एकनाथ शिंदेंनी घेतली राज ठाकरेंची भेट म्हणाले ही केवळ सदिच्छा भेट

. आज राज ठाकरे साहेबांच्या घरी आलो, गणेशाचे दर्शन घेतले. ही सदिच्छा भेट होती.

एकनाथ शिंदेंनी घेतली राज ठाकरेंची भेट म्हणाले ही केवळ सदिच्छा भेट

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गुरुवारी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची मध्य मुंबईतील निवासस्थानी भेट घेतली., राजकीय नेते, उद्योगपतींच्या घरी गणेश दर्शनासाठी फिरताना पाहायला मिळत आहेत. सकाळी उद्योगपती मुकेश अंबानी (Mukesh Ambani)यांच्या निवासस्थानी मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांनी गणेश दर्शन केल्यानंतर, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मनसे अध्यक्ष राज ठाकरे (MNS Raj Thackeray)यांच्या शिवतीर्थ या निवासस्थानी गणेश दर्शनासाठी पोहचले. सत्तेत आल्यानंतर पहिल्यांदाच एकनाथ शिंदे यांनी राज ठाकरे यांच्या निवासस्थानी आले. त्यामुळे आगामी निवडणुकांच्या दृष्टीने एकनाथ शिंदे यांनी ही भेट घेतली असावी असे तर्क आता लावले जात आहेत.

या भेटीनंतर माध्यमांशी बोलताना मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की- गणेशोत्सवामुळे सर्वत्र आनंदच वातावरण आहे. गणेशोत्सवानिमित्ताने राजकीय नेते नेहमी एक-दुसऱ्यांकडे जात असतात. आज राज ठाकरे साहेबांच्या घरी आलो, गणेशाचे दर्शन घेतले. ही सदिच्छा भेट होती. ऑपरेशन झाल्यानंतर येणार होतो. त्यांच्या प्रकृतीची चौकशी करण्यासाठी आणि गणरायाच्या दर्शनासाठी ही भेट असल्याचे त्यांनी सांगितले.

या भेटीत धर्मवीर आनंद दिघे साहेबांच्या आठवणींवर चर्चा झाली आणि जुन्या आठवणींना उजाळा मिळाला. राज ठाकरे आणि मुख्यमंत्री शिंदे यांनी बाळासाहेब ठाकरेंच्या सानिध्यात काम केलेले आहे. राज यांनीही त्यावेळी शिवसेनेत राज्यात काम केले होते, असेही त्यांनी सांगितले. या भेटीत राजकीय चर्चा झाली नाही , असेही त्यांनी स्पष्ट केले. या भेटीत राजकीय चर्चाच झाली नसल्यामुळे ही नव्या राजकारणाची नांदी कशी ठरेल, असा प्रतिप्रश्न त्यांनी माध्यमांना विचारला.

गेल्या काही दिवसांपासून भाजपाचे नेते राज ठाकरे यांच्या निवासस्थानी भेट देत आहेत. त्यात विनोद तावडे, आशिष शेलार यांचा समावेश आहे. काही दिवसांपूर्वीच राज ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचीही भेट घेतली होती. राज्यातील आगामी स्थानिक स्वराज्य संस्था आणि महापालिका निवडणुकांत सत्ताधारी आणि मनसे एकत्र येतील अशी शक्यता वर्तवण्यात येते आहे. तशी चर्चा राजकीय वर्तुळात आहे. अशा स्थितीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि राज ठाकरे यांची भेट महत्त्वाची मानण्यात येते आहे.

हे ही वाचा:

जंगकूकच्या वाढदिवशी, बीटीएस मेंबर व्ही आणि जंकूकच्या भांडणाचा व्हिडीओ होतोय सोशल मीडियावर व्हायरल

यश, परी आणि नेहा घेणार का प्रेक्षकांचा निरोप ?

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version