Exclusive : “महाराष्ट्र बंद राजकीय नाही..” – Uddhav thackeray

Exclusive : “महाराष्ट्र बंद राजकीय नाही..” – Uddhav thackeray

सध्या १३ ऑगस्ट रोजी घडलेली बदलापूर येथे स्थित असलेली आदर्श विद्यामंदिर या शाळेत एका ४ वर्षीय मुलीवर नराधमाने अत्याचार केले या प्रकरणाचे लोण राज्यात सर्वत्र पसरले आहे. अनेक ठिकाणांहून आक्रोश, संताप व्यक्त होत आहे. लोक या घटनेने क्रुद्ध झाले आहेत. या प्रकरणी  २० ऑगस्ट रोजी तब्बल १० ते १२ तास आंदोलन झाले. शेवटी संध्याकाळी सौम्य लाठीचार्ज करत आंदोलकांना बदलापूर स्थानकातून तसेच आजूबाजूच्या परिस्थितीतून पांगवण्यात आले होते. या घटनेच्या निषेर्धात महाविकास आघडीने येत्या २४ ऑगस्टला महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे. या प्रकरणावर उद्धव ठाकरे यांनी आज पत्रकार परिषद घेतली आहे. जाणूयात काय म्हणाले ते –

नक्की काय म्हणाले उद्धव ठाकरे ?

“बदलापुरात घडलेली घटना ही घृणास्पद आहेच आणि या बद्दल जर कोणताही पक्ष आवाज उठवत असेल तर तो पॉलिटिकल अजेंडा नव्हे. जर का एकूण पाहिलं तर केवळ ही एक घटना नाही मी काही वृत्तपत्राच्या बातम्या कापून आणल्या आहेत. तुम्हाला वाचून दाखवतो म्हणजे मी जे बोलतो ते हवेत न बोलता पुराव्यांसहीत बोलतो हे ही लक्षात येऊ   देत. ही पहीली बातमी २१ ऑगस्ट रोजी गेल्या ५ वर्षात २०,००० बालिकांवर अत्याचार, यानंतर सकाळ मध्ये असंवेदनशीलतेचा सर्वत्र निषेद सर्वानी निषेद केला आहे. त्या नंतर चांदिवली मध्ये अल्पवयीन मुलीवर बलात्कार झाला या प्रसंगी मंत्री लोढा यांनी पीडितांच्या कुटुंबियांना भेट दिली. मुंबईत बाललैंगिक अत्याचारात वाढ.. यांसारख्या अनेक केसेस मी दाखवू शकतो. गेल्या आठवड्यात बंगालमधील सर्वात निंदनीय कृत्य घडले आहे. ज्या कृत्यामुळे देश भारत आगडोंब उसळला आहे .  त्याआधी निर्भयासारख प्रकरण घडलेले आहे. या सर्वांविरुद्ध सर्व आक्रमक झाली आहे. अशा घटना जेव्हा घडतात त्यावेळी देशभरात जनआक्रोश दिसून येतो आणि या जनआक्रोशाचे मोठ्या वादळात रूपांतर होण्याचा वेळ आता आला आहे. या विकृतीच्या वायरसशी सर्वानी मिळून लढले पाहिजे. लाडकी बहीणही प्राथमिकता असावी परंतु तिचा प्रश्न अतिशय महत्वाचा आहे. तरच लाडकी बहीण योजना आपण आणू शकतो.”

“माझी सर्वांना विनंती आहे की २४ ऑगस्ट चा महाराष्ट्र बंदला सर्वानी प्रतिसाद द्यावा. उठो द्रौपदी शस्त्र उठाव, गोविंद ना आयेंगे.. ही कविता आजच्या या घटनांशी संबंधित आहे. पण लहान मुलींना कस सांगाव.. ही लहान मूलं घाबरून गप्प बसतात. हा  संपूर्ण उद्रेक आहे जो बदलापूरकरवी बाहेर आला आहे. या संपूर्ण घटनेला वाचा फोडण्यासाठी हा २४ ऑगस्टचा बंद आहे हा आपण सर्वांनी कडाडून पाळावा असं माझं तुम्हा सर्व महाराष्ट्रवासियांना आवाहन आहे. हा बंद राजकीय पक्ष नसून सर्व माताभगिनींसाठीचा आहे. ही झालेली घटना ही काही त्या लाडक्या बहिणीला पाहून केलेली योजना नव्हती. मुख्यमंत्र्यांच्या घरात घडलेली ही घटना आहे. त्यांनी निदान याचं भान राखलं पाहिजे की ही घडलेली घटना त्यांना तरी मान्य आहेत का? ज्या वेळी ही बदलापूरचे घटना घडली होती त्यावेळी मुख्यमंत्री हे रत्नागिरीत लाड्क्याबहिणीचा सोहळा साजरा करत होते. निदान त्या बहिणीच्या राखीच्या बंधनाला तरी त्यांनी जगावं..”

“निवडणूक डोळ्यासमोर ठेऊनही या योजनेची खिरापत जनतेच्याच पैश्यातून वाटताना यांना लाज कशा नाही वाटत. आणि या घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांना या प्रकाराबाबतही राजकारण वाट्त असेल तर त्यांच्या अकलेची मी कीव करतो. ते विकृत मानसिकतेचे लोक आहेत. ज्यांना ज्यांना यात राजकारण दिसतंय ते सर्व विकृत मानसिकतेचे आहेत किंवा ते सर्व या नराधमांचे पाठीराखे आहेत. जर त्या लाडकी बहिणीचे पोस्टर्स घेऊन आले तर त्या आंदोलकांनी निषेद व्यक्त करू नये का? त्यांच्या या वागण्याने ते असंवेदशील सरकार आहे हे दिसून येत आहे. काही महिन्यांपूर्वी  विनोद घोसाळकर यांच्या पुत्राची हत्या झाली. त्यावेळी तर या असंवेदनशील सरकारने हातच वर केले.” असे ते म्हणाले.

पुढे म्हणताना ते बोलले की “रत्नागिरीत गुलाबी जॅकेटसुद्धा होते. हा काय फॅशनशो चालू आहे का ? या योजनांचा प्रचार-प्रसार करत राज्यातील महत्वाच्या घडामोडी यांच्यावर अलगद पांघरूण घालण्यासारखं आहे. पोलीस आयुक्तांनाची बदलापूर घटनेत चूक आली आहे. खरतर पोलीस असं वागत नाहीत तरीही त्यांच्यावर दबाव टाकला जातो. पण या दबाव अंतर्गत काम करणारे पोलीस हे सुद्धा तितकेच दोषी आहेत. त्यामुळे त्यांना शिक्षा ही झालीच पाहिजे. एकनाथ शिंदे यांच्या फास्ट ट्रॅकवर चालणारी जी २  महिन्यापूर्वीची केस आहे ती केस आधी शोधून काढा. अतिशय खोटारडा माणूस म्हणजे शिंदे आहे हे त्यांच्या या कृत्यावरून दिसून येते. क्षमता नसलेला माणूस हा महाराष्ट्राचा मुख्यमंत्री झाला आहे. मला त्या कुटुंबियांना त्रास मला सध्या द्यायचा नाही. मला जायचं आहे त्या पीडितांच्या कुटुंबियांना भेटायला. सध्या त्यांची मानसिकता आपण आता समजून घेतली पाहिजे. “

हे ही वाचा:

Kolkata Rape Murder Case : कोलकाता प्रकरणात समोर आला नवा खुलासा; नराधमाची होणार पॉलीग्राफ चाचणी

देशभरात ‘भारत बंदची’ हाक; ‘या’ सोयी-सुविधा राहणार बंद, तर ‘या’ सोयी-सुविधा राहणार चालू

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version