spot_img
Thursday, September 19, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

एकनाथ शिंदे घेणार उद्धव ठाकरेंची भेट; दिपाली सय्यदांचे मोठे वक्तव्य

काल उशिरा केलेल्या ट्विट मध्ये दिपाली सय्यद यांनी एकनाथ शिंदे हे उद्धव ठाकरेंची भेट घेणार असल्याचं सूचक वक्तव्य केलं आहे.

मुंबई : काही दिवसांपूर्वी शिवसेना नेत्या दिपाली सय्यद यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली होती. उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्यामध्ये समेट व्हावा, म्हणून आपण भेट घेतल्याचं त्यावेळी दिपाली सय्यद यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं. एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंशी चर्चा करावी तसेच उद्धव ठाकरेंनी देखील एकनाथ शिंदे यांना पाठिंबा द्यावा असा आग्रह दिपाली सय्यद यांनी मागच्या ट्विट मध्ये केला होता. काल उशिरा केलेल्या ट्विट मध्ये दिपाली सय्यद यांनी एकनाथ शिंदे हे उद्धव ठाकरेंची भेट घेणार असल्याचं सूचक वक्तव्य केलं आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात आता एकच चर्चा सुरू आहे.

शिवसेना नेत्या दिपाली सय्यद यांनी ट्विट मध्ये एक फोटो शेअर केला आहे. या फोटो सोबत त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, भाजप नेते विनोद तावडे आणि भाजप नेत्या पंकजा मुंडे यांना टॅग केले आहे. तसेच शेअर केलेल्या फोटोत लिहिले की, येत्या दोन दिवसात आदरणीय उध्दवसाहेब व आदरणीय शिंदेसाहेब शिवसैनिकांच्या भावनांचा आदर करुन पहिल्यांदा चर्चा करायला एकत्र येणार हे समजल्यावर खुप बरे वाटले. शिंदे साहेबांनी शिवसैनिकांची तळमळ समजली आणि उध्दवसाहेबांनी कुटूंबप्रमुखांची भुमिका मोठ्यामनाने निभावली हे स्पष्ट झाले आहे. या मध्यस्ती करीता भाजपा नेत्यांनी मदत केली याबाबत धन्यवाद ! चर्चेच्या ठिकाणाची प्रतिक्षा असेल. असं दिपाली सय्यद यांनी ट्विट केले.

एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर अनेक शिवसेना नेते, पदाधिकारी त्यांच्यावर टीकेचे बाण सोडत होते. यामध्ये दिपाली सय्यद यांचा ही सहभाग होता. शिवसेनेच्या आमदारांनो तुम्ही काय मेलेल्या आईचे दुध पिऊन सत्तेत गेलात का?, असा थेट सवाल विचारुन दिपाली सय्यद यांनी बंडखोर आमदारांवर निशाणा साधला होता. परूंतू आता याच दिपाली सय्यद बंडखोरांची भूमिका जाणून घेण्यासाठी आणि ठाकरे-शिंदे यांच्यामध्ये मध्यस्ती करण्यासाठी प्रयत्न करत असल्याचं दिसत आहे.

Latest Posts

Don't Miss