मविआ नेते अडणीत येणार?, मानहानीचा खटला दाखल करण्याचा शिंदे गटाचा निर्णय

मविआ नेते अडणीत येणार?, मानहानीचा खटला दाखल करण्याचा शिंदे गटाचा निर्णय

सत्ताबदलानंतर शिवसेनेसोबत बंडखोरी करणाऱ्या नेत्यांवर माविआ सरकार सतत ५० खोके सरकार म्हणून डिवचताना दिसत आहे. दरम्यान, आता ५० खोके असा आरोप करणाऱ्यांना हे प्रकरण चांगलच भोवणार आहे. शिंदे गटाच्या आमदारांवर ५० खोके घेतल्याचा आरोप करणाऱ्यांविरोधात मानहानीचा खटला दाखल केला जाणार असल्याची माहिती समोर आली आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाच्या गोटात प्रचंड वेगाने हालचाली घडत असल्याची माहिती समोर येत असं असलेल्या माहितीनुसार, एकनाथ शिंदे यांनी महाविकास आघाडीच्या नेत्यांना घेरण्यासाठी शिंदे गटाचे नेते विजय शिवतारे यांना मैदानात उतरवलंय. शिंदे गटाकडून शिवतारे यांना प्रवक्तेपदी नियुक्त करण्यात आलंय. विशेष म्हणजे शिंदे गटाच्या प्रवक्तेपदी नियुक्त झाल्यानंतर लगेच विजय शिवतारे कामाला लागले आहेत. शिंदे गटाच्या नेत्यांना ५० खोक्यांचा आरोप करणाऱ्यांना उत्तर देण्यासाठी विजय शिवतारे न्यायालयीन मार्ग अवलंबणार आहेत.

हेही वाचा : 

Ashok Chavan : भारत जोडो यात्रेत चव्हाणांचा लेकीचं लाँचिंग; श्रीजयाचे नांदेडमध्ये बॅरन झळकले

विजय शिवतारे यांनी आज पत्रकार परिषद घेऊन याबाबत माहिती दिलीय. जर माझ्यावर कोणी असे आरोप केले असते तर मी त्याला नोटीस दिली असती. मी त्याच्यावर अब्रुनुकसानीचा दावा केला असता, मानहानीचा खटला केला असता. सुप्रिया सुळेंचा हा सल्ला आम्ही ऐकलेला आहे. माझी बऱ्याच आमदारांशी आणि मुख्यमंत्र्यांशी चर्चा झाली आहे. हे कुठंतरी थांबलं पाहिजे. जर इतक्या ताकदीने महाराष्ट्राच्या जनतेच्या हितासाठी जे हिंदुत्वाचं नैसर्गिक सरकार बनलेलं आहे, त्याला जर अशाप्रकारे दोष दिले जात असतील आणि त्याची बदनामी केली जात असेल तर निश्चितपणे ५० आमदारांच्यावतीने प्रत्येकी ५० कोटी असे २ हजार ५०० कोटींचे अब्रुनुकसानीचे दावे, मानहानीचे खटले, उद्या त्याची प्रक्रिया सुरू होत आहे, नोटीसा दिल्या जातील. अशा शब्दात शिवतारे यांनी विरोधकांना इशारा दिला आहे.

अजित पवार यांनी दिलेल्या चॅलेंजची जोरदार चर्चा

२०१९ मध्ये विजय शिवतारे यांचा पराभव झाला. त्यानंतर अजित पवार यांनी दिलेल्या चॅलेंजची जोरदार चर्चा झाली होती. आता शिंदे गटातील नेते आणि मंत्री अब्दुल सत्तार यांनी सुप्रिया सुळे यांच्याविषयी वादग्रस्त विधान केलं आहे. त्यामुळे अजित पवार आता सत्तार यांचा शिवतारे यांच्याप्रमाणेच करेक्ट कार्यक्रम करणार का, असे प्रश्न राजकीय वर्तुळात उपस्थित कऱण्यात येत आहेत. अजित पवार यांनी काही दिवसांपासून मौन बाळगले आहे. त्यामुळे अजित पवार शांत राहून सत्तार यांना दणका देणार, अशा चर्चा सुरू झाल्या आहेत.

हाडे मजबूत करण्यासाठी कॅल्शियम युक्त पदार्थ खाणे ; जाणून घ्या टिप्स

Exit mobile version