spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

Exclusive : ‘हा’ बडा नेता गुरुवारी जाणार शिंदे गटात, डॉ श्रीकांत शिंदे यांच्या शिष्टाईला यश

केंद्रीय गृहमंत्री महित शहा हे २ दिवसांच्या मुंबई दौऱ्यावर आलेत आणि या दोन दिवसांच्या मुंबई दौऱ्यावर असताना अमित शहा यांनी शिवसेनेला अगदी चोख प्रतिउत्तर भाजपने द्यावे अश्या स्वरूपाची भाजप कार्यकर्त्यांमध्ये आपली भूमिका मंडळी आहे.

केंद्रीय गृहमंत्री महित शहा हे २ दिवसांच्या मुंबई दौऱ्यावर आलेत आणि या दोन दिवसांच्या मुंबई दौऱ्यावर असताना अमित शहा यांनी शिवसेनेला अगदी चोख प्रतिउत्तर भाजपने द्यावे अश्या स्वरूपाची भाजप कार्यकर्त्यांमध्ये आपली भूमिका मंडळी आहे. परंतु त्याच वेळी या दोन दिवसांच्या दौऱ्यामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यामध्ये एक अत्यंत महत्वपूर्ण बैठक झाली आणि या बैठकीत असे ठरले कि, पुढील येणाऱ्या कालावधीत शिवसेना पक्षला एका पाठोपाठ एक राजकीय आणि त्याच बरोबर पारिवारिक धक्के देखील देण्यास सुरवात करायची आहे.

शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी जी शिवसेना उभी केली ती एकाहून एक चांगल्या नररत्नांच्या एकूणच योगदानातून हि संघटना उभी राहिली. शिवसेनेला ५६ वर्षे झालीत. शिवसेना प्रमुखांचे जे शिवसैनिक होते ते विलक्षण, आपुलकीने, प्रामाणिकपणाने आणि अत्यंत समर्पिक भावनेने पक्षाचे काम करत होते. काळाच्या ओघात शिवसेना हि बाळाला. त्यानुसार काही नेते आणि कार्यकर्तेही बदलले. पण शिवसेनेच्या संपूर्ण स्नेह सहकाऱ्यांचा जर विचार केला तर त्यांच्या तालमीत तयार झालेले आणि शिवसेना प्रमुखांच्या चरणी आपले सर्वस्व अर्पित करणारे असे जे काही नेते आहेत त्या नेत्यांपैकीचा एक मोठा नेता एकनाथ शिंदे यांच्या हाताला लागला आहे.

अमित शहा हे मुंबईत येण्याच्या आधीच अगदी आठवडाभर मुखमंत्र्यांचे चिरंजीव डॉ. श्रीकांत एकनाथ शिंदे हे गांभीर्याने काम करत होते. आणि त्यांच्याच संकल्पनेतून, प्रयत्नातून शिवसेनेचा एक बडा नेता आता एकनाथ शिंदेच्या गटात सहभागी होणार आहे. एकीकडे एकनाथ शिंदे म्हणतात त्यांची शिवसेना हि खरी शिवसेना आहे तर दुसरीकडे उद्धव ठाकरे म्हणतात आमची शिवसेना हीच खरी शिवसेना आहे. परंतु उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला दिवसागणिक गळकी लागलेली आहे. त्याचे सर्वात मोठे उदाहरण दि. ८ सप्टेंबर रोजी दिसणार आहे. ८ तारखेला शिवसेना प्रमुखांचा एक बिनीचा सहकारी ज्याने शिवसेना पांढरपेशा वर्गामध्ये रुजवण्याचे काम केले त्याचे सर्वाधिक श्रेय हे सुधीर जोशी नंतर कोणाला लाभले असेल तर ते गजानन कीर्तिकर यांना लाभले आहे.

खासदार गजानन कीर्तिकर हे शिवसेनेमधील असे नाव आहे कि आजही सुशिक्षितांचा वर्ग, सुसंस्कृतांचा वर्ग गजानन कीर्तिकर याना कमालीचा आदर देतो. याचे कारण म्हणजे गजानन कीर्तिकर यांनी जे काम केले आहे, घराघरापर्यंत भूमीपुत्रांसाठीचे त्याचे जे योगदान आहे म्हणजेच सरकारी कार्यालये, निमसरकारी कार्यालये, तेल कंपन्या यांच्यामध्ये गजानन कीर्तिकर यांना कमालीचा आदर आजही आहे. गेली २ टर्म ते खासदार आहेत. त्यांच्या या खासदारकीच्या काळात आणि त्याहीआधी गजानन कीर्तिकर हे उद्धव ठाकरे यांच्यामुळे काहीसे नाराज होते. तसेच गजानन कीर्तिकर ज्यावेळी आजारी होते त्यावेळी उद्धव ठाकरे हे त्यांना बघायला गेले नाहीत परंतु मुख्यमंत्री झाल्यानंतर शिवसेनेच्या प्रमुख नेत्यांच्या भेटी गाठी घेण्याची सुरवात एकनाथ शिंदे यांनी गजानन कीर्तिकर त्यांच्यापासूनच केली. तेच गजानन कीर्तिकर दि ८ सप्टेंबर रोजी रवींद्रनाट्य मंदिर येथील एका कार्यक्रमामध्ये शिंदे गटात सहभागी होणार आहे.

हा कार्यक्रम रवींद्रनाट्य मंदिरमध्ये घेण्याची मुख्य संकल्पना म्हणजे दादर, प्रभादेवी, हा सर्व परिसर शिवसेनेच्या प्रभावाखाली आहे. शिवसेना भवन देखील याच परिसरात आहे आणि शिवसेना भवनाच्या छायेतच गजानन कीर्तिकर यांचा सारखा मोठा नेता आपल्या बाजूला ओढण्याचे काम श्रीकांत शिंदे आणि एकनाथ शिंदे यांनी केले आहे. त्यामुळे शिवसेनेला ८ तारखेला एक जबरदस्त असा धक्का मिळणार आहे. उद्धव ठाकरे यांच्या कार्यशैली मूळे आणि त्यातही उद्धव ठाकरे यांच्या अवतीभवती स्वार्थी नेत्यांचा गट निर्माण निर्माण झाला त्यामुळे शिवसेनेतील अनेक मंडळी हि नाराज आहेत. यापैकीचेच एक म्हणजे गजानन कीर्तिकर आहेत.

गजानन कीर्तिकर यांची चिरंजीव अमोल गजानन कीर्तिकर हे आदित्य ठाकरे यांचे अत्यंत जवळचे सहकारी आहेत. युवासेनेत ते कार्यरत आहेत. ज्यावेळी गजानन कीर्तिकर हे एकनाथ शिंदे गटाकडे आकर्षित होतात हे लक्षात आल्यानंतर ज्या काही तडकाफडकी उपनेत्यांच्या नेमणूक करण्यात आल्या त्यामध्ये अमोल गजानन कीर्तिकर यांचे नाव होते. अमोल कीर्तिकर याना आधी शिर्डी या संस्थामध्ये देखील विश्वस्थ करण्यात आले होते. काही वर्षांपूर्वी याच अमोल कीर्तिकर यांनी देखील बंडाचा शेंडा हा उभारला होता. शिवसेनेचे सुनील वामन प्रभू यांच्या विरोधात हा बंडाचा झेंडा उभारला होता. त्यावेळी ते मुंबईचे महापौर होते तसेच त्यांना आमदारकीची निवडणूक लढवायची होती आणि त्याच बरोबरीने गोरेगाव – दिंडोशी परिसरात सुनील प्रभू यांच्या वाढत्या प्राबल्याला आवाहन देण्याचे काम अमोल कीर्तिकर यांनी केले होते. त्यानंतर अमोल कीर्तिकर आणि गजानन कीर्तिकर यांना शिवसेनेच्या मातोश्री या निवासस्थानी बोलावले. त्यानंतर एमआयजी या वांद्राच्या क्लब मध्ये या दोन्ही पिता पुत्रांची समजूत काढण्यात आली. त्यानंतर अमोल कीर्तिकर हे आदित्य ठाकरे यांच्यासोबत ते ते समरस झाले. पण गजानन कीर्तिकर यांना मात्र उद्धव ठाकरे यांनी तितकीशी जवळीक साधू दिली नाही.

गजानन कीर्तिकर यांना खासदारकी मिळाली ते जिंकून देकील आले. पण त्यांच्या आजारपणात उद्धव ठाकरे हे त्यांना भेटायला गेले नाहीत. जर उद्धव ठाकरे हे स्वतःला कुटुंब प्रमुख म्हणत असतील तर त्यांनी ज्या स्वरूपाची आस्थेवारी चौकशी गजानन कीर्तिकारांची करायला हवी होती ती केली नाही. किंबहुना सतत आपल्याला अंतरावर ठेवण्याचा प्रयत्न केला गेला अशी गजानन कीर्तिकर यांची धारणा झाली आहे. हीच गोष्ट लक्षात घेऊन एकनाथ शिंदे यांनी गेल्या १५ दिवसात २ वेळा गजानन कीर्तिकर यांची भेट घेतली आणि आणि ८ सप्टेंबर रोजी एक जंगी कार्यक्रम हा गजानन कीर्तिकर यांच्या अखेरच्या जय महाराष्ट्राचा केला जाणार आहे. यासाठी मोठ्या प्रमाणात शिंदे गट शक्ती प्रदर्शन देखील करणार आहे. हे शक्ती प्रदर्शन दादर, प्रभादेवी, वरळी या परिसरात केले जाणार आहे कारण इथे काही अंतरावर सामना आहे तर हाकेच्या अंतरावर शिवसेना भवन आहे. याच ठिकाणी गजानन कीर्तिकर याना आपल्या गटात घेऊन ताकद वाढविण्याचा प्रयत्न हा शिंदे गटाने सुरु केला आहे. हे सर्व करत असताना याचा पाठपुरावा कोणी आमदार किंवा नेत्याने न करता एकनाथ शिंदे यांचे सुपुत्र डॉ. श्रीकांत एकनाथ शिंदे हे स्वतः करत आहेत. त्यामुळे शिवसेनेतील नाराज मंडळींना भेटून त्यांची समजूत काढून वडिलांच्या बरोबरीने जोडण्याचे काम हे श्रीकांत शिंदे करत आहेत. गेल्या काही काळात श्रीकांत शिंदे यांच्या स्वतःच्या व्यक्तिमत्वामध्ये आमूलाग्र बदल झाल्याचे आपल्याला बघायला मिळत आहे आणि त्याचीच पहिलीच प्रचिती म्हणजे गजानन कीर्तिकर यांना शिंदे गटामध्ये अहभगी करून घेण्यात झालं आहे.

शिवसेनेच्या प्रत्येक कार्यक्रमात पहिल्या ओळीत स्थानापन्न असलेले गजानन कीर्तिकर यांना जर एकनाथ शिंदे यांनी आपल्या बाजूला घेचून घेतलं तर मुंबईमध्ये एकनाथ शिंदे यांच्यावर टीका होतेय म्हणा किंवा एकनाथ शिंदेंवर जो काही नाराजीचा सूर काढला जातो तो म्हणजे मुंबईमधून अजून एकनाथ शिंदे यांना ठाणे किंवा राज्यातील वेगवेगळ्या भातुन जनाधार मिळाला तसा अजून मिळत नाही. तोच जनाधार मिळविण्याचा प्रयत्न गजानन कीर्तिकर यांच्या रूपाने एकनाथ शिंदे यांनी सुरु केला आहे. हा जर प्रयत्न यशस्वी झाला तर गजानन कीर्तिकर हे वयाच्या ८० व्या वर्षी त्यांचा उत्साह देखील अत्यंत कौतुकास्पद आहे. तसेच गजानन कीर्तिकर यांच्याकडे अजूनही संघटन कौशल्य आहे आणि असा एक नेता ज्याला जनाधार आहे आणि आजही सुसंस्कृत कुटूंबात लोकप्रिय आहे ते म्हणजे गजानन कीर्तिकर हे ८ तारखेला शिवसेनेमधून बाहेर पडत शिंदे गटात सहभागी होणार आहेत.

हे ही वाचा  :

“भाजप आणि शिवसेना ओरिजनल म्हणजेच शिंदे गट आम्ही एकत्रित निवडणूक लढू” देवेंद्र फडणवीस यांचं मोठं विधान

अमित शाहांच्या मुंबई दौऱ्यानंतर ‘मुंबईत काल मंगलमूर्ती आणि अमंगलमूर्ती बघितले’ म्हणत शिवसेनेने लगावला टोला

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss