एकनाथ शिंदे आजपासून दिल्ली दौऱ्यावर, सर्वप्रथम अमित शहांची घेणार भेट

सत्तास्थापने नंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे मंत्रिमंडळ विस्ताराच्या तयारीला लागले आहेत.-

एकनाथ शिंदे आजपासून दिल्ली दौऱ्यावर, सर्वप्रथम अमित शहांची घेणार भेट

एकनाथ शिंदे आजपासून दिल्ली दौऱ्यावर, सर्वप्रथम अमित शहांची घेणार भेट

मुंबई : सत्तास्थापने नंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे मंत्रिमंडळ विस्ताराच्या तयारीला लागले आहेत. मंत्रीपदाचे वाटप हे दिल्लीतील पक्षश्रेष्ठाच्या देखरेखेखाली होणार असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे. याच पार्श्वभूमीवर मंत्रिमंडळ विस्ताराबाबत चर्चा करण्यासाठी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे दिल्लीला रवाना होणार आहेत.

दिल्लीमध्ये दाखल होताच मुख्यमंत्री अमित शहा यांची भेट घेणार आहेत आज संध्याकाळी 8:30 सुमारत शिंदे आणि अमित शहा यांची भेट होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. आज अमित शहा यांची भेट घेतल्यानंतर मुख्यमंत्री उद्या भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेणार आहेत. उद्या दुपारी 4:30 च्या सुमारास महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री हे पंतप्रधान यांची भेटणार असल्याची माहिती मिळत आहे.

हेही वाचा :

भोंग्याचे चित्र ट्विट करत “उद्धव साहेब हेच नवं चिन्ह निवडा किमान…” मनसे नेते गजानन काळेंचा टोला

नरेंद्र मोदी व अमित शहा आणि भाजपाच्या सर्वोच्च नेत्यांच्या पाठिंबामुळे शिंदे यांचे बंड यशस्वी झाले. गुहाटी मध्ये असताना एकनाथ शिंदे यांनी भाजपाच्या महाशक्तीचा उल्लेख केला होता. शिंदे यांचे बंडके यशस्वी झाले नाही तर त्यांनी भाजपच्या पाठिंबामुळे थेट मुख्यमंत्रीपद मिळाले. दुसरीकडे उद्धव ठाकरेंकडून आपला पक्ष वाचवण्यासाठी प्रयत्नात आहेत. दरम्यान आज उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका मांडली त्याचबरोबर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व त्यांच्या आमदारांवर टीका शस्त्र सोडले.

‘टिश्यू नो इश्यू म्हणत अभिनेत्री अमृता सुभाष गमतीशीर व्हिडिओ होतोय व्हायरल

Exit mobile version