Tuesday, September 24, 2024

Latest Posts

रिक्षाच्या स्पीडपुढे मर्सिडीजचा स्पीड फिका पडला कारण… एकनाथ शिंदेचे ट्विट

मुंबई : महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री यांनी नुकतेच त्यांच्या सोशल मिडियावरील ट्विटर हान्डल एक बोचणारे ट्विट केले आहे, त्यात ते म्हणाले आहेत, रिक्षाच्या स्पीडपुढे मर्सिडीजचा स्पीड फिका पडला.. कारण हे सर्वसामान्यांचं सरकार!
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर या ट्विट्च्या माध्यमातून निशाणा साधला आहे.

 राज्याच्या विधानसभेत बहुमत चाचणीत शिंदे सरकारने यश प्राप्त केलं. यानंतर मुख्यमंत्र्यांच्या अभिनंदनाच्या प्रस्तावावर सर्व पक्षीय नेत्यांची भाषणं झाली. विविध नेत्यांकडून जोरदार भाषणं झाली. याच दरम्यान महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील रोखठोक भाषण केले आहे.

हेही वाचा : 

प्रसिद्ध ज्योतिष चंद्रशेखर गुरु यांची दोन अज्ञात व्यक्तींकडून निर्दयी हत्या

त्याच्या भाषनावर शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरेंनी खोचक टिका केली. ते म्हणाले, “काल रिक्षावाल्याची रिक्षा सुस्साट सुटली होती, ब्रेकच लागत नव्हता”. याला आता मुख्यमंत्र्यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. “रिक्षाच्या स्पीडपुढे मर्सिडीजचा स्पीड फिका पडला” असं म्हटलं आहे. त्याच बरोबर हे सर्वसामान्यांचं सरकार आहे असे म्हटले आणि MaharashtraFirst हा हॅशटॅग देखील वापरला आहे.

बसमधील जागेवरून दोघांचं भयंकर भांडण; व्हिडिओ झाला व्हायरल

Latest Posts

Don't Miss