spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

Eknath Shinde VS Udhhav Thackeray : सत्तासंघर्षावरून सर्वोच्च न्यायालयात आजचा युक्तिवाद पूर्ण, पुढील सुनावणी उद्या

नवी दिल्ली : महाराष्ट्र राज्यातील सत्तासंघर्षावर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरु आहे. शिंदे सरकार बेकायदेशीर,विधानसभा अध्यक्षांच्या वैधतेला आव्हान देणाऱ्या याचिका आणि शिंदे गटातील आमदारांना अपात्र ठरविण्याबाबत विधानसभा उपाध्यक्षांनी दिलेल्या नोटिशींना आव्हान देणाऱ्या याचिकांवर आज एकत्रित न्यायालयात सुनावणी होणार आहे. त्याच बरोबर केंद्रीय निवडणूक आयोगाने मूळ शिवसेना कोणाची हे ठरविण्यासाठी पुरावे दाखल करण्यासाठी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री शिंदे यांना 8 ऑगस्टपर्यंतची मुदत आता वाढवून दिली आहे. या संपूर्ण निर्णयासा आव्हान देणाऱ्या याचिकेवर सुनावणीची विनंती सरन्यायाधीशांना गेल्या आठवडय़ात करण्यात आली होती. ही याचिकाही इतर याचिकांबरोबर सुनावणीसाठी येणार आहे.

शिवसेना वकिलांचा पहिला युक्तिवाद : 

शिवसेनेकडून वकिलांनी न्यायालयात प्रतिज्ञापत्र दाखल केले आहे. त्यानंतर मूळ युक्तिवाद सुरु झाला. वकील सिव्वळ यांनी म्हटले, नवे सरकार स्थापन करण्यात राज्यपाल यांची महत्वाची भूमिका होती, शिंदे गटांनी भाजपात विलीन व्हावे असे म्हटले. अन्यथा स्वतंत्र पक्ष स्थापन करावे असे सिव्वल यांनी म्हटले. शिंदे गट शिवसेनेचा दावा करू शकत नाही. असे कपिल सिव्वल यांनी दावा केला आहे.

शिंदे गटाने आपल्या वर्तनाने पक्ष सोडल्याचा कपिल सिव्वल यांचा दावा : 

आपल्या वर्तनातून सदस्य पक्ष सोडल्याचं सिद्ध करतात असं कर्नाटक विधानसभेच्या प्रकरणात कोर्टाने सांगितलं होतं. त्यांना पक्षाच्या बैठकीला बोलावण्यात आलं असता ते सर्वजण सूरतला आणि नंतर गुवाहाटीला गेले. त्यांनी उपाध्यक्षांना पत्र लिहिलं आणि व्हीप जारी केला. आपल्या वर्तनातून त्यांनी पक्षाचे सोडल्याचे न्यायालयात सिद्ध केले आहे. आपला पक्ष खरा असल्याचा दावा शिंदे गट करु शकत नाही. असे कपिल सिव्वल यांनी म्हटले.
राज्यपालांच्या वतीने तुषार मेहता यांचा युक्तिवाद

राज्यपालांच्या वतीने सॉलिसीटर जनरल तुषार मेहता हे युक्तिवाद करत आहेत. याबाबत राज्यपालांची भूमिका काय आहे? अशी न्यायालयाने विचारे केली. त्यावर मेहता यांनी म्हटले, दीर्घ काळासाठी सरकार स्थापना खोळंबू शकत नाही असे उत्तर तुषार मेहता यांनी दिले.

तुम्ही निवडणूक आयोगाकडे का गेलात न्यायालयाचा वकील साळवेंना सवाल

तुमच्यासाठी निवडणूक आयोग का महत्त्वाचा आहे का ? असा प्रश्न शिंदे गटाचे वकील हरिष साळवे यांना सर्वोच्च न्यायालयाने विचारला. याला प्रत्युत्तर देताना साळवे यांनी म्हटले आहे की,  मुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्यानंतर राजकीय घडामोडी सुरू आहेत. बीएमसी निवडणूक जवळ आली आहे. चिन्ह कोणाला मिळावे? यासाठी आमच्यासाठी निवडणूक आयोग महत्त्वाचा आहे.

यामुळे आमदारांवर अपात्रतेची कारवाई होऊ शकत नाही : साबळे 

आज हरिष साळवे यांनी न्यायालयात युक्तिवाद करताना म्हटले की, मुख्यमंत्री बदलाची मागणी ही पक्षविरोधी ठरवता येणार नाही. मुख्यमंत्री भेटत नसल्याने शिंदे गटाकडून मुख्यमंत्री बदलाची मागणी करण्यात आली होती. त्यामुळे आमदारांवर अपात्रतेची कारवाई होऊ शकत नाही

न्यायालयात सुनावणीचा पाहिला भाग पूर्ण, पुढील सुनावणी उद्या होणार 

महाराष्ट्रातल्या सत्तासंघर्षावर उद्या सुनावणी होणार आहे. शिंदे गट आणि शिवसेना ही पहिलीच केस उद्या घेण्यात येईल असे न्यायालयाने म्हटले आहे.

हेही वाचा : 

महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर सर्वोच्च न्यायालयात आज सुनावणी, शिवसेनेकडून प्रतिज्ञापत्र दाखल

Latest Posts

Don't Miss