सगळं काही भाजपचंच

येत्या निवडणुकीच्या तोंडावर राज्यात प्रत्येक पक्षाकडून बैठकांचे आयोजन करण्यात येत आहे. यामध्ये प्रामुख्याने प्रत्येक पक्षाच्या कार्यकर्त्यांचा आणि बड्या नेत्यांचा समावेश पाहायला मिळत आहे.

सगळं काही भाजपचंच

येत्या निवडणुकीच्या तोंडावर राज्यात प्रत्येक पक्षाकडून बैठकांचे आयोजन करण्यात येत आहे. यामध्ये प्रामुख्याने प्रत्येक पक्षाच्या कार्यकर्त्यांचा आणि बड्या नेत्यांचा समावेश पाहायला मिळत आहे. पक्षाकडून पक्ष बांधणी , कार्यकर्त्यांची आढावा बैठक, पक्षाची रणनीती कशी असली पाहिजे या संदर्भात चर्चा देखील घेतल्या जात आहेत. त्याचबरोबर येणारी आगामी निवडणुकांच्या वेळी आपल्यला कोणती रणनीती आखली पाहिजे या संदर्भात माहिती हि पक्षाकडून तळागाळातल्या कार्यकर्त्यांपर्यंत पुरावली जात आहे. तसेच भाजपकडून देखील जय्यत तयारी होताना बघायला मिळत आहे.

भारतीय जनता पक्षाकडून पालघर,ठाणे आणि कल्याण मतदार संघात कशी रणनीती आखली गेली पाहिजे यासाठी महाजनसंपर्क अभियान या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे आयोजन काशिनाथ घाणेकर सभागृहात करण्यात आले होते. तसेच या कार्क्रमाला ताब्बॉल १२०० लोकांचा समावेश होता तर यामध्ये ३० % महिलांचे देखील समावेश होता. या कार्क्रमाचा महत्वाचा उद्देश असा होता की , येणाऱ्या आगामी लोकसभा निवडणुकीच्या मुहूर्तावर भाजपाची सत्ता होई या तीन राज्यात कायम ठेवता अली पाहिजे. कारण एकंदर पालघर, ठाणे आणि कल्याण या तीन मतदार संघांचा इतिहास बघता या पूर्वीपासूनच याठिकाणी भाजपाची सत्ता कायम होती. त्यामुळे आता मात्र शिंदे फडणवीस सरकार स्थापन केल्या पासून याठिकाणी भाजपचेच सत्ता कतयं राखावी या साठी रणनीती ही केंद्र कडून आखली जात आहे. तसेच रवींद्र चव्हाण यांनी भाषणाच्या वेळी लोकांना जास्तीत जास्त प्रमाणात मतदान करावे असे आव्हाहन करण्यात आले. आपल्या जबाबदारीची जाणीव करून देत प्रत्येक नागरिकाने वोटिंग केलेच पाहिजे. उदाहरण देताना किमान ५०० मतदारांपैकी पैकी ३५०मतदारांनी तरी मतदान करावे असे रवींद्र चव्हाण म्हणले. कल्याण डोंबिवली मतदारसंघाची धुरा रवींद्र चव्हाण यांनी ताच्या खांद्यावर उचलली होती अनीती त्यानी पार देखील पडली म्हणून रवींद्र चव्हाण यांच्या कडून लोकांप्रती त्यांनी त्यांच्या भावना व्यक्त केल्या.

या कार्क्रमाच्या वेळी पालघर, ठाणे आणि कल्याण हा जिल्हा भारतीय जनता पक्षाचा होता असा दावा संजय केळकर यांच्या कडून केला जात आहे. ठाणे २०१४ च्या निवडणुकीचे दाखले देत संजय केळकर यांनी मोदींच्या अध्यक्षतेखाली अनेक लोक हे निवडणुकीत पुढं गेले असा देखील दावा यावेळी त्यांच्या कडून कारण्यात आला तसेच या भाजपकडून या तिन्ही मतदारसंघात कोणीही निवडून आले नाही पाहिजे अवधी ताकद या पक्षाकडे आहे असे त्यांनी मत व्यक्त केले आहे. नरेंद्र मोदींच्या योजनांचा आपण आणखीन लाभ घेतला असता तर जास्त कौतुक वाटलं असत असं देखील संजय केळकर म्हणाले. तसेच मोदींच्या योजना ह्या फक्त भाजपकडूनच राबल्या गेल्या बाकी कोणत्याही पक्षाकडून लोकांपार्यंत राबवल्या गेल्या नाहीत . असे ठाम मत यावेळीही व्यक्त केले. या कार्यक्रमाच्या वेळी रवींद्र चव्हाण, संजय केळकर, गिरीश महाजन, मंगल प्रभातसिंग लोढा, गणेश नाईक, मंद म्हात्रे , गीता जैन, निरंजन डावखरे, यासारख्या बड्या नेत्यांचा समावेश होता.

हे ही वाचा:

संजय शिरसाटांच्या वक्तव्यावर केदार दिघेंनी दिली प्रतिक्रिया

आनंद परांजपे यांनी श्रीकांत शिंदेंवर केली टीका

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version