spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

भाजप बड्या नेत्याच्या विधानाने खळबळ; राष्ट्रवादीच्या ‘या’ नेत्याच्या घरावर लागणार भाजपचा झेंडा

शिवसेना फुटल्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेस (ncp) फुटणार असल्याची चिन्हे हळू हळू दिसत आहेत. गेल्या काही दिवसांपासून तशी चर्चा सुरू आहे.

शिवसेना फुटल्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेस (ncp) फुटणार असल्याची चिन्हे हळू हळू दिसत आहेत. गेल्या काही दिवसांपासून तशी चर्चा सुरू आहे. त्यातच आता भाजपचे नेते आणि आमदार गोपीचंद पडळकर (gopichand padalkar) यांनी त्याबाबतचं विधान केल्याने आणखीनच खळबळ उडाली आहे. पडळकर यांनी थेट राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (jayant patil) यांच्या घरावर येत्या काही दिवसात भाजपचा झेंडा फडकताना दिसेल, असं मोठं विधान केलं आहे. पडळकर यांच्या या विधानामुळे भाजप राष्ट्रवादीला फोडणार की काय? अशी चर्चा रंगली आहे. गोपीचंद पडळकर सांगली येथील एका सभेला संबोधित करत होते. त्यावेळी त्यांनी हे विधान केलं.

राष्ट्रवादीचे ९० टक्के कार्यकर्ते म्हणतील आता आपल्याला भाजपात जावं लागेल. मग मुंबईतील जे राष्ट्रवादीचं प्रदेश कार्यालय आहे. तिथे नेमका झेंडा कुणाचा लागावा असा त्यांच्यात वाद होईल. त्यामध्ये बहुमताने लोकं म्हणतील आता भाजपमध्येच जाऊया. आता काही पुढं राहिलं नाही, असा दावाही त्यांनी केला. पडळकर यांच्या या दाव्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. भाजपचा झेंडा आज राष्ट्रवादीच्या कार्यालयावर लागतो. मी विश्वासाने सांगतो हाच भाजपचा झेंडा येत्या काही काळात राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटलांच्या घरावर दिसेल, असं गोपीचंद पडळकर म्हणाले.

गोपीचंद पडळकर यांच्या या विधानावर राष्ट्रवादीचे नेते रोहित पवार यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. शिवसेना मोठा पक्ष होता. त्यांच्यावर वेगवेगळ्या पद्धतीने दबाव आणून हा पक्ष फोडला. त्यांचं दुसरं टार्गेट राष्ट्रवादी असू शकते असं मी बोललो होतो, असं रोहित पवार म्हणाले. राष्ट्रवादी फोडणं सोप्पं नाही. शरद पवारांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही काम करतो. कुटुंब म्हणून आम्ही काम करतो. त्यांनी कितीही प्रयत्न केले तरी त्यांना यश येणार नाही. पण त्यांना लोकशाही माहीत नाही. ठोकशाही माहीत आहे. त्यामुळे त्यांचं दुसरं लक्ष्य कदाचित राष्ट्रवादी असेल, असंही रोहित पवार म्हणाले.

हे ही वाचा:

शिवाजी पार्कमध्ये मागील १० वर्षांपासून रोषणाई होत आहे, यात नवे काही नाही; किशोरी पेडणेकर

Bigg Boss 16 : विकेंड वारमध्ये करण जोहर संतापला, ‘या’ सदस्याची घेतली चांगलीच हजेरी

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss