spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

Exclusive , संजय राऊतांचा अत्यंत विश्वासू सहकारी बाळा कदम पोलिसांच्या ताब्यात

शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांचे अत्यंत निकटवर्तीय समजले जाणारे सेना पदाधिकारी सुनिल उर्फ बाळा कदम यांना आर्थिक गुन्हे शाखेने ताब्यात घेतले आहे.

शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांचे अत्यंत निकटवर्तीय समजले जाणारे सेना पदाधिकारी सुनिल उर्फ बाळा कदम यांना आर्थिक गुन्हे शाखेने ताब्यात घेतले आहे. बाळा कदम यांचे शिवसेनेच्या युवासेनेत आणि पुण्याच्या शिवसेनेत प्रभावी वजन होते. त्यांच्या अटकेने सेनेत खळबळ उडाली असली तरी ठाकरेंपेक्षा हा राऊतांवर वर्मी बसलेला घाव आहे.

कोविड काळात झालेल्या घोटाळ्यावरून भाजप नेते किरीट सोमैय्या यांनी सेनेला भंडावून सोडलेय. कोविड काळात उध्दव ठाकरे मुख्यमंत्री असताना त्यांच्या नातेवाईकांना आणि सेनानेत्यांच्या कुटुंबियांना मोठ्या प्रमाणात सरकारी कंत्राट देण्यात आली होती. खासदार संजय राऊत यांच्या अत्यंत विश्वासू सहकाऱ्यांपैकी एक असलेले सुनिल उर्फ बाळा कदम हे परळ भोईवाडा परिसरात रहातात. ते बांधकाम व्यावसायिक असून विद्यार्थी चळवळीत ते विशेषत्वाने कार्यरत होते. कोविड घोटाळ्यासाठी त्यांना ताब्यात घेताना परळच्या केईएम रूग्णालयासमोरील एका मोठ्या केमिस्टलाही ताब्यात घेण्यात आले आहे. संजय राऊत तुरूंगात असताना आमदार सुनिल राऊत यांच्या सोबत धावपळ करून खासदार राऊतांना तुरूंगातून बाहेर येण्यासाठी मदत करणाऱ्यांमध्ये बाळा कदम अग्रभागी होते.

भाजप नेते किरीट सोमैय्या यांनी कोविड काळातील घोटाळ्याबाबत आझाद मैदान पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली होती. त्यानुसार आर्थिक गु्न्हे शाखेच्या पोलीसांनी आज राजीव नंदकुमार साळुंखे यांना अटक केली. त्यांच्यावर भारतीय दंड संहिता ४२०,४०६ ४६५, ४६७, ४६८ ४७१ ३२०(ए) अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. आणि त्यांना न्यायालया हजर केले असता पोलीसांनी या दोघांनाही ६ मार्च पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. सुनिल कदम आणि राजीव साळुंखे हे लाइफलाईन मॅनेजमेंट सर्व्हिसेस हे हॅास्पिटल मध्ये संचालक आहेत. कोविड काळातील सेवा पुरविणे आणि साधन सामुग्री खरेदी यात १०० कोटींचा घोटाळा झाल्याचा आरोप सोमैय्यांनी केला होता. याच प्रकरणी सोमैय्यांनी संजय राऊत यांचे दुसरे निकटवर्तीय सुजित पाटकर यांच्यावरही आरोप केला होता

हे ही वाचा :

Maharashtra Budget Session, दुसऱ्या दिवशी विधानभवनाचा परिसर दणाणला, गळ्यात कांद्याच्या – कापसाच्या माळा घालत राष्ट्रवादीचे आमदार आक्रमक

Pune Bypoll Election, निकालाआधीच उमेदवारांना केले विजयी घोषित, कार्यकर्त्यांच्या उत्साहीपणामुळे उमेदवारांवर गुन्हे दाखल

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss