मुंबई : महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री यांनी नुकतेच त्यांच्या सोशल मिडियावरील ट्विटर हान्डल एक बोचणारे ट्विट केले आहे, त्यात ते म्हणाले आहेत, रिक्षाच्या स्पीडपुढे मर्सिडीजचा स्पीड फिका पडला.. कारण हे सर्वसामान्यांचं सरकार!
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर या ट्विट्च्या माध्यमातून निशाणा साधला आहे.
रिक्षाच्या स्पीडपुढे मर्सिडीजचा स्पीड फिका पडला.. कारण हे सर्वसामान्यांचं सरकार!!#MaharashtraFirst
— Eknath Shinde – एकनाथ शिंदे (@mieknathshinde) July 5, 2022
हेही वाचा :
प्रसिद्ध ज्योतिष चंद्रशेखर गुरु यांची दोन अज्ञात व्यक्तींकडून निर्दयी हत्या
त्याच्या भाषनावर शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरेंनी खोचक टिका केली. ते म्हणाले, “काल रिक्षावाल्याची रिक्षा सुस्साट सुटली होती, ब्रेकच लागत नव्हता”. याला आता मुख्यमंत्र्यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. “रिक्षाच्या स्पीडपुढे मर्सिडीजचा स्पीड फिका पडला” असं म्हटलं आहे. त्याच बरोबर हे सर्वसामान्यांचं सरकार आहे असे म्हटले आणि MaharashtraFirst हा हॅशटॅग देखील वापरला आहे.