उपराष्ट्रपती पदाच्या मतदान प्रक्रियेला सुरुवात, जगदीप धनखड की मार्गारेट अल्वा, कोण बाजी मारणार?

उपराष्ट्रपती पदाच्या मतदान प्रक्रियेला सुरुवात, जगदीप धनखड की मार्गारेट अल्वा, कोण बाजी मारणार?

जगदीप धनखड की मार्गारेट अल्वा, कोण बाजी मारणार?

मुंबई : देशाच्या उपराष्ट्रपती पदासाठी आज निवडणूक पार पडणार आहे. 25 जून 2022 रोजी द्रौपदी मुर्मू या राष्ट्रपतीपदी विराजमान झाल्या. त्या देशातील आदिवासी वर्गातील पहिल्या महिला राष्ट्रपती ठरल्या आहेत. एका लक्षवेधी सोहळ्यामध्ये द्रौपदी मुर्मू नंतर आज देशात उपराष्ट्रपती पदासाठी निवडणूक होणार आहे. सध्याचे उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांचा कार्यकाळ 10 ऑगस्ट रोजी संपत आहे. आता उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत एनडीएचे उमेदवार माजी राज्यपाल जगदीप धनखड आहेत. तर विरोधी पक्षांनी काँग्रेस नेत्या मार्गारेट अल्वा या निवडणुकीच्या रिंगणात आहेत. त्यामुळे जगदीप धनखड उपराष्ट्रपती होणार की मार्गारेट अल्वा याकडे संपूर्ण देशाचे लक्ष आहे.

ही निवडणूक गुप्त मतदान करून घेण्यात येईल. मतदाराला उमेदवारांच्या नावासमोर पसंती दर्शवावी लागते. मतदारांनी मतदानाची गुप्तता पाळणे हे गरजेचे आहे. या निवडणुकीत खुल्या मतदानाची संकल्पना नसून अध्यक्ष आणि उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीत कोणत्याही परिस्थितीत कोणालाही मतपत्रिका दाखवण्यास सक्त मनाई आहे. या प्रणालीमध्ये, मतदाराला उमेदवारांच्या नावासमोर प्राधान्य चिन्हांकित करावं लागणार आहे.

हेही वाचा : 

मुंबईसह उपनगरात पावसाची रिपरिप सुरू, जाणून घ्या अपडेट

Exit mobile version