spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

निवडणूक अंधेरीत, पण प्रचार संपूर्ण मुंबईत; पक्षाने लढवली अनोखी युक्ती

निवडणूक आयोगाने ठाकरे आणि शिंदे दोन्ही गटांना वेगळी नावं आणि चिन्हं दिली आहे. त्यानंतर आता दोन्ही गटांकडून या चिन्हांचा जोरदार प्रचार करणं सुरू आहे.

निवडणूक आयोगाने ठाकरे आणि शिंदे दोन्ही गटांना वेगळी नावं आणि चिन्हं दिली आहे. त्यानंतर आता दोन्ही गटांकडून या चिन्हांचा जोरदार प्रचार करणं सुरू आहे. आगामी अंधेरी पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आपल्या चिन्हाच्या प्रचाराची एक अनोखी शक्कल ठाकरे गटाने लढवली आहे.

अंधेरी पूर्व विधानसभा निवडणुकीतून भाजपने (bjp) माघार घेतला असला तरी ही निवडणूक होणार आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे गटाच्या (uddhav thackeray) उमेदवार ऋतुजा लटके (rutuja latke) यांचा प्रचार सुरूच आहे. या निवडणुकीच्या निमित्ताने ठाकरे गटाकडून मशाल चिन्हं घरोघरी पोहोचवण्यावर भर दिला आहे. त्याचाच एक भाग म्हणून दिवाळीचं निमित्त साधून ठाकरे गटाने उटण्याच्या पाकिटातून मशाल हे निवडणूक चिन्हं घरोघरी पोहोचवण्यास सुरुवात केली आहे. विशेष म्हणजे केवळ अंधेरीतच नव्हे तर संपूर्ण मुंबईत उटण्याच्या पाकिटातून मशाल चिन्हं घरोघरी पोहोचवलं जात आहे. निवडणूक अंधेरीत जरी असली तरी मशाल चिन्हं मुंबईतील प्रत्येक घरात पोहोचवण्याच्या ठाकरे गटाच्या या कल्पनेची जोरदार चर्चा सुरू आहे.

विधानसभेची पोटनिवडणूक अंधेरी पूर्व या मतदारसंघापुरती असली तरी यानिमित्ताने शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटाने मशाल या निवडणूक चिन्हाचा संपूर्ण मुंबईत घराघरांत प्रचार करण्याचा विडा उचलला आहे. ठिकठिकाणी मशाल यात्रा काढण्यात येत असून दिवाळीच्या तोंडावर उटण्याच्या पाकिटाच्या माध्यमातून मशाल निवडणूक चिन्हाविषयी जागृती करण्यात येत आहे. कमी वेळात हे चिन्ह जनतेपर्यंत मतदारांपर्यंत पोहोचवण्याचं आव्हान समोर आहे. यासाठी ठाकरे गटाने मशाल हे चिन्ह असलेली उटण्याची पाकीटं तयार केली आहेत. दिवाळीच्या निमित्ताने ही पाकिटं वाटून घराघरात मशाल हे चिन्ह पोहोचवण्याचा प्रयत्न ठाकरे गटाकडून केला जात आहे.

प्रथमच उद्धव ठाकरे गट हा मशाल या चिन्हावर निवडणूक लढवणार आहे. त्यामुळे मशाल हे चिन्ह घरोघरी पोहोचवणे हे ठाकरे यांच्या शिवसेनेपुढील सर्वात मोठे आव्हान आहे. विविध विभागातील कार्यकर्ते सकाळ-संध्याकाळ घरोघरी फिरून मशाल या निवडणूक चिन्हाचा प्रचार करणार आहेत. पालिकेची निवडणूक अद्याप जाहीर झालेली नाही. उमेदवार कोण असतील हे ठरलेलं नाही. मात्र, त्यापूर्वीच निवडणूक चिन्हं घरोघरी पोहोचवण्यावर ठाकरे गटाचा भर आहे.

Latest Posts

Don't Miss