spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

अजित पवारांची रुग्णालयात सरप्राईज व्हिजीटनंतर कर्मचाऱ्यांची पळापळ

महाराष्ट्र राज्याचे विरोधी पक्ष नेते अजित पवार हे नेहेमी सरप्राईज व्हिजीटसाठी ओळखले जातात आणि पुन्हा एकदा असंच काही घडलं आहे. वेळ दुपारी दोनची…स्थळ बारामतीचे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे रुग्णालय…अचानक विरोधी पक्षनेते अजित पवार यांची एन्ट्री होते. रुग्णालयात सामसूम…..काही कर्मचाऱ्यांची पळापळ होते….महाविद्यालयाचे अधिष्ठाता हजर नाहीत म्हटल्यावर स्वत:च्या मोबाईलवरुनच अजित पवारांनी त्यांना फोन लावला. आज सुट्टी आहे का? असा प्रश्न त्यांना विचारल्यानंतर आज सुट्टी नाही, असा खुलासा अधिष्ठाता यांनी अजित पवारांजवळ केला. मग मात्र अजितदादांनी चांगलीच खरडपट्टी काढली.

बारामतीच्या शासकीय रुग्णालयातील डॉक्टर दर शनिवारी सुट्टी घेतात, अशा तक्रारी अजित पवार यांच्याकडे गेल्या होत्या. त्याची खातरजमा करण्यासाठी अजित पवार यांनी कोणालाही कसली कल्पना न देता थेट रुग्णालय गाठल्यानंतर त्यांनाही कमालीचा धक्काच बसला. सुटी नसताना एकही डॉक्टर कामावर हजर नाही हे पाहून अजित पवार कमालीचे नाराज झाले. कोट्यवधींचा खर्च करुन इतक्या प्रशस्त इमारती उभ्या करुनही रुग्णांना सेवाच मिळत नसेल तर अर्थ नाही, अशा शब्दांत त्यांनी नाराजी व्यक्त केली.

डॉक्टरच जागेवर नसतील तर रुग्णांवर औषधोपचार करणार कोण, असा प्रश्न उपस्थित करत हा विषय त्यांनी गांभीर्याने घेतला. आगामी काळात मी स्वत: येऊन या सगळ्या बाबींचा आढावा घेणार. प्रसंगी काही जणांना निलंबित करण्याची शिफारस करावी लागली तरी चालेल पण शिस्त लागायला हवी, अशा स्पष्ट शब्दात त्यांनी अधिकाऱ्यांना तंबी दिली. दरम्यान आजच्या अनुपस्थितीबाबतही सविस्तर माहिती घेण्याची सूचना अजित पवारांनी त्यांचे विशेष कार्यकारी अधिकारी हनुमंत पाटील यांना केली.

हे ही वाचा : 

ठाण्याची शिवसेना २० वर्षे मागे गेली आहे का ?| Thane’s ShivSena gone back 20 years?

Shivsena | हा एकमेव असा नेता होता की, त्यांनी कधी स्वार्थ बघितला नाही | Kedar Dighe

Follow Us
टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss