Election Commission : हिमाचल, गुजरात निवडणुकीसंदर्भात केंद्रीय निवडणूक आयोगाची आज पत्रकार परिषद

केंद्रीय निवडणूक आयोगाची आज दुपारी पत्रकार परिषद होणार आहे. या पत्रकार परिषदेत हिमाचल प्रदेश आणि गुजरातमधील निवडणुकीची घोषणा होण्याची शक्यता आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने आज दुपारी ३ वाजता पत्रकार परिषद आयोजित केली आहे.

Election Commission : हिमाचल, गुजरात निवडणुकीसंदर्भात केंद्रीय निवडणूक आयोगाची आज पत्रकार परिषद

केंद्रीय निवडणूक आयोगाची आज दुपारी पत्रकार परिषद होणार आहे. या पत्रकार परिषदेत हिमाचल प्रदेश आणि गुजरातमधील निवडणुकीची घोषणा होण्याची शक्यता आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने आज दुपारी ३ वाजता पत्रकार परिषद आयोजित केली आहे. मागील काही दिवसांपासून हिमाचल प्रदेश आणि गुजरातमध्ये राजकीय पक्षांनी सभांचा धडाका लावला आहे.

कोरोनामुळे बऱ्याच निवडणुका झालेल्या नाहीत. महाराष्ट्रात अनेक महापालिकांचा कारभार सध्या प्रशासक चालवत आहेत. दुसरीकडे पोटनिवडणूक जाहीर झाल्या आहेत. त्यातच आता गुजरात आणि हिमाचल प्रदेशमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकांचे वेळापत्रक या महिन्यात दिवाळीपूर्वी जाहीर केले जाऊ शकते. निवडणूक आयोगाने निवडणुकीच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी दोन्ही राज्यांचा दौरा केला आहे. निवडणूक आयोग आता निवडणुकीचे वेळापत्रक निश्चित करण्याची तयारी करत आहे. यासाठी आयोगाच्या टीमने दोन्ही राज्यातील अनुकूल हवामान, शालेय परीक्षा, स्थानिक सण-उत्सव, शेती आणि इतर काही कार्यक्रमांवर लक्ष केंद्रित केले आहे.

साधारणपणे गुजरात आणि हिमाचल प्रदेशमध्ये एकाच वेळी विधानसभा निवडणुकांची घोषणा केली जाते. पण यावेळी जम्मू-काश्मीरचा बदललेला नकाशा आणि वाढलेल्या जागांमुळे या राज्यांच्या निवडणुकीचे वेळापत्रकही बदलेल, अशी अपेक्षा होती. आता अलीकडेच मुख्य निवडणूक आयुक्तांनी संकेत दिले होते की नोव्हेंबरमध्ये जम्मू-काश्मीरच्या उंच पर्वतीय भागात कडाक्याच्या थंडीमुळे, येथील विधानसभा निवडणुका पुढील वर्षी मार्चपर्यंत पुढे ढकलल्या जाऊ शकतात. हिमाचल प्रदेश आणि गुजरातमध्ये भाजपच्या नेतृत्वातील सरकार आहे. दोन्ही राज्यात भाजप विरोधात काँग्रेस अशी लढत आहे. मात्र, गुजरातमध्ये आम आदमी पक्षाच्या कामगिरीकडेही अनेकांचे लक्ष लागले आहे.

हे ही वाचा :

Rutuja Latke : अखेर BMC ने ऋतुजा लटके यांचा राजीनामा स्वीकारला

मोदींना ‘नीच व्यक्ती’ म्हणणाऱ्या आपच्या नेत्यावर स्मृती इराणी संतापल्या म्हणाल्या, ‘हे तोंडाचं गटार…’

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version