बाळासाहेब ठाकरे यांच्या चित्र अनावरणानंतर तरी त्यांना त्यांची चूक कळूदे, आदित्य ठाकरेंचा शिंदेगटावर हल्लाबोल

आज औरंगाबादेत अंबादास दानवे यांच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या हिंदुहृदसम्राट चषकाचे उद्घाटन करण्यात आले.

बाळासाहेब ठाकरे यांच्या चित्र अनावरणानंतर तरी त्यांना त्यांची चूक कळूदे, आदित्य ठाकरेंचा शिंदेगटावर हल्लाबोल

शिवसेना कुणाची या वादाव्यतिरिक्त, सध्या हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतनिमित्त होणाऱ्या तैलचित्राचे अनावरण लवकरच होणार आहे आणि त्यामुळे ठाकरे आणि शिंदे गट पुन्हा एकदा आमने-सामने आला आहे. आज औरंगाबादेत अंबादास दानवे यांच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या हिंदुहृदसम्राट चषकाचे उद्घाटन करण्यात आले. हे उद्घाटन शिवसेनेचे युवानेते आदित्य ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी आदित्य ठाकरेंनी शिंदे गटावर चांगलेच ताशेरे ओढल्याचे दिसून आले. एकनाथ शिंदे जर आज इथे आले असते तर आम्हीही मॅच खेळलो असतो आणि आम्हीच आधी षटकार मारला असता, असा टोला त्यांनी शिंदे गटाला लगवला. तसेच, बाळासाहेब ठाकरे यांच्या तैलचित्र अनवरणानंतर तरी यांना यांची चूक कळुदे आणि यांना बुद्धी येऊदे. काही लोकांच्या राक्षसी महत्त्वकांक्षेमुळे राज्य मागे चालले आहे, अशा शब्दात आदित्य ठाकरेंनी शिंदे गटावर हल्ला चढवला.

वंचित बहुजन आघाडी आणि शिवसेना (ठाकरे गट) यांच्या युतीबाबत बोलताना आदित्य ठाकरे म्हणाले की, महाराष्ट्राच्या हितासाठी, राज्याचा आवाज वाढवण्यासाठी आणि संपूर्ण समाजाच्या एकत्रीकरणासाठी ही युती आवश्यक आहे आणि त्याचमुळे दोन्ही पक्षांनी एकत्र येणे गरजेचे आहे. दाओस कंपन्यांसोबत एमओयू झाला. त्यात तीन कंपन्या महाराष्ट्रातील असल्याचं समोर आलं. याची सर्व माहिती मी काढणार असल्याचं आदित्य ठाकरे म्हणाले. त्यानंतर पत्रकार परिषद घेणार असल्याचंही ते म्हणाले.

जे गेलेत त्यांना डिसक्वालीफाय होणारचं आहेत. कायद्यात त्यांना वाचविण्यासाठी तरतूद नाही. न्याय हा मिळणार आहे. निवडणुका जवळ आल्यावर सर्व कळेल. जे गद्दार झाले त्यांना व्हीआरएस घ्यायला लावला आहे. त्यांना कुठल्याही सीट मिळणार नाही, असा आरोपही आदित्य ठाकरे यांनी केला.

हे ही वाचा:

Budget 2023 पर्यटन क्षेत्र देशाच्या अर्थव्यवस्थेचा आहे महत्त्वाचा भाग, जाणून घ्या काय आहेत पर्यटन क्षेत्राच्या अर्थसंकल्पाकडून अपेक्षा

‘बिग बॉस मराठी’ फेम विकास सावंत करतोय ऑलिम्पिकची तयारी, म्हणाला, माझी ताकद…

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version