Exclusive, नेत्यांच्या असंसदीय बकबकबाजीला माध्यमंही जबाबदार, उदय तानपाठक

विधिमंडळाचे अधिवेशन सुरु आहे आणि आज विधिमंडळाच्या अधिवेशनाचा तिसरा दिवस आहे आणि या तिसऱ्या दिवशी दुपारीच सभागृहाचे कामकाज बंद करण्यात आले आहे. शिवसेनेचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांच्यावर हक्कभंग आणण्यात आला आहे.

Exclusive, नेत्यांच्या असंसदीय बकबकबाजीला माध्यमंही जबाबदार, उदय तानपाठक

विधिमंडळाचे अधिवेशन सुरु आहे आणि आज विधिमंडळाच्या अधिवेशनाचा तिसरा दिवस आहे आणि या तिसऱ्या दिवशी दुपारीच सभागृहाचे कामकाज बंद करण्यात आले आहे. शिवसेनेचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांच्यावर हक्कभंग आणण्यात आला आहे. संजय राऊत यांनी केलेल्या वक्तव्यामुळे सत्ताधारी पक्षांमध्ये चीड निर्माण झाली आहे. आज जेष्ठ पत्रकार उदय तानपाठक (Uday Tanpathak) यांची टाईम महाराष्ट्र् ने मुलाखत घेतली आहे. त्यामध्ये उदय तानपाठक यांनी त्यांची मते मांडली आहेत. या मुखातीमध्ये उदय तानपाठक म्हणाले कि कोण कोणाशी कशी मांडवली करेल हे सांगता येत नाही परंतु अश्या या पद्धतीचा वक्तव्यामुळे विधिमंडळामध्ये गदारोळ होणं योग्य नाही. लाखो लोकांच्या समस्या सोडवण्यासाठी हे सभागृह आहे. जर विधिमंडळावर कोणी अशी टिपणी करत असेल तर त्या वर कारवाई करणे गरजेचे आहे असे उदय तानपाठक म्हणाले.

लोकांच्या समस्या सोडवण्याऐवजी सभागृह बंद करून काही मिळत नाही तुम्ही त्यांच्यावर हक्कभंग आणा तुम्ही त्यांच्यावर कारवाई लोकशाही मार्गावर करा. जर तुम्ही सभागृह बंद करून लाखो रुपये वाया घालवायचे आणि लोकांच्या समस्या सोडवायच्या नाहीत याला काही अर्थ नाही. उद्या पुन्हा निकाल आहे पोटनिवडणुकीच्या उद्या ही अश्याच प्रकारे सभागृह बंद होण्याची शक्यता आहे असे उदय तानपाठक म्हणाले. नक्की २७२ कि २७३ अन्वय आणायचा आहे? जो २७२ अन्वय आणला आहे त्यांना तोच अन्वय २७३ आहे असे भास्कर जाधव यांनी टाइम महाराष्ट्रच्या मुलाखतीमध्ये सांगितले आहे. यावर उदय तानपाठक म्हणाले कि जर तो अन्वय चुकीचा असेल तर तो फेटाळला जाईल परंतु ज्या पद्धतीने चालले आहे जे काही चालले आहे ते योग्य नाही आणि दोन्ही बाजूने योग्य कोणीच नाहीये असे उदय तानपाठक म्हणाले.

पुढे उदय तानपाठक म्हणाले कि सरकार येऊन संजय राऊत यांनी एक सोपा झेल काढून दिला आहे सरकार येऊन आठ महिने झाले आहेत परंतु ज्या ज्या गोष्टी आहे ज्या जनतेच्या समस्या आहेत त्या समस्यांचे मार्ग तुम्ही सरकारलाच विचारणार आहेत पण तो मार्ग तुम्ही घालवला आहे. जे घडत आहे ते सगळं मीडियामुळे घडत आहे असे वक्तव्य संजय राऊत मीडियामुळे करत आहेत. जर मीडिया रोज सकाळी दाखवणं बंद केलं नाही तर अनेक नेते नामशेष होतील अनेक नेत्यांना मोठं हे चॅनेल्स ने केलं आहे यश अपयश हे सर्व काही चॅनेल्स च आहे तुम्ही जाऊ नका म्हणजे तस काही होणार नाही असे उदय तानपाठक म्हणाले.

आता सगळी पातळी घसरली आहे पीपल गेट द गव्हर्मेंट दे डिसर्व किंवा सरकार ज्या पद्धतीने असते त्या पद्धतीने लोक बनतात. जर आमदारच असे बोलायला लागले १० बापाचा आहे का, हरामखोर आहे का, भाडखाऊ आहे का यावर कोण कायच बोलणार पुन्हा आमदारांचे विशेष अधिकार आहेत त्यावर हक्कभंग हि येऊ शकतो. त्यामुळे यांच्याबद्दल न बोलणं हेच बार आहे ते काय बोलतात ते बोलत राहावं आणि आपण पत्रकार म्हणून कव्हर करत राहावं जेवढं शक्य असेल तेवढं छापावे आणि जनतेने बघत राहावं आणि जे काही निवडणुकीच्या वेळी करत राहावे. परंतु जनता ते करत नाही आणि पुन्हा पुन्हा ते लोक निवडून येतात. आपली जशी लायकी आहे तसे आमदार आपल्याला मिळाले आहेत असे उदय तानपाठक म्हणाले.

सुनील राऊत यांनी सांगितले आहे कि संजय राऊत हे आता कोणत्याही परिस्थिती मध्ये माफी मागणार नाही ते तुरुंगात जाऊन आले पण त्यांनी भाजपासमोर गुढगे टेकले नाहीत यावर उदय तानपाठक म्हणाले कि संजय राऊत जे काही म्हणाले ते मी ऐकलं आहे संजय राऊत म्हणाले कि मी वरच्या हाऊस चा सदस्य आहे मला माहिती आहे सर्व २० वर्ष मी आमदार आणि खासदार राहिलो आहे मला नियम जास्त माहिती आहे मी चुकीचं काही बोललो असेल तर मला मान्य आहे.

हे ही वाचा :

Maharashtra Budget Session, दुसऱ्या दिवशी विधानभवनाचा परिसर दणाणला, गळ्यात कांद्याच्या – कापसाच्या माळा घालत राष्ट्रवादीचे आमदार आक्रमक

Pune Bypoll Election, निकालाआधीच उमेदवारांना केले विजयी घोषित, कार्यकर्त्यांच्या उत्साहीपणामुळे उमेदवारांवर गुन्हे दाखल

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version