एकीकडे आमचा बाप काढायचा आणि… एकनाथ शिंदेंचा मुख्यमंत्र्यांना सवाल

बंडखोर आमदारांविरुद्ध आदित्य ठाकरे आणि खासदार संजय राऊत यांच्याकडून टीका करण्यात आल्या.

एकीकडे आमचा बाप काढायचा आणि… एकनाथ शिंदेंचा मुख्यमंत्र्यांना सवाल

एकीकडे राज्यात राजकारण तापलेले असून, आज एकनाथ शिंदे आणि शिवसेना आमदारांच्या बंडाचा आज आठवा दिवस आहे. सत्ता संघर्षाची ही लढाई आता सर्वोच्च न्यायालयात गेली आहे. गेल्या काही दिवसात राज्यात अनेक घडामोडी घडताना दिसत आहे. नेते एकनाथ शिंदे यांचं बंड आता लांबणीवर पडत आहे हे ओळखून मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी शिंदे गटातील आमदारांना भावनिक साद घालण्याचे प्रयत्न सुरु केले आहेत. एकीकडे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आता रुग्णालयातून उपचार घेऊन परतले आहेत. राज्यातल्या राजकारणात आता पुन्हा ते लक्ष देऊ लागले आहेत. त्यामुळे राज्यातील राजकारणाला आता वेगळे वळण मिळत असल्याची चिन्ह दिसू लागली आहेत.

गेले अनेक दिवस शिंदे गटातील बंडखोर आमदारांविरुद्ध आदित्य ठाकरे आणि खासदार संजय राऊत यांच्याकडून टीका करण्यात आल्या. आणि आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी बंडखोर आमदारांना भावनिक आवाहन केल्याची माहिती एकनाथ शिंदे यांनी केलेल्या ट्विट वरून समजते आहे. कुटुंबप्रमुख म्हणून तुम्हाला मनापासून सांगतो अजूनही वेळ गेलेली नाही. माझं आपल्याला सगळ्यांना आवाहन आहे, आपण या माझ्यासमोर बसा, शिवसैनिकांच्या आणि जनतेच्या मनातील संभ्रम दूर करा असं उद्धव ठाकरेंनी बंडखोर आमदारांना सांगितलं आहे. शिवसेना पक्षप्रमुख आणि कुटुंबप्रमुख म्हणून आजही मला तुमची काळजी वाटत आहे अशी भावनिक साद त्यांनी बंडखोर आमदारांना घातली. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या या भावनिक आवाहनाला शिंदे यांना ट्विट करत उत्तर दिले आहे.

http://https://twitter.com/mieknathshinde/status/1541772741686468609?t=VTnnZbrjIfPKGySy5fJWRg&s=19

‘एका बाजूला आपल्या पुत्राने व प्रवक्त्याने वंदनीय बाळासाहेबांच्या शिवसैनिकांना डुक्कर, नाल्याची घाण, रेडा, कुत्रे, जाहील व मृतदेह म्हणायचे. त्यांचा बाप काढायचा आणि दुसऱ्या बाजूला मात्र हिंदूविरोधी महाविकास आघाडी सरकार वाचवण्यासाठी याच आमदारांना समेटाची हाक द्यायची, याचा अर्थ काय, असे ट्विट बंडखोर आमदार एकनाथ शिंदे यांनी केले आहे. या ट्विट मधून एकनाथ शिंदे यांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंना सवाल केला आहे.

आज संध्याकाळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी सगळ्या अधिकाऱ्यांसोबत एक बैठक घेतली. त्या बैठकीत ते आज राजीनामा देण्याची घोषणा करणार होते. पण शरद पवार यांनी त्यांना तसे करण्यापासून थांबवले. या आधीही शरद पवार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना राजीनामा देण्यापासून रोखले होते अशी माहिती मिळतेय.

Exit mobile version