Exclusive : चमकायला शो सैनिक, केसेसमध्ये अडकायला शिवसैनिक

सध्या उद्धव ठाकरेही शिवसेना कमालीची संक्रमण काळातून जात आहे. त्यामुळे अश्या दिवसात शिवसैनिकांची काळजी घ्यायला हवी असे अनेकांना वाटत आहे.

Exclusive : चमकायला शो सैनिक, केसेसमध्ये अडकायला शिवसैनिक

सध्या उद्धव ठाकरेही शिवसेना कमालीची संक्रमण काळातून जात आहे. त्यामुळे अश्या दिवसात शिवसैनिकांची काळजी घ्यायला हवी असे अनेकांना वाटत आहे. परंतु सध्या तास होत नाहीय कारण शिवसैनिकांमध्ये चमकायला शो सैनिक आणि केसेसमध्ये अडकायला शिवसैनिक अशी परिस्थिती आहे.

आज मुंबईत वांद्रे न्यायालयात काही शिवसैनिक उपस्थित आहेत. कारण केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या बंगल्यावर जुहू येथे २४ ऑगस्ट २०२१ ला हल्ला झाला होता त्या हल्ल्यासाठी शिवसैनिकांना न्यायालयात हजर व्हावं लागत आहे. हे आंदोलन हे युवासेनेने केलं होत. त्या ठिकाणी असलेल्या शाखेचा क्रमांक ७१ आहे आणि हल्ला व्हायच्या आधी वरून सरदेसाई आणि काही सहकारी पोहचले होते. आणि त्यांनी शिवसेनेच्या शिवसैनिकांना सांगितले होते कि, हे आंदोलन युवा सेनेचे आहे यामध्ये शिवसैनिकांनी लुडबुड करायची नाही. या आंदोलनाचं काय करायचे ते आम्ही बघू. असं सांगणाऱ्या वरून सरदेसाईंनी या आंदोलनात हिरो होण्याचा प्रयत्न केला होता. त्याच वेळी एका शिवसैनिकांना पोलिसांवर हल्ला केल्याच्या प्रकरणामध्ये पोलिसांनी करून घायाळ केलं होत आणि नंतर त्या व्यक्तीला लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आलं होत. त्यावेळेस सर्व गोष्टी ह्या व्हिडिओ मध्ये आणि वृत्तपत्रात देखील आल्या होत्या. तसेच त्यावेळी मुख्यमंत्री असलेल्या उद्धव ठाकरेंनी युवासेनेच्या कोर टीम ला बोलवून वर्षावर एक फोटो काढून सर्वांचो अभिनंतर केलं होत. तर त्यावेळी कॅमेरासमोर चमकायला युवासेनेचे युवसैनिक अगदी तत्पर होते. परंतु आता प्रत्यक्षात गोष्ट समोर आल्यानंतर त्यावेळी या केसेस घेण्याच्या प्रक्रियेत एकदा अपवाद वगळला तर कोणीही नाही आहे.

या सर्वांमध्ये शिवसेनेचे शाखा प्रमुख , पदाधिकारी आहेत आणि तसेच एकमेव नाव दिसून आलं ते म्हणजे अमेय घोलेच याच कारण म्हणजे ते शिंदे गटाच्या वाटेवर असल्याचं अशी चर्चा सुरु आहे त्यामुळेच यांचं नाव हे बहुदा टाकलं आहे असं दिसून येत आहे. तसेच त्यावेळी तुम्ही तुम्ही आंदोलन केलं आणि कॅमेरात चमकले परंतु केसेस घ्यायला घाबरायचं कशाला ? ज्यावेळी खऱ्या अर्थाने पोलिसांची कारवाई सुरु होते त्यावेळी हे शो सैनिक का घाबरत ?

मुंबईच्या पोलीस आयुक्तपदी विवेक फणसळकर नावाचे अत्यंत कठोर शिस्तीचे आणि वस्तुनिष्ठ तापासाठी माहिती असलेले असे अधिकारी आहे. कॅमेरा सोमर काही मंडळी दिसून येत आहे तर मग प्रथम दर्शनी अहवालमध्ये (FIR) आहे त्यामध्ये या शिवसैनिकांची नाव कशी आलीत हा प्रश्न सध्या उपस्थित होत आहे. त्या आंदोलनात जे अग्रभागी होते त्यांची नवे कुठे गेली आहेत असा प्रश्न सध्या उपस्थित होत आहे. जुहू पोलिसांनी किंवा मुंबईच्या पोलिसांनी जी नाव शिवसेनेच्या मंडळींनी दिली तीच नाव टाकून केसेस उभ्या केल्या आहेत का ? हाच मोठा प्रश्न इथे उपस्थित होत आहे.

मुंबई महानगर पालिकेच्या निवणुकीचे पडघम हे वाजू लागले आहेत येणार काळ हा शिवसैनिकांसाठी खूप कठीण आहे तर त्या दिवसांमध्ये फक्त फक्त शाखाप्रमुखानं, शिवसैनिकांना, फक्त गटप्रमुखानं अडकवण्यात पक्षातूनच ठरलं असेल तर पक्षाला संक्रमण काळातून बाहेर काढणं कठीण आहे. शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरे हे एकांड्या सारखे एकटे विरोधकांसमोर जात आहे हे अत्यंत कौतुकस्पद आहे. परंतु याच वेळी आदित्य ठाकरे हे पक्षपाती वागतात का ? हा देखील प्रश्न उपस्थित आहे . कारण येण्याऱ्या निवडणुकीत युवासेनेचे खूप मोठं प्राबल्य या निवडणुकींवर असणार आहे. त्या संताजीच हि सर्व मोर्चे बांधणी सुरु झाली आहे का ? मागील महानगर पालिकेत राहूल कनाल , आदित्य ठाकरे , वरून सरदेसाई यांनी सर्व सूत्र हि आपल्या हाती ठेवली होती. मग आता हीच मंडळी खऱ्या खुऱ्या शिवसैनिकांना अडचणीत आणतात का ? हा मोठा प्रश्न उपस्थित होत आहे . म्हणजेच उद्धव सेनेनला असं म्हणायचं का ? चमकायला शो सैनिक आणि मर खायला, केसेस घ्यायला शिवसैनिक. याच विचार उद्धव ठाकरे आणि मातोश्री यांनी केला नाही तर येणारी निवडणूक हि शिवसैनिकांना आहे त्यापेक्षा खूप जास्त कठीण जाऊ शकते.

हे ही वाचा:

राज ठाकरे हे २९ नोव्हेंबरला कोल्हापूरसह कोकणाच्या दौऱ्यावर; कार्यकर्त्यांकडून तयारीला सुरवात

नरेंद्र मोदी यांचा फोटो बॅनरवर लावल्यामुळे शिवसेनेचे आज मोठं नुकसान झालं; नितिन देशमुख

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version