spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

कामाख्या देवीच्या दर्शनानंतर एकनाथ शिंदेची प्रतिक्रिया, कामाख्या देवीच्या आशीर्वादाने महाराष्ट्रावरील संकट

राज्याच्या सत्तांतराच्या केंद्रस्थानी राहिलेल्या गुवाहाटीचं स्थान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि समर्थक आमदार यांच्यासाठी वेगळंच आहे. राज्यात सत्तांतर झाल्यानंतर पुन्हा एकदा एकनाथ शिंदे (बाळासाहेबांची शिवसेना) पक्षाचे आमदार आणि खासदार सहकुटुंब आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सोबत कामाख्या देवीच्या दर्शनासाठी गेले आहेत. दर्शनानंतर एकनाथ शिंदे यांनी माध्यमाशी संवाद साधला. एकनाथ शिंदे म्हणाले की, आज कामाख्या देवीच दर्शन घेतलं. मनोभावे सर्वांनी दर्शन घेतलं. सर्वांना आनंद आहे. खऱ्या अर्थाने कामाख्या देवीच्या आशीर्वादाने महाराष्ट्रावरील संकट दूर व्हावं. शेतकऱ्यांसह सर्व घटकांना सुख-समाधान मिळावं यासाठी आम्ही आलोय. आसामच्या मुख्यमंत्र्यांनी आमच्या स्वागतासाठी तीन मंत्र्यांना पाठवलं होतं. आसामचे मुख्यमंत्री आणि आसाम सरकारचे धन्यवाद.

यावेळी प्रसारमाध्यमांसी बोलताना एकनाथ शिंदे यांनी अभिनेते विक्रम गोखले यांना श्रद्धांजली अर्पण केली. आपल्या चतुरस्त्र अभिनयाने मराठी व हिंदी रंगभूमी तसेच चित्रपटसृष्टीत व रसिक प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजविणारे ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांच्या निधनाने अतीव दुःख झाले.त्यांचा जाण्याने भारतीय रंगभूमी व चित्रपटक्षेत्राचे कधीही न भरून येणारे नुकसान झाले, असे शिंदे म्हणाले.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी समर्थक आमदारांसह कामाख्या देवीच्या दर्शन घेतलं. तिथं मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पूजा झाली. त्यानंतर मंत्री, आमदार, खासदार यांनी देखील देवीचे दर्शन घेतलं. दर्शन झाल्यानंतर आता सर्वजण पुन्हा एकदा हॉटेल रेडिसन ब्ल्यू या हॉटेलमध्ये पोहचले आहेत. एकनाथ शिंदे आणि त्यांच्या समर्थक आमदारांना राहण्यासाठी जवळपास संपूर्ण रेडिसन ब्ल्यू हॉटेलच बुक करण्यात आले आहे. याच हॉटेलमध्ये सत्तांतराच्या काळात देखील मुख्यमंत्री आणि आमदार वास्तव्यास होते. संध्याकाळी आसामचे मुख्यमंत्री आणि एकनाथ शिंदे यांची भेट नियोजित आहे. यावेळी इतर महत्त्वाच्या व्यक्तींना देखील मुख्यमंत्री भेटण्याची शक्यता आहे. आज म्हणजेच, २६ तारखेला रात्री गुवाहाटी येथेच सर्वांचा मुक्काम असेल. दुसऱ्या दिवशी म्हणजेच २७ नोव्हेंबरला सकाळी ११ वाजता विशेष विमान पुन्हा एकदा सर्वांना घेऊन उड्डाण करेल आणि एक वाजेपर्यंत मुंबईमध्ये दाखल होईल.

हे ही वाचा : 

मुख्यमंत्री ४० रेड्यांचे बळी देण्यासाठी गुवाहाटीला गेले, बुलढाण्याच्या सभेतून संजय राऊतांच्या हल्लाबोल

Raj Thackeray मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची तोफ उद्या गोरेगावात धडाडणार

Follow Us
टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss