Exclusive : पंडित ‘राजकुमार शर्मानी’ केली भविष्यवाणी, राजकारणासाठी उद्धव ठाकरेंना हे वर्ष उत्तम नाही..!

Exclusive : पंडित ‘राजकुमार शर्मानी’ केली भविष्यवाणी, राजकारणासाठी उद्धव ठाकरेंना हे वर्ष उत्तम नाही..!

Exclusive : दोन दिवसांपूर्वी आपण २०२२ वर्षाला निरोप दिला आणि नवीन वर्षामध्ये म्हणजेच २०२३ मध्ये पदार्पण केलं. अनेक राशी भविष्य आपण वाचले असेल पण त्यात हे वर्ष राजकारण्यांसाठी कसं जाणार आहे, हे वाचण्यात आले नसेल. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Chief Minister of the state Eknath Shinde) हे बंड करून शिवसेनेतून बाहेर पडले आणि एकटेच बाहेर न पडता तब्ब्ल ४० आमदारांना सोबत घेऊन बाहेर पडले. आतापर्यंतच हे सर्वात मोठं बंड असल्यामुळे राज्यातील राजकीय परिस्थिती पूर्णपणे अस्थिर झाली होती. त्यानंतर राज्यात आलेल्या शिंदे सरकारविषयी अनेकांनी तर्क वितर्क लावले आहेत. याच संदर्भातल्या अनेक प्रश्नांची उत्तरे मिळवण्यासाठी ‘टाईम महाराष्ट्र’ (Time Maharashtra) ने देशातील ज्येष्ठ भविष्यवेत्ते पंडित राजकुमार शर्मा (Pandit Rajkumar Sharma) यांची मुलाखत घेतली आहे. या मुलाखतीत पंडित राजकुमार शर्मा यांनी अनेक राजकीय विषयांवर भविष्य सांगितले आहे.

पंडित राजकुमार शर्मा यांना जेव्हा हे वर्ष उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यासाठी कसं जाणार, असा प्रश्न विचारण्यात आला, तेव्हा त्यांनी सांगितलं कि, हे वर्ष उद्धव ठाकरे यांच्यासाठी थोडं अडचणींचं (difficulties) ठरणार आहे. तर उद्धव ठाकरेंना राजकारणासाठी हे वर्ष उत्तम नसल्याचं सुद्धा त्या ठिकाणी सांगण्यात आलं. येत्या २०२३ च्या फेबुवारी आणि मार्च (February and March) महिन्यात उद्धव ठाकरे यांनी आपल्या आरोग्याकडे (Health) लक्ष देणे खूप गरजेचे आहे, असं पंडित राजकुमार शर्मा यांनी सांगितलं आहे. त्याचबरोबर २०२३ मध्ये शिवसेनेनी कुणावर जास्त भर दिला पाहिजे असा प्रश्न ज्या वेळी पंडित राजकुमार शर्मा यांना विचारलं त्यावर त्यांचं उत्तर असं होतं. येत्या काळात शिवसेनेनी उद्धव ठाकरे यांच्या पेक्षा जास्त भर हा आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांच्यावर दिला पाहिजे. आदित्य ठाकरे यांनी जर त्यांच्या पिताश्री आणि जेष्ठ शिवसैनिक (Pitashree and senior Shiv Sainik) यांच्या मार्गदर्शनात काम केलं तर अत्यंत चांगलं होईल. २०२३ च्या २३ जानेवारी नंतर आदित्य ठाकरे यांच्या राशीमध्ये अजून चांगले योग येतील, असं पंडित यांनी सांगितलं. २०२३ मध्ये आदित्य ठाकरे सर्वांना एकत्र आणून पुढे जाण्याचा विचार करतील, असं त्यांनी भविष्यवाणीमध्ये सांगितलं आहे.

तर येत्या काळात शिवसेनेला आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) हा नवीन हिरो बनून बाहेर येईल असं पंडित राजकुमार शर्मा यांनी म्हटलं. अजून आदित्य ठाकरे लहान आहे पण येत्या काळात त्यांचं भाग्य खूप चांगलं आहे. तर २०३२ पर्यंत आदित्य ठाकरे मुख्यमंत्री सुद्धा बनू शकतात, असं त्यांनी सांगितलं. सध्या आदित्य ठाकरे यांच्यावर अनेक आरोप करण्यात येत आहेत. काही दिवसांपूर्वी महाराष्ट्राच्या हिवाळी अधिवेशनात दिशा सालियन (Disha Salian) आत्महत्येमागे आदित्य ठाकरे यांचा हात आहे, असा आरोप विरोधकांकडून करण्यात आला आणि एस.आय.टी (SIT) सुद्धा चौकशीसाठी स्थापन करण्यात आली. यावर पंडित राजकुमार शर्मा म्हणाले आहेत कि, येत्या काळात जे आरोप आदित्य ठाकरे यांच्यावर करण्यात आले होते ते सर्व खोटे ठरणार आहेत. तर २०३६ मध्ये हिंदुत्वचा भगवा झेंडा हाती घेऊन एकनाथ शिंदे, राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे एकत्ररित येतील, असं मोठं भाकीत पंडित राजकुमार शर्मा यांनी व्यक्त केलं आहे.

हे ही वाचा : 

“तुमच्याकडे खूप घातक शस्त्र” ‘गांधी-गोडसे एक युद्ध’ चित्रपटाचा उत्कंठावर्धक टीझर प्रदर्शित

डार्लिंग फेम विजय वर्मा करतोय तमन्ना भाटियाला डेट, व्हायरल फोटो आले समोर

Follow Us
टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version