spot_img
Sunday, September 22, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

Exclusive, बळीराजाच्या संदर्भामध्ये शासन गांभीर्य आहे, देवेंद्र फडणवीस

आजपासून पावसाळी अधिवेशनाला सुरुवात झाली आहे आणि यामध्ये २०२३-२४ च्या मागण्या सादर करण्यात येणार आहेत.

आजपासून पावसाळी अधिवेशनाला सुरुवात झाली आहे आणि यामध्ये २०२३-२४ च्या मागण्या सादर करण्यात येणार आहेत. आजपासून विधानसभेचे कामकाज सुरु झाले आहे. आज अधिवेशनमध्ये विरोधकांनी आज अनेक ठिकाणी पावसाची कमतरता आहे यावर प्रश्न उपस्थित केला आहे आणि यावर उपमुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस म्हणाले की, विरोधी पक्षाला योग्य आयुध असतात हे आणि ते त्यांना मांडता देखील येतात. आज जो त्यांनी प्रश्न उपस्थिती केला आहे त्याचे शासनाला गांभीर्य आहे. राज्यामध्ये कालच मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली आम्ही आढावा घेतला हे खरं आहे काही भागामध्ये पाऊस कमी आहे काही भागांमध्ये पेरण्या होऊ शकल्या नाही मागील वर्षीच्या तुलनेत ८० टक्के पेरण्या झाल्या आहेत, पुणे विभागामध्ये आणि नाशिक विभागामध्ये काही ठिकाणी पेरण्या कमी झाल्या आहेत असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.

पुढे देवेंद्र फडणवीस म्हणाले की, जो काही आम्हाला अहवाल मिळाला आहे त्यामध्ये पुढचा आठवडा पाऊस दाखवलेला आहे. त्यामुळे पेरण्या योग्य प्रकारे होतील कालचा यांसंदर्भामधे एक समिती देखील तयार केली आहे. एक कंटिन्जन्सी प्लॅन करण्यात आला आहे. जर पेरण्या होऊ शकल्या नाही त्याचा प्लॅन देखील करण्यात आला आहे. शासनाने तयार केला आहे. मागील वर्षांमध्ये १० हजार कोटी रुपये हे शेतकऱ्यांना विविध पद्धतीने मदतीपोटी देण्यात आले आहेत. नियमित कर्ज भरणारे जे शेतकरी आहेत त्यातल्या साडे सहा लाखांपैकी फक्त ५०,००० शेतकरी बाकी आहेत. जे बाकी आहेत त्यांचं केवायसी न झाल्यामुळे हे झालेलं आहे असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.

पुढे देवेंद्र फडणवीस म्हणाले की, मला असे वाटते की विरोधी पक्षाला चिंता आणि सत्ताधारी पक्षाला चिंता नाही अशी परिस्थिती नाहीये. आम्ही या संपूर्ण परिस्थितीकडे नजर ठेवून आहोत. कोणत्याही परिस्थितीमध्ये हे सरकार शेतकऱ्याच्या पाठीशी उभे राहील. बोगस बियाण्यांवर कारवाई तर होईलच पण काल कायदा अधिक कडक करण्याच्या संदर्भातही सूचना देण्यात आल्या आहेत राज्य सरकार नव्याने ज्याप्रमाणे आपण बीटीचा कायदा केला त्याप्रमाणे थेट कंपन्यांवर कारवाई करण्यात येईल. त्याचबरोबर जी काही खतांमध्ये बोगसगिरी होतेय ती कायद्याच्या अंतर्गत जेणेकरून जे बोगस खतांचा वापर करतील आता जो कायदा असेन्शियल कमोडिटी कायद्याच्या अंतर्गत त्यांना बेल मिळणार नाही हा ही गुन्हा मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वात आम्ही घेतला आहे असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.

हे ही वाचा:

चेन्नई सुपर किंग्सचा सलामी फलंदाज विजेतेपद जिंकताच अडकला लग्न बंधनात

बार्क इंडियाच्या रिपोर्टनुसार Rupali Ganguly ची अनुपमा अव्वल स्थानावर

Odisha Train Accident, रेल्वे अपघाताची माहिती देणारी व्यक्ती कोण?

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss