“जे गेले त्यांच्या रक्तात कधीच शिवसेना नव्हती” आदित्य ठाकरेंच्या टिकेला एकनाथ शिंदेंचे प्रत्युत्तर

“जे गेले त्यांच्या रक्तात कधीच शिवसेना नव्हती” आदित्य ठाकरेंच्या टिकेला एकनाथ शिंदेंचे प्रत्युत्तर

मुंबई : शिवसेना नेते व माझी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे हे सध्या शिवसंवाद यात्रेवर आहेत. तीन दिवसीय या शिवसेना यात्रेचा आरंभ आज भिवंडी येथून झाला. या शिवसंवाद यात्रे दरम्यान आदित्य ठाकरे महाराष्ट्रातील शिवसैनिक व नागरिकांशी थेट संवाद साधणार आहे. आगामी काळातील निवडणुकांवर लक्ष केंद्रित करत आदित्य ठाकरे शिवसेनेला पुन्हा एकदा जोमाने उभं करण्याच्या प्रयत्नात आहेत. आज एकनाथ शिंदे यांनी ज्येष्ठ शिवसेना नेते आणि खासदार गजानन कीर्तीकर यांची गोरेगाव येथील त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली. या भेटीनंतर प्रसाद राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे. या भेटीवर टीका करत आदित्य ठाकरे यांनी बंडखोर आमदारांवर टीका केली आहे.

आदित्य ठाकरे म्हणाले…

“आम्ही शिवसेनेच्या खासदार-आमदारांवर अंधविश्वास ठेवला तर त्यांनी आमच्याच पाठीत खंजीर खुपसला जे गेले त्यांच्या रक्तात कधीच शिवसेना नव्हती आयुष्यभर त्याच्या कपाळावर गद्दाराचा ठपका असेल”, अशी टीका आदित्य ठाकरे यांनी बंडखोर आमदारांवर केली.

मुख्यमंत्र्यांचे आदित्य ठाकरेंना प्रत्युत्तर

आदित्य ठाकरेंच्या टीकेला मुख्यमंत्र्यांनी प्रत्युत्तर दिले आहे ते म्हणाले, “आमचे सरकार कायदेशीर आणि बहुमतांचे होते. हे अडीच वर्ष सोडून पुढेही आमचेच सरकार असेल. बेकायदेशीर बोलून स्वतःचे समाधान करून घ्यायचे असेल तर करून घ्या, आम्ही घटनेनुसार आणि कायदेशीर सरकार स्थापन केलेले आहे. हा अडीच वर्षाचा कार्यकाळ हे सरकार पूर्ण करेल पण पुढच्या निवडणुकीत देखील हेच सरकार जिंकेल”, असे एकनाथ शिंदे यांनी म्हटले.

हेही वाचा : 

राष्ट्रपतीच्या निवडणुकीत द्रौपदी मुर्मू यांचा विजय

Exit mobile version