Gujarat Election Result गुजरात विधानसभा निवडणुकीच्या निकालापूर्वीच भाजप कार्यकर्त्यांकडून विजयी पताका

Gujarat Election Result गुजरात विधानसभा निवडणुकीच्या निकालापूर्वीच भाजप कार्यकर्त्यांकडून विजयी पताका

८ डिसेंबर रोजी गुजरात निवडणुकीचा निकाल २०२२ झाला. सकाळी ८ वाजल्यापासून गुजरात विधानसभा निवडणुकीची (Gujurat Assembly election 2022) मतमोजणी सुरू करण्यात आली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे गृहराज्य असलेल्या गुजरात राज्यात भाजपने सत्ता स्थापन केल्यास एका विक्रमाची बरोबरी ठरेल. भाजप (BJP winner) सलग सातव्यांदा विधानसभा निवडणूक जिंकणार आहे. तथपूर्वी गुजरात मध्ये निकाल हाती येण्याआधीच भाजप कार्यकर्त्यांकडून विजयी पताका लावण्यात आल्या. गुजरातमध्ये भाजाप कार्यकर्त्यांचा जल्लोष सुरु आहे. गाणी, ढोल ताशे, आणि हातात भाजप पक्षाचा झेंडा घेऊन उत्साह दाखवत आहे.

हेही वाचा : 

 Pune news  छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल राज्यपालांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्याचा निषेध करण्यासाठी आज पिंपरी चिंचवड बंद

आतापर्यंतचा जो निकाल समोर येत आहे यावरून गुजरातमध्ये भाजपा मोठा विजय (Gujarat Election Result) मिळवणार असं दिसतय. या रेकॉर्डब्रेक विजयाचं भाजपकडून जोरदार सेलिब्रेशन होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी संध्याकाळी ६.३० वाजता दिल्ली भाजपा मुख्यालयात जाणार असल्याची माहिती आहे. त्याआधी केंद्रीय मंत्री अमित शाह भाजपा कार्यालयात पोहोचतील. पीएम मोदी संध्याकाळी भाजपा कार्यकर्त्यांना संबोधित करतील.

संजय राऊत यांना जीवे मारण्याची धमकी

गुजरातमध्ये सध्या भाजप १४९ पेक्षा अधिकच्या जागांवर आघाडीवर आहे. तर काँग्रेस २० जागांवर आघाडीवर आहे. मात्र आम आदमी पक्ष केवळ ८ जागांवर आघाडीवर आहेत. नुकतंच ईव्हीएम मशिनवरील मतमोजणी सुरु झालेली आहे. त्यामुळे जागांमध्ये फरक पडू शकतो. मात्र पहिले कल हाती आलेले असून ‘आप’ मागे पडलेलं आहे. आम आदमी पक्षाने यावेळी गुजरामध्ये ताकद लावली होती. दिल्ली आणि पंजाबमधील त्यांचे मंत्री गुजरातमध्ये ठाण मांडून होते. पक्षाच्या दिग्गज नेत्यांनी गुजरातचे अनेक दौरेही केले. मात्र म्हणावं तस यश सध्या दिसून येत नाहीये.

Gujarat, Himachal Election Result 2022 गुजरातमध्ये भाजप १५० जागांवर पुढे, तर हिमाचलमध्ये काँग्रेस देतोय तोडीस तोड स्पर्धा

गुजरातेतल्या विधानसभेच्या १८२ जागांमध्ये बहुमतासाठी ९२ जागांची गरज असते. २०१७मध्ये भाजपने ९९ जागांवर विजय मिळवला होता. तर काँग्रेसने ७७ जागांवर. ६ जागांवर अपक्षांनी बाजी मारलेली. मध्य गुजरातमध्ये ६८ जागा आहेत. सौराष्ट्र आणि कच्छमध्ये ५४, उत्तर गुजरातमध्ये ३२ आणि दक्षिण गुजरातमध्ये २८ विधानसभा मतदारसंघ आहेत.

Gujarat Election Result 2022 गुजरातमध्ये भाजपनं शतक गाठलं १२२ तर, काँग्रेस – ४७ व आप – ३ 

Exit mobile version