spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

Exclusive, मालवणच्या आंगणेवाडीत भाजपची भव्य राजकीय जत्रा

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अवघ्या २० दिवसांत दोनदा मुंबई भेटीचा घाट घालत ‘मिशन मुंबई’चा कार्यक्रम हाती घेतला आहे. त्याचवेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी थेट शिवसेनेचा कोकणातला बालेकिल्ला असलेल्या मालवण मधूनच मातोश्रीला ललकारण्याचा घाट घातलाय तो ही आंगणेवाडीच्या भराडी देवीच्या साक्षीने.

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अवघ्या २० दिवसांत दोनदा मुंबई भेटीचा घाट घालत ‘मिशन मुंबई’चा कार्यक्रम हाती घेतला आहे. त्याचवेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी थेट शिवसेनेचा कोकणातला बालेकिल्ला असलेल्या मालवण मधूनच मातोश्रीला ललकारण्याचा घाट घातलाय तो ही आंगणेवाडीच्या भराडी देवीच्या साक्षीने.

भक्तांच्या नवसाला पावणारी देवी म्हणून मालवणच्या मसुरे येथील आंगणेवाडीच्या भराडी देवीचा लौकिक आहे. त्यामुळे गेली अनेक वर्षे आंगणेवाडीच्या जत्रेला चाकरमान्यांची गर्दी वाढत आहे. याचं देवीला गेल्यावर्षी सार्वजनिक बाधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांनी नवस केला होता. राज्यात भाजपचे सरकार आले तर देवेंद्र फडणवीस यांना दर्शनाला घेऊन येईन आणि नवस फेडेन. त्यानंतर मागच्या २९ जूनला ठाकरेंचे सरकार जाऊन ३० जूनला मुख्यमंत्री शिंदे -फडणवीस यांचे सरकार आले. यात रविंद्र चव्हाण यांचाही सक्रीय समावेश होता. त्याची बक्षिसी त्यांना सार्वजनिक बांधकाम खात्याच्या मंत्रिपदासह मिळाली आहे. भराडी देवीच्या याच आशिर्वादाचे ऋण फेडण्यासाठी आंगणेवाडी जवळच भाजपने ४ फेब्रुवारीला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या जाहीर सभेचे आयोजन केले आहे. यंदा ४ फेब्रुवारीला होणारी आंगणेवाडीची भराडी देवीची जत्रा राजकीय घडामोडींनी गाजणार आहे.

उध्दव ठाकरेंच्या शिवसेनेसाठी कोकण हा बालेकिल्ला आहे. त्यातही मालवण हा सेनेचा हुकुमी गड. याच भागातील चाकरमान्यांनी मुंबई – ठाण्याच्या महानगर पालिका वर्षानुवर्षे सेनेला जिंकून दिल्यात.त्याच कोकणी माणसाला मुंबई महापालिकेच्या आधी साद घालण्यासाठी थेट देवेंद्र फडणवीसांच्या सभेचं आयोजन करण्यात आले आहे. या सभेचे व्यासपीठ आजपर्यंतचे सिंधुदुर्गातील सभांपेक्षा सगळ्यात भव्य व्यासपीठ बनवण्यात आले आहे. जांभ्या दगड्याच्या स्वरूपातील सजावट असलेले हे लक्षवेधी व्यासपीठ केंद्रिय मंत्री नारायण राणें पासून ते भाजपचे राष्ट्रीय सचिव विनोद तावडे, मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांच्या सह कोकणासह मुंबईतील आमदार नगरसेवक नेत्यांच्या उपस्थितीने खुलणार आहे. अर्थात या व्यासपीठावरून भाजप नेते ठाकरेंच्या सेनेवर नेमका कसा निशाना साधतात याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी ठाकरेंचा खरपूस समाचार घेतला तर त्याचा भाजपला राजकीय फायदा होणार की सेनेला सहानुभुती मिळणार याची जोरदार चर्चा तळकोकणात सुरू आहे. त्यामुळे या सभेवर ठाकरे सेनेचे नेतेही बारीक लक्ष ठेवून आहेत.

आंगणेवाडीतील भराडी देवीचे शनिवारी संध्याकाळी दर्शन घेऊन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सभेला संबोधित करणार आहेत. त्यासाठी सिंधुदुर्गातील कार्यकर्त्यांप्रमाणे मुंबई ठाण्यातील पदाधिकाऱ्यांनी कंबर कसत आपापल्या भागातील कोकणी कार्यकर्त्यांना मालवणात आणले आहे. ह्या सभेला २००५ साली झालेल्या शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या सभेपेक्षा जास्त गर्दी जमवण्याचा महाराष्ट्र भाजपचा प्रयत्न आहे.

हे ही वाचा : 

मालवणच्या आंगणेवाडीत भाजपची जत्रा | Anganewadi Jatra | Devendra Fadnvis | Narayan Rane | BJP |

मुख्यमंत्र्यांच्या भाषणावेळी विदर्भातील लोक संतापले, सगळीकडे एकच गोंधळ

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss