Eknath shinde : अखेर निवडणूक आयोगाचा निर्णय समोर, शिंदे गटाला ढाल तलवार चिन्ह आता मशाल विरुद्ध ढाल तलवार

Eknath shinde : अखेर निवडणूक आयोगाचा निर्णय समोर, शिंदे गटाला ढाल तलवार चिन्ह आता मशाल विरुद्ध ढाल तलवार

अखेर प्रतीक्षा संपली, निवडणूक आयोगाचा निर्णय समोर आला आहे. ज्याकडे संपूर्ण राज्यचे लक्ष होते, ते म्हणजे उद्धव ठाकरेंना मशाल तर एकनाथ शिंदेंना कोणते चिन्ह? तर, त्यांना ढाल तलवार हे चिन्ह निवडणूक आयोगाने दिले.

गेल्या अनेक दिवसांपासून शिवसेनेमध्ये शिंदे गट आणि ठाकरे गट यांच्यात वाद सुरु होते. सुरुवातील एकनाथ शिंदे बंड करून शिवसेनेमधून बाहेर पडले. त्यानंतर दसरा मेळाव्यावरून वाद झाले आणि अंधेरी पोट निवडणूकच्या पार्शवभूमीवर शिवसेना हे नाव धनुष्यबाण हे चिन्ह गोठवण्यात आले होते. आणि शिवसेना नाव वापरण्यास मनाई केल्यानंतर उद्धव ठाकरे गट आणि एकनाथ शिंदे गटाला कोणतं चिन्ह आणि नाव मिळतं याकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं. अखेर निवडणूक आयोगाने काल याबद्दलचा निर्णय दिला आहे. उद्धव ठाकरे गटाला ‘शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे’ हे नाव तर ‘मशाल’ हे चिन्ह मिळालं आहे. तर शिंदे गटाला ‘बाळासाहेबांची शिवसेना’ हे नाव मिळालं आहे. शिंदे गटाला चिन्ह हे मिळाले नव्हते. परंतु अखेर शिंदे गटाला ढाल तलवार हे चिन्ह निवडणूक आयोगाने दिले.

शिवसैनिकांचं मातोश्रीवर शक्तीप्रदर्शन, ‘गद्दारीला जाळणारी ‘मशाल’ ; ठाकरेंची प्रतिक्रिया

यापूर्वी शिंदे गटाकडून आयोगाला तीन चिन्हांचा पर्याय देण्यात आला होता. मात्र, ती चिन्हं देण्यास आयोगान नकार दिला. त्यानंतर आज सकाळी शिंदे गटाने निवडणूक आयोगासमोर तळपता सूर्य, ढाल-तलवार आणि पिंपळाचं झाड या तीन चिन्हांचा पर्याय ठेवला आहे. यात शिंदे गटाकडून ‘तळपता सूर्य’ चिन्हाला प्राधान्य असल्याचे सांगितले जात आहे. शिंदे गटाच्या या नव्या पर्यायांनंतर आता निवडणूक आयोग नेमका काय निर्णय घेणार आणि शिंदे गटाला कोणतं चिन्हं देणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

हेही वाचा : 

Balasahebanchi Shivsena : शिंदे गटाच्या ‘बाळासाहेबांच्या शिवसेने’च्या पहिल्या शाखेचे उद्घाटन

ठाकरे गटाला ‘शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे’ हे नाव मिळालं आहे. त्यांनी शिवसेना बाळासाहेब ठाकरे, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, शिवसेना प्रबोधनकार ठाकरे असे तीन पर्याय निवडणूक आयोगासमोर ठेवले होते. त्यापैकी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हे नाव ठाकरे गटाला मिळालं आहे. तर आता अंधेरी पोट निवडणुकीमध्ये ढाल तलवार विरुद्ध मशाल यांच्यात पहिला मिळेल.

काँग्रेस अध्यक्षपदासाठी १७ तारखेला टिळक भवन येथे मतदान; काँग्रेस कमिटीच्या सचिवांची माहिती

Exit mobile version