spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

एकनाथ शिंदेंचं ठाकरेंच्या शिवसेनेला पत्र

शिवसेनेतून बंद करीत राज्याचे सध्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ( CM Eknath Shinde )  हे शिवनेतून ४० आमदार घेऊन वेगळे झाले.

शिवसेनेतून बंद करीत राज्याचे सध्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ( CM Eknath Shinde )  हे शिवनेतून ४० आमदार घेऊन वेगळे झाले. त्यांनतर एकनाथ शिंदे यांचा शिंदे गट आणि शिवसेनेचा ठाकरे गट असे जणू दोन गटच पडले. शिंदे गट (Shinde Group) आणि ठाकरे गट अश्या दोघांच्या चर्चा हळू हळू रंगू लागल्या आहेत. आणि त्यातच दोघांच्या वादाची ठिणगी आता सर्वोच्च न्यायालयात पोहचली आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाकडे तर सर्वांचेच लक्ष हे वेधले आहे. पण हे सर्व चालू असतानाच आता राज्याचे मुख्यमंत्री आणि शिंदे गटाचे प्रमुख एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेला एक पात्र लिहिले आहे. शिवसेनेच्या ठाकरे गटाचे प्रतोद सुनील प्रभू यांना हे पत्र लिहिलेलं आहे. या पत्राद्वारे त्यांनी चहापानासाठी शिवसेनेला आमंत्रित केलं आहे.

महाराष्ट्र विधानमंडळाचं पावसाळी अधिवेशन ( Monsoon Session of Maharashtra Legislature ) उद्या म्हणजे १७ ऑगस्टपासून सुरू होत आहे. त्या पार्श्वभूमीवर आता सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये तयारीला सुरुवात झाली आहे. आज संध्याकाळी हा चहापानाचा कार्यक्रम होणार असून त्यानंतर लगेचच राज्य मंत्रिमंडळाची बैठक होणार आहे. खातेवाटपानंतरची ही पहिलीच बैठक आहे. पावसाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला आयोजित चहापानाचं आमंत्रण या पत्राद्वारे देण्यात आलं आहे. या निमित्ताने महाराष्ट्राच्या विकासाच्या दृष्टीने आपल्याबरोबर अनौपचारिक, मनमोकळी चर्चा व्हावी, या हेतूने निमंत्रित करत असल्याचे देखील पत्रात लिहिलेलं आहे.

हे ही वाचा :-

हॅलो ऐवजी भाजपच्या ‘वंदे मातरम्’नंतर, आता काँग्रेसचं ‘जय बळीराजा’

दूध महागलं, अमूल व मदर डेरी दुधाच्या किंमतीत 2 रुपयांनी वाढ

Latest Posts

Don't Miss