बारा बाजार समित्यांच्या निवडणुकांची राजकारण समीकरणे बदलली

नाशिकसह (Nashik) बारा बाजार समित्यांची निवडणुकांची जोरदार तयारी सुरु आहे या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीतील (Mahavikas Aaghadi) पक्षांनी भाजप (BJP), शिवसेना (ShivSena) पक्षाशी हातमिळवणी केल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.

बारा बाजार समित्यांच्या निवडणुकांची राजकारण समीकरणे बदलली

नाशिकसह (Nashik) बारा बाजार समित्यांची निवडणुकांची जोरदार तयारी सुरु आहे या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीतील (Mahavikas Aaghadi) पक्षांनी भाजप (BJP), शिवसेना (ShivSena) पक्षाशी हातमिळवणी केल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. तर राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांना ठाकरे गटाचे दराडे बंधूनी खुले आव्हान केले आहे. भुजबळ यांना आव्हान दिल्यामुळे येवल्यामध्ये राष्ट्रवादी विरुद्ध ठाकरे गट पाहायला मिळणार आहे आणि दिंडोरीमध्ये महाविकास आघाडी विरुद्ध सर्वपापक्षीय पॅनल उभे ठाकले आहे.

ग्रामीण राजकारणामधील महत्वाची निवडणूक म्हणून बाजार समिती निवडणुकीकडे पहिले जाते. परंतु राज्यामध्ये पक्षीय समीकरण महाविकास आघाडी विरुद्ध भाजप शिंदे गट असे असताना मात्र स्थानिक पातळीवर हे चित्र पूर्णतः बदलताना दिसत आहे. जळगावमध्ये महाविकास आघाडीतील पक्षांनी वेगवगेळे वाट भाजप आणि शिवसेना शिंदे गटाला सोबत दिली आहे. एकीकडे राज्यामध्ये काँग्रेस, राष्ट्रवादी, उद्धव ठाकरे गट एकत्र येत महाविकास आघाडी असताना दुसरीकडे स्थानिक पातळीवर मात्र वेगळ्या राजकीय समीकरणांच्या चर्चा रंगल्या आहेत. राज्यामध्ये भाजप शिवसेनेचे विरोधक म्हणून महाविकास आघाडी काम पाहत असताना बाजार समिती निवडणुकीमध्ये मात्र शह-काटशहाचे राजकारण सुरु आहे.

राज्यामध्ये भाजप शिवसेनेचे सरकार आहे तर महाविकास आघाडी विरोधक म्हणून काम पाहत आहेत आणि दुसरीकडे बाजार समिती निवडणुकांमध्ये महाविकास आघाडीमध्येच एकमत नसल्यामुळे वेगळेच समीकरण दिसत आहे. एकीकडे येवला मतदारसंघ हा छगन भुजबळ यांचा बालेकिल्ला या ठिकाणी स्वतः छगन भुजबळ मैदानामध्ये उतरून त्यांनी प्रचार दौरे केले आहेत. परंतु ठाकरे गटाचे नेते विरुद्ध पॅनलमध्ये असल्यामुळे भुजबळांची कोंडी झाली आहे. त्यामुळे राज्यातील राजकीय समीकरणे आणि स्थानिक पक्षीय समीकरणे बदलल्याने महाविकास आघाडीला विचार करावा लागणार असल्याचे दिसत आहे.

हे ही वाचा : 

“राज ठाकरे यांनी जसे त्यांच्या काकांवर लक्ष ठेवले तसे मी माझ्या काकांवर लक्ष ठेवेल”, अजित पवारांचे प्रत्युत्तर

वरळीच्या पोद्दार आयुर्वेद महाविद्यालयात विद्यार्थ्याचा मृत्यू

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

Exit mobile version