Saturday, September 7, 2024

Latest Posts

याआधीसुद्धा शिवसेनेकडे होते मशाल हे चिन्ह; असा आहे इतिहास…

१९८५ साली बाळासाहेब ठाकरे यांनी स्वबळावर महापालिका निवडणूक लढविण्याचे ठरविले आणि त्यावेळी पण चिन्ह मिळाले होते

गेल्या अनेक दिवसांपासून शिवसेनेमध्ये शिंदे गट आणि ठाकरे गट यांच्यात वाद सुरु होते. सुरुवातील एकनाथ शिंदे बंड करून शिवसेनेमधून बाहेर पडले. त्यानंतर दसरा मेळाव्यावरून वाद झाले आणि अंधेरी पोट निवडणूकच्या पार्शवभूमीवर शिवसेना हे नाव धनुष्यबाण हे चिन्ह गोठवण्यात आले होते.

अंधेरी पोट निवडणूका शिंदे आणि ठाकरे गटाला लढवता याव्यात म्हणून तात्पुरत्या स्वरूपावर नवे नाव आणि चिन्ह निवडण्याचे निर्देश निवडणूक आयोगाने दोन्ही गटांना दिले. ठाकरेंनी निवडणूक आयोगाकडे मशाल, त्रिशुळ आणि उगवता सूर्य हे चिन्हांचे पर्याय मांडले होतं. तर, शिंदे गटाकडून ठाकरेंप्रमाणे त्रिशूळ आणि उगवत्या सूर्याची मागणी केली. तर तिसरा पर्याय म्हणून गदा हे चिन्ह दिलं. शिवसेना नाव वापरण्यास मनाई केल्यानंतर उद्धव ठाकरे गट आणि एकनाथ शिंदे गटाला कोणतं चिन्ह आणि नाव मिळतं याकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं.

त्यानंतर निवडणूक आयोगाने ठाकरे गटाला शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) असं नाव वापरण्यास परवानगी दिलेली आहे. तर शिंदे गटाला ‘बाळासाहेबांची शिवसेना’ असं नाव मिळालेलं आहे. तर, ठाकरे गटाला मशाल हे निवडणूक चिन्ह देण्यात आलं आहे. शिंदे गटाला चिन्हांसाठी पर्याय सादर करण्यास सांगितलं आहे.

असा आहे शिवसेना आणि मशालीचा इतिहास:

शिवसेनेकडे याआधी मशाल हे चिन्ह होते. छगन भुजबळ नगरसेवक पदासाठी १९८५ साली उभे असताना त्यांना मशाल हे चिन्ह मिळाले होते. २ मार्च १९८५ ला विधानसभेची निवडणूक झाली आणि भुजबळ मशाल चिन्हावर शिवसेनेचे एकमेव आमदार झाले. १९८५ साली बाळासाहेब ठाकरे यांनी स्वबळावर महापालिका निवडणूक लढविण्याचे ठरविले आणि त्यावेळी पण चिन्ह मिळाले होते. मशाल या चिन्हावर शिवसेनेचे ७४ नगरसेवक निवडून आले आणि शिवसेनेची महापालिकेत सत्ता आली

हे ही वाचा:

चिन्ह आणि नावावर शिंदे गटाचे नरेश म्हस्के आणि भारत गोगावले यांची प्रतिक्रिया

Shivsena Uddhav Balasaheb Thackeray : ठाकरे गटाकडून शिवसेनेच्या नव्या नावासह चिन्हाचे पोस्टर जाहीर

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss