५० रुपये जरी दिले असतील ना तर मी राजीनामा देईन , दीपक केसरकारांचे वक्तव्य

सध्या पावसाळी अधिवेश सुरू आहे. पावसाळी अधिवेशनाच्या (maharashtra monsoon session) पार्श्वभूमीवर विरोधक चांगलेच आक्रमक झाल्याचे पहायाला मिळत आहे.

५० रुपये जरी दिले असतील ना तर मी राजीनामा देईन , दीपक केसरकारांचे वक्तव्य

सध्या पावसाळी अधिवेश सुरू आहे. पावसाळी अधिवेशनाच्या (maharashtra monsoon session) पार्श्वभूमीवर विरोधक चांगलेच आक्रमक झाल्याचे पहायाला मिळत आहे. विरोधकांकडून सत्ताधाऱ्यांविरोधात जोरदार घोषणबाजी करण्यात येत आहे. १७ ऑगस्ट पासून पावसाळी अधिवेश हे चालू झाले आहे. आज अधिवेशनाचा पाचवा दिवस रंगणार आहे आणि अवघे २ दिवस हे उरले आहे. विधानसभाचे पावसाळी अधिवेशन हे १७ ऑगस्ट ते २५ ऑगस्ट पर्यंत चालणार आहे. एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या शिवसेनेतील बंडामुळं महाविकास आघाडीचे सरकार कोसळलं. त्यानंतर शिंदे-फडणवीस सरकार स्थापन झाले आहे. शिंदे-फडणवीस सरकारचं हे पहिलंच अधिवेशन आहे.

अधिवेशनाच्या पहिल्या दिवसापासून विरोधकांनी पायऱ्यांवर आंदोलन करत पन्नास खोके एकदम ओके तर खाऊन खाऊन पन्नास खोके, माजलेत बोके माजलेत बोके…” अशी घोषणा देताना दिसत आहे. या घोषणाबाजीचे पडसाद विधानसभेत उमटले. राष्ट्रवादी नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांनी विधानसभेत घोषणाबाजीचा मुद्दा उपस्थित केला. मुख्यमंत्री निवडीमध्येही आणि वर्तमानपत्रात जे वाचतो ते या ठिकाणी घोडेबाजर होता की बैलबाजार, जे म्हटलं गेलं की खोके खोके एकदम ओके ओके ते काय होतं. म्हणचे खरं असेल की खोटं असेल मला माहिती नाही. पण माध्यमांच्या माहितीनुसार, हे सर्व खरं आहे. एकनाथ खडसेंच्या या वक्तव्यानंतर दीपक केरकरांनी (deepak kesarkar) प्रत्युत्तर दिले आहे. ५० खोके सोडा ५० रुपये जरी दिले असतील ना तर मी राजीनामा देईन. आम्ही आमच्या तत्तवासाठी भांडलो आहोत. तत्त्वासाठी भांडण आणि त्यांना डिवचंण यामध्ये काहीच शंका नाही. सत्ता गेल्याने विरोधकांना दुःख झाल आहे. परंतु वाईट वाटताना दुसऱ्याला किती बदनाम करावं यालासुद्धा मर्यादा असतात. आणि आपण पायऱ्यांवर बसला कधीही आक्षेप घेतला नाही. असे केसरकरांनी विरोधकांना सुनावलं.

विरोधकांकडून अधिवेशनाच्या पहिल्या दिवसापासून सत्ताधारी पक्ष विरोधात फिफ्टी फिफ्टी, चलो गुवाहाटी चलो गुवाहाटी… ईडी सरकार हाय हाय… पन्नास खोके, पन्नास खोके, खाऊन खाऊन माजलेत बोके… आणि आले रे आले, गद्दार आले, अशा घोषणा देताना दिसत आहे.

हे ही वाचा :-

विरोधक आणि सत्ताधाऱ्यांमध्ये चार दिवस रंगले, उरले फक्त २ दिवस !

अस्वस्थ करणाऱ्या अशा ब्लॅकहोलमधील ध्वनीलहरी नासाने केल्या कॅप्चर

 

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version