचं श्रेय जातं एका व्यक्तीला त्या गृहस्थांचं नाव आहे प्रवीणसिंह प्रतापसिंह परदेशी.

भारतीय सेवेतील १९८५च्या तुकडीच्या महाराष्ट्र कॅडरचे अधिकारी असलेले प्रवीण परदेशी देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यालयात प्रधान सचिव होते. राज्याचे माजी मुख्य सचिव अरुण बोंगीरवर यांचे जावई असलेले गेल्या ३० वर्षातील एक हाती प्रशासकीय प्रभाव असलेली व्यक्ती ठरले होते, असं अनेक माजी मंत्री, ज्येष्ठ माजी सनदी अधिकारी , माजी मंत्री सांगतात. मुख्यमंत्री फडणवीस यांनी त्यांच्यावर टाकलेला विश्वास आणि कोणत्याही परिस्थितीचा घटकांसह ताबा घेण्याची हातोटी विलक्षण होती. त्यामुळे बदल्या बढत्यांसारखे मुख्यमंत्र्यांना त्रासदायक वाटणाऱ्या विषयांपासून ते महत्वांकांक्षी प्रकल्प राबवताना विरोधकांवर काबू ठेवण्यापर्यंतची अनेक कामे त्यांनी अश्या प्रकारे केली की त्यांना राजकीय वर्तुळ ‘DF-2’ या नावाने ओळखू लागले होते. देवेंद्र फडणवीस यांच्या काळात १५/२० जवळच्या अधिकाऱ्यांनाच महत्त्वाच्या ‘क्रीम पोस्टिंग’ मिळत होत्या. पण त्यातल्या कुणालाही मुख्यमंत्र्यांच्या ‘जवळ’ जाण्याची संधी परदेशींनी कधीही दिली नाही. मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे जाऊन सांगण्याचं कोणतंही प्रशासकीय, वैयक्तिक काम आधी परदेशींच्या ऐरणीवर ठोकून त्यातली शुध्दता तपासून मगच पुढे मुख्यमंत्र्यांकडे जात होतं त्यामुळेच फडणवीस प्रामुख्याने यशस्वी ठरले. बहुतेक कामं परदेशीच हातानिराळी करीत असतं. ते मुख्यसचिव पदाच्या शर्यतीतही होते. मात्र सत्ताबदल होऊन मुख्यमंत्री पदी उध्दव ठाकरे येताच माजी मुख्यसचिव अजोय मेहता यांनी परदेशी यांच्या प्रशासकीय गलबताच्या अक्षरशः ठिकऱ्या उडवत त्यांना मुंबई मनपा आयुक्त पदावरूनच दिल्लीत पाठवलं.

हे ही वाचा : Exclusive : ‘हा’ बडा नेता गुरुवारी जाणार शिंदे गटात, डॉ श्रीकांत शिंदे यांच्या शिष्टाईला यश

सत्ताबदल होऊन मुख्यमंत्री पदी देवेंद्र फडणवीस येण्याची शक्यता दिसू लागताच निवृत्ती नंतरही प्रविण परदेशी विशेष नियुक्तीवर राज्यात येणार अशी चर्चा रंगू लागली होती. मात्र मुख्यमंत्री पदी अनपेक्षितपणे एकनाथ शिंदे आले आणि परदेशींचे येणं टळलं. आता प्रविण परदेशींबरोबरच देवेंद्र फडणवीसांच्या TOP-5 मध्ये काम करणाऱ्या १९९० च्या भूषण गगराणी यांच्याकडे मुख्यमंत्र्यांच्या प्रधान सचिव पदाची धुरा आहे. अत्यंत बुध्दीमान, शिस्तशीर, विनम्र, कंपूशाही पासून लांब, उत्तम प्रशासकीय समज असलेल्या या अधिकाऱ्याने प्रवीण परदेशींसारखं स्वतःला झोकून देऊन काम केलं नाही तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा निभाव लागणं खूपच कठीण आहे. मुख्यमंत्री हा आधी राजकीय नेता असतो त्यामुळे त्यांच्याकडून बऱ्याचदा लोकप्रिय निर्णयांच्या घोषणा नेहमीच होत असतात. त्या प्रशासकीय चौकटीत बसवण्याची कसरत या सनदी अधिकाऱ्यांना करावी लागते. अनेक निर्णय मुख्यमंत्री म्हणून उपयुक्त ठरताना ते विरोधकांकरवी उलटायला नको हे देखील जिल्हा आणि क्षेत्रनिहाय बघत आर्थिक व्यवस्थेची सांगड घालावी लागते. यासाठी मुख्यमंत्री शिंदे यांनी भूषण गगराणी यांच्या सारख्या अधिकाऱ्याला कोपऱ्यातल्या दालनातून बाहेर काढत पॅड बांधून सक्षमपणे मैदानात उतरवावे लागेल. मुख्यमंत्री शिंदे यांना वाटतं आपल्या दारी आलेला प्रत्येकजण सुखावूनच जायला हवा पण तसं कोणालाच शक्य होत नाही. मुख्यमंत्र्यांकडे येणाऱ्या कामांची वस्तुनिष्ठता ही भूषण गगराणी, विकास खारगेंसारख्या अधिकाऱ्यांकडून छाननी होऊन निर्णय प्रक्रियेस जायला हवीत. प्रत्यक्षात तसं अभावानेच होतं आहे. अन्यथा नुकत्याच म्हाडाच्या ३८८ जुन्या इमारतींच्या विकासबाबत मुख्यमंत्र्यांनी घेतलेल्या निर्णयासारखी आधी निर्णय मग अभ्यास अशी स्थिती होऊ शकेल.

भूषण गगराणींसारख्या क्षमतावान अधिकाऱ्याला माजी मुख्यमंत्री उध्दव ठाकरेंनी DF चा माणूस असं म्हणत अडगळीत टाकण्याचं काम केलं होतं. आताही भूषण गगराणी हातचं राखूनच काम करत आहेत. विकास खारगे हे देखील आलेला चेंडू शांतपणे खेळून काढण्याच्या मनस्थितीत आहेत. त्यामुळे पायाला भिंगरी लावून फक्त घड्याळ्याच्या तास काट्यावर काम करण्याच्या मुख्यमंत्री शिंदेंच्या जिवापाड केलेल्या मेहनतीवर पाणी पडण्याचीच लक्षणे आहेत.

मुख्यमंत्र्यांकडे होणारी बेलगाम, बेशिस्त गर्दी, त्यातून होणाऱ्या अनाठायी मागण्या, समर्थक आमदारांचे लाड पुरवणे, त्यातच मुख्यमंत्री कार्यालय कक्षेत होणारी घुसखोरी, नामसाधर्म्याचा गैरफायदा घेत जिल्हा पातळींवरील अधिकाऱ्यांना होणारी फोनवरील दमबाजी, प्रशासकीय – खाजगी कामांची विभागणी, प्रत्येकाशीच मुख्यंमंत्र्यांनी बोलण्याचा अनाठायी हट्ट, घटनाबाह्य- कक्षबाह्य व्यक्तींचा प्रभाव, मुख्यमंत्र्यांचे ‘लोकनेता’ बनून रहाण्याच्या प्रयत्नात ‘वर्षा’ ला मिळत असलेली पर्यटन स्थळाची ओळख त्यातून मुख्यंमंत्र्यावर येणारा प्रचंड शारिरीक -मानसिक ताण या सगळ्यांसाठी मुख्यमंत्री शिंदे यांनी भूषण गगराणी यांना सकारात्मक पवित्र्यासह मैदानात उतरवण्याची नितांत गरज आहे. मुख्यमंत्र्यांकडच्या गोंधळाबाबत गगराणी यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, मुख्यमंत्री १६/१८ तास काम करतायत. पण कामांचा डोंगर विशाल आहे. राज्यातील जनतेच्या खूप मोठ्या प्रमाणात अपेक्षा आहेत. अश्यावेळी सगळ्यांनाच या आव्हानांचा सामना करावा लागतोय. सरकार सर्वोत्तम प्रक्रियेचा अवलंब करतेय.’’

मुख्यमंत्र्यांकडील भूषण गगराणींना फडणवीसांकडील प्रवीण परदेशी होणं शक्य आहे का याबाबत चार दशकं राजकीय समीक्षण करणारे एक ज्येष्ठ समीक्षक म्हणाले, दोन व्यक्ती एक दुसऱ्यासारख्या वागू आणि जगू शकत नाहीत. शिंदे-गगराणी ही जोडी स्वभावाने शांत आणि हळवी आहे. सकारात्मक आहे. फडणवीस-परदेशी आपल्या प्रभावाने भवताल व्यापून टाकायचे. साहजिकच हवा तो परिणाम साधता यायचा. पण इथे एकट्या गगराणींचा मुद्दा नाहीय त्यांना शिंदेंबरोबर उपमुख्यमंत्र्यांनीही बळ देण्याची गरज आहे.जरी ते देशातील निष्णात सनदी अधिकारी असले तरी कामाची मुभा महत्वाची आहेच. मुख्यमंत्र्यांकडे प्रचंड क्षमता आहे पण तिथला गोंधळ कमी व्हायला हवा असंही ते म्हणाले.

हे ही वाचा:

Exclusive : चमकायला शो सैनिक, केसेसमध्ये अडकायला शिवसैनिक

Exclusive : शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे कोणाचे ?

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version