spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

एकनाथ शिंदेंच्या शिवसैनिकांनमुळे आज शिवसेना उभी आहे ; राणेंचे वक्तव्य

लघुउद्योग भारती संघटनेचे राज्यस्तरीय अधिवेशन मुंबई (विलेपार्ले) येथे होत आहे. कोरोना काळात हे अधिवेशन होऊ शकले नाही पण या वर्षी ते होत आहे. आज अधिवेशनाचा दुसरा दिवस होता त्यात केंद्रीय मंत्री नारायण राणे बोलत होते. त्या वेळी राणेंना आदित्य ठाकरे यांच्या संदर्भात प्रश्न विचारला असता आदित्य ठाकरेंना काही माहित नसते. ते बालिश आहेत. मला त्यांच्याबद्दल काही विचारु नका, असे वक्तव्य केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी केले आहे. राणे यांनी शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे याच्या वर सुद्धा ताशेरे ओढण्यात आले आहे. तसेच यावर्षी शिवाजी पार्कवर दसरा मेळावा हा एकनाथ शिंदे यांचाच होणार असा विश्वास व्यक्त केला.

PM Narendra Modi Birthday 2022 : मोदींच्या वाढदिवशी जन्मलेल्या बालकांना मिळणार ‘हि’ खास गोष्ट

मागील निवडणूक शिवसेना आणि भाजपा एकत्रित लढले होते पण त्यात उद्धव ठाकरे यांनी गद्दारी केली. गद्दारी करणे त्यांच्या रक्तात आहे म्हणून गद्दार गद्दार करत फिरत आहे. एकनाथ शिंदे एकच्या शिवसैनीकीन त्यांना साथ दिली म्हणून शिवसेना उभी राहिली आहे असे नारायण राणे यांनी म्हटले आहे. शिंदेंनी साहेबांना साथ दिली म्हणून शिवसेना उभी राहिली, ते लोणी आज आदित्य ठाकरे खात आहेत, असा घणाघात नारायण राणे यांनी ठाकरे यांना लावला.

लघुउद्योग भारती संघटनेचे राज्यस्तरीय अधिवेशन मुंबई (विलेपार्ले) येथे होत आहे. त्यात राज्यभरातून लघुउद्योजक सहभागी झाले आहेत. शहरासह ग्रामीण भागात लघुउद्योगांना चालना देण्यासाठी हे अधिवेशन महत्त्वाचे मानले जातेय. त्यात उद्योजक आपल्या विविध समस्या मांडतात. मागील दोन वर्षांपासून कोरोनामुळे हे अधिवेशन होऊ शकले नव्हते. या अधिवेशनाच्या दुसऱ्या सत्रात नारायण राणे यांनी मार्गदर्शन केले. आम्ही आमची मुंबई म्हणतो. पण आर्थिक उलाढालीत आपण मराठी एक टक्का नाही. आपल्या देशात मारवाडी १ टक्का आहे आणि उलाढाल किती २३ टक्के आहे. आपण म्हणतो मुंबई आमची पण आर्थिक उलाढालीत आपण फक्त एक टक्का आहे. जो राजकारणी स्वतः काही करत नाही तो दुसऱ्याच्या खिशात हात घालतो, असे वक्तव्य नारायण राणे यांनी केले. मी आधी उद्योजक मग राजकारणी आहे, असेही यावेळी राणेंनी सांगितलं. आपण आयात कमी करून निर्याती जास्त कशी करू शकतो याचं प्रशिक्षण दिले पाहिजे असे केंद्री लघु उद्योग मंत्री नारायण राणे यांनी म्हटले.

हे ही वाचा:

Rain Alert : राज्यभर मुसळधार पाऊस, तर पुढील ३ ते ४ तास मुंबईकरांसाठी सतर्कतेचे

पुण्यात आयोजित केलं अजब ‘सेक्स तंत्र’ प्रशिक्षण शिबीर,हिंदू महासभेचा विरोध

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss