जरी शिंदेंसोबत असलो तरी, मिलिंद नार्वेकरांबद्दल वाईट चितलं जाणार नाही – उदय सामंत

गेल्या काही दिवसात मुख्यमंत्री आणि शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर यांच्यात जवळीक वाढताना दिसत आहे. त्यांच्या गाठीभेटीही वाढलेल्या दिसून आल्या.

जरी शिंदेंसोबत असलो तरी, मिलिंद नार्वेकरांबद्दल वाईट चितलं जाणार नाही – उदय सामंत

गेल्या काही दिवसात मुख्यमंत्री आणि शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर यांच्यात जवळीक वाढताना दिसत आहे. त्यांच्या गाठीभेटीही वाढलेल्या दिसून आल्या. गणेशोत्सवाच्या दरम्यान एकनाथ शिंदे हे नार्वेकर यांच्या घरी दर्शनासाठी गेले होते.

दरम्यान राज्य सरकारकडून मविआच्या अनेक दिग्गज नेत्यांच्या सुरक्षेत कपात केली पण मिलिंद नार्वेकर यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली. अशातच शिंदे गटाकडून नार्वेकर यांचं कौतुक करण्यात आलं आहे. दरम्यान पुन्हा मिलिंद नार्वेकर शिंदे गटात जाणार का? या चर्चा राजकारणात रंगू लागल्या. अशातच राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनीदेखील आज मिलिंद नार्वेकर यांच्याबद्दल वक्तव्य केलं आहे.

‘मी शिवसेनेत येण्याआधी मिलिंद नार्वेकर यांनी माझी उद्धव ठाकरे यांची भेट घालून दिली होती. ते सर्वाना मदत करता. आम्ही सदैव मिलिंद नार्वेकरांसोबत आहोत, मिलिंद नार्वेकर शिंदे गटात येत असतील तर त्यांचं स्वागत करू असं वक्तव्य उदय सामंत यांनी केलं आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आलं आहे.

पुढे बोलताना उदय सामंत म्हणाले की. ‘आम्ही जरी आज तरी मिलिंद नार्वेकर यांच्यासोबत नसलो तरी त्यांच्याबद्दल आम्हाला आदर आहे. प्रत्येक माणसाला मदत करणारी ती व्यक्ती आहे. मलादेखील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून शिवसेनेत आणण्यात आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घडवून देण्यात मिलिंद नार्वेकर अग्रेसर होते. त्यामुळे आम्ही जरी शिंदेंसोबत असलो तरी मिलिंद नार्वेकर यांच्याबद्दल आमच्याकडून वाईट चितलं जाणार नाही. मिलिंद नार्वेकर यांनी एकनाथ शिंदे यांनादेखील राजकीय ताकद दिली होती”, असं म्हणत उदय सामंत यांनी एक प्रकारे नार्वेकर यांचं कौतुकच केलं आहे.

Exit mobile version