एकनाथ शिंदे यांनी केलेला बंड हा वैयक्तिक कारणासाठी…, राष्ट्रवादीने केले मोठे वक्तव्य

राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य प्रवक्ता महेश तपासे यांनी म्हटले की महाविकास आघाडी असताना एकनाथ शिंदे यांच्या गटाने केलेला बंड हा विकास कामाला निधी मिळत नसल्याच्या कारणामुळे करण्यात आला नव्हता तर वैयक्तिक कारणामुळे करण्यात आला होता

एकनाथ शिंदे यांनी केलेला बंड हा वैयक्तिक कारणासाठी…, राष्ट्रवादीने केले मोठे वक्तव्य

सध्या राज्याच्या राजकारणात अनेक मोठमोठ्या उलथापालथी या होत आहेत. दिनांक २ जुलै २०२३ रोजी राज्याच्या राजकारणात एक मोठी घडामोड ही घडली आणि त्यामुळे राज्यातील वातावरण हे पुन्हा एकदा अस्थिर झाले आहे. एक वर्षांपूर्वी एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेतून काढता पाय घेत बंड केला. आणि आता पुन्हा एक वर्षांनंतर राज्यात मोठा बंड हा झाला आहे. राष्ट्रवादीचे नेते म्हणून ओळखले जाणारे अजित पवार (Ajit Pawar) यांनी बंड केला आहे. अजित पवार यांच्यासह काही आमदारांनी शिंदे-फडणवीस सरकारला साथ देत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये (NCP) भूकंप घडवला. अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आणि त्यांच्यासोबत असलेल्या ८ आमदारांनीही मंत्रीपदाची शपथ घेतली. त्यांनतर राज्यात अनेक घडामोडी उया घडल्या आहे. आज राज्यात खातेवाटप हे करण्यात आले आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य प्रवक्ता महेश तपासे यांनी म्हटले की महाविकास आघाडी असताना एकनाथ शिंदे यांच्या गटाने केलेला बंड हा विकास कामाला निधी मिळत नसल्याच्या कारणामुळे करण्यात आला नव्हता तर वैयक्तिक कारणामुळे करण्यात आला होता. हे आज उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांना शिंदे फडणवीस सरकार मध्ये अर्थ मंत्रालय देण्यात आल्याने स्पष्ट झाले असे राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते महेश तपासे यांनी म्हटले आहे.

राज्यात महाविकास आघाडीचे सरकार असताना तत्कालीन अर्थमंत्री अजित पवार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेच्या आमदारांना विकास कामासाठी निधी देण्यात येत नव्हता म्हणून मंत्री एकनाथ शिंदे यांनी बंड करत पक्षातून ४० आमदार बाहेर पडत सरकारचा पाठिंबा काढला होता. मात्र आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सरकार मध्येच उपमुख्यमंत्री तथा अर्थ व नियोजन मंत्री म्हणून अजित पवार यांना देण्यात आले आहे. त्यामुळे हे स्पष्ट झाला की एकनाथ शिंदे यांच्या सोबत आलेल्या सर्व आमदारांनी केलेला बंड हा वैयक्तिक कारणासाठी होता. असे राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते महेश तपासे यांनी म्हटले आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सरकारमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांना अर्थ व नियोजन खात दिल आहे. त्यामुळे आता पुन्हा एकनाथ शिंदे यांच्या सोबत असलेल्या सर्व आमदारांना पुन्हा एकदा आता उपमुख्यमंत्री तथा अर्थ व नियोजन मंत्री अजित दादा पवार यांच्यासमोर जावं लागणार आहे. त्यामुळे शिंदे गटाकडून करण्यात आलेले आरोप आता निराधार झाले आहे. जो बंड करण्यात आला होता तो वैयक्तिक कारणामुळे करण्यात आले होता यावरून स्पष्ट झाले आहे असेही राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते महेश तपासे यांनी म्हटले आहे.

हे ही वाचा:

भारतातील सर्वात श्रीमंत क्रिकेटपटू तुम्हाला माहित आहे का? तेंडुलकर, कोहली आणि विराटला सुद्धा टाकले मागे

पंतप्रधान मोदी दोन दिवसीय फ्रान्स दौऱ्यावर

अशोक मामांबद्दल खुद्द निवेदिता सराफ यांनी केला खुलासा

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version