spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

Exclusive : शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे कोणाचे ?

आज १७ नोव्हेंबर २०२२ म्हणजेच शिवसेना प्रमुख हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा स्मृतिदिन. आज शिवसेना प्रमुखांना आपल्यातून जाऊन १० वर्षे पूर्ण झाली आहेत. बाळासाहेब ठाकरे यांची १० वर्षांपूर्वी जेव्हा अंतयात्रा निघाली तेव्हा त्यांना निरोप देण्यासाठी महाराष्ट्रातून अनेक नागरिक हे आले होते. इतक्या मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रातून ३ अंतः यात्रा या निघाल्या.

आज १७ नोव्हेंबर २०२२ म्हणजेच शिवसेना प्रमुख हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा स्मृतिदिन. आज शिवसेना प्रमुखांना आपल्यातून जाऊन १० वर्षे पूर्ण झाली आहेत. बाळासाहेब ठाकरे यांची १० वर्षांपूर्वी जेव्हा अंतयात्रा निघाली तेव्हा त्यांना निरोप देण्यासाठी महाराष्ट्रातून अनेक नागरिक हे आले होते. इतक्या मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रातून ३ अंतः यात्रा या निघाल्या. त्यापैकीची सर्वात मोठी अंतयात्रा होती ती म्हणजे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची. त्यानंतरची सर्वावर मोठी अंतयात्रा होती ती स्वराज्याची गर्जना करणाऱ्या लोकमान्य बालगंगाधर टिळक यांची आणि त्यानंतर शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंची. आपल्यातील एक व्यक्ती गेली आहे, जनसामान्यांचा कोणी गेलं आहे अशी भावना त्या दिवशी सर्वांची झाली होती. परंतु आज जी परिस्थिती आहे किंवा आज जे काही चाललं आहे ते पाहिल्यानंतर शिवसेना प्रमुख किंवा प्रबोधनकार ठाकरे त्या दोघांनाही ते आवडले नसते.

राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल या स्मृतिस्थळावर जावून माथा टेकवण्याचे काम केले. तर आता त्यांनी काळ का केलं ? तर त्यांना शिवसेना प्रमुखांचे आशीर्वाद घ्यायचे होते शिवसेना प्रमुखांबरोबरची आपली बांधिलकी हि जपायची होती. इथे उद्धव ठाकरेंचं राजकारण आणि एकनाथ शिंदेचं राजकारण या दोन स्वतंत्र गोष्टी आहेत. पुढील भविष्यात काळाच्या ओघात हे दोघे कदाचित एकत्र येतीलही. परंतु या दोन्ही गटांच्या समर्थकांकडून जे काही घडत होते ते अत्यंत दुर्दैवी आहे. परंतु स्मृतिस्थळाच्या बाबतीत उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या शिवसैनिकांनी स्मृतिस्थळावर गोमुत्र शिंपडलं. प्रबोधनकार ठाकरेंचा वारसा सांगणारे उद्धव ठाकरे यांच्यासाठी हि गोष्ट अत्यंत दुर्दैवी होती. परंतु या सर्व परिस्थिती उद्धव ठाकरेंनी शिवसैनिकांची कां उघाडणी केली तर खऱ्या अर्थाने ते चालवण्याचे काम करतील.

शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना एखादी गोष्ट आवडली तर ते तोंड भरून गोड बोलायचे किंवा एखादी गोष्ट आवडली नाही तर तितक्याच ठाम पाने ते टीका देखील करायचे. उद्धव ठाकरेंनी आजच्या दिवशी हे सर्व करायला हवे होते परंतु त्यांनी ते केलं नाही. हि सर्व सुरुवात नारायण राणे स्मृती स्थळांवर नतमस्तक झाल्यानंतर झाली. राणे शिवसेनेतून बाहेर पडल्यानंतर अनेक राजकीय घडामोडी घडल्या त्याच्यानंतर ते केंद्रीय मंत्री झाल्यानंतर पहिल्यांदा स्मृती स्थळांवर गेले तेव्हा पहिल्यांदा स्मृतिस्थळांवर गोमूत्र शिंपडण्यात आले होते. तसेच अमित शहा हे स्मृतिस्थळांवर पोहचल्यानंतर देखील हाच सर्व प्रकार पुन्हा एकदा घडला होता. आता हीच चूक परत तिसऱ्यांदा झाली आहे. बाळासाहेबांची शिवसेना हे नाव एकनाथ शिंदेंना दिलेले आहे ते शिंदे काही शिंदे घराण्याचे मुख्यमंत्री नाही. ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत त्यामुळे एकनाथ शिंदेंनी देखील कारभार करताना त्यांनी देखील भान ठेवले पाहिजे कि ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत. आणि तसं ते ठेवतील याची देखील आपण अपेक्षा करू शकतो. पण दुसरीकडे बाळासाहेब ठाकरे हे उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे , संजय राऊत किंवा त्यांच्यावर श्रद्धा असणाऱ्या असिम माणसांचे नाही तर बाळासाहेब ठाकरे हे संपूर्ण राज्याचे, देशाचे आणि विश्वाचे आहेत. ते आपण मेनी करायला आहे. कारण शिवसेना प्रमुखांनी मराठी माणसाला स्वाभिमानाने जगायला शिकवलं. मग त्या शिवसेना प्रमुखांना गोमुत्र शिंपडून संकुचित करण्याचा अधिकार या शिवसैनिकांना दिला कोणी ?

हा सर्व प्रकार शिवसैनिक का करत आहेत तर , दादर, परळ आणि प्रभादेवी भागातील काही शिवसैनिक हे मुळात शिवसैनिक नसून शो सैनिक वाटतात. या सर्व गोष्टीना सदा सरवणकर देखील तितकेच जबाबदार आहेत. आता जर शिवसेना ठाम पणे मुंबईत उभी करायची असेल तर अश्या लोकांना खत पाणी घालण्याचे काम करू नये. असे का वाटत तर, राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे बालदिनानिम्मित परळच्या शिरोडकर शाळेत गेले होते. त्यावेळी एकनाथ शिंदेच्या वतीने त्या भागातील संघटक असलेल्या सुधीर साळवींना भेटण्याची इच्छा कदाचित मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली असेल. मुख्यमंत्र्यांच्या वतीने काही मंडळींनी सुधीर साळवींना संपर्क साधण्याचा प्रयत्न केला पण सुधीर साळवींनी अत्यंत विनम्रपणे मुख्यमंत्र्यांना एकांतात भेटण्यास नकार दिला. हि गोष्ट सांगण्याचा उद्देश म्हणजे म्हणजे या दोन वाट ज्यावेळी स्वतंत्र झाल्या आहेत त्यावेळी प्रत्येकाने दुसऱ्यांशी कसं वागायचं याशी आचारसंहिता आहे आणि हि दोघांनीही पाळली. त्यामुळे सुधीर साळवी सारख्या कट्टर शिवसैनिकांमुळे एकनाथ शिंदेंना अजून मुंबईत समर्थन मिळाले नाही. परंतु उद्धव ठाकरे भोवती असलेल्या नेत्यांचं किंवा मंडळीनींनी हे जे सर्व सुरु केलं आहे त्यामुळे सहानुभूती एकनाथ शिंदेंना मिळू शकते. आणि बाळासाहेबंकडे कट्टर आणि लाळघोटे असा तडा गेलेलादिसू शकतो. तो तडा जर जाऊ द्यायचा नसेल तर वेळीच उद्धव ठाकरेंना याची काळजी घ्यावी लागेल.

बाळासाहेबांचं स्मृतिस्थळ हे मुंबई महानगर पालिकांच्या जागेवर बनवण्यात आलं आहे. त्यासाठी १०-१२ चोरस मीटरची जागा मुंबई महानगर पालिकेने दिली आहे. तेथील प्रत्येक गोष्टीची काळजी हि मुंबई महानगर पालिका हि घेत असते. मग मुंबई महानगर पालिका हि कोणाची ? तर हि मुंबई महानगर पालिका आपल्या सर्वांच्या करातून बनलेली स्थानिक स्वराज्य संस्था आहे. या स्मृतिस्थळांच्या समोर राष्ट्रीय स्मारक बनवण्यात येत आहे आणी आज याबाबत बोलताना उद्धव ठाकरेंनी एक भुमिका मांडली कि या राष्ट्रीय स्मारकांवर कोणाचा तरी डोळा आहे. पण त्यासाठी पारदर्शकपणा त्या स्मारकाचं काम वेगानं होणं या गोष्टी देखील तितक्याच गरजेच्या आहेत. तसेच देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं कि या स्मारकांचा उपयोग व्यक्तिगत किंवा कुटुंबाच्या कार्यक्रमासाठी किंवा खाजगी कार्यक्रमांसाठी होऊ नये. तर बाळासाहेब ठाकरे हे राष्ट्रीय नेते आहेत. तर त्यांचं स्मारक बघताना प्रत्येकाला बाळासाहेब आपले आहेत असं वाटलं पाहिजे. परंतु दादर पर्ल भागातील जे संधी साडू शिवसैनिक आहेत त्यांनी उद्धव ठाकरेंना मान झुकायला लावली तर आहेच पण त्याच वेळी बाळासाहेब ठाकरे अंडी प्रबोधनकार ठाकरे याना देखील मान खाली घालायला लावली आहे. हे अत्यंत दुर्दैवी आहे. हे जर थांबवायचं असेल तर उद्धव ठाकरेंना मोठं काळीज करून आपल्या कवेत घ्यावं लागेल अन्यथा त्यांच्या अवतीभोवती असणारे लोक स्वतःच्या पदासाठी शिवसेना प्रमुखांच्या स्मारकांवर गोमूत्र शिंपडणार असतील तर ते मराठी माणसांसाठी आणि प्रत्येक हिंदूंसाठी एक दुर्दैवी गोष्ट ठरेल. हि दुर्दैवी गोष्ट ठरू नये याची खबरदारी उद्धव ठाकरे यांनाच घ्यावी लागेल.

हे ही वाचा :

Uddhav Thackeray Live : स्मारक ताब्यात घेण्याचं स्वप्न त्यांनी बघावं, मग पाहू – उद्धव ठाकरे

Hinduhridaysamrat Balasaheb Thackeray : ‘हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे दवाखान्यांचे’ मुख्यमंत्री यांच्या हस्ते लोकार्पण

Hinduhridaysamrat Balasaheb Thackeray : महाराष्ट्रातल्या राजकारणातील भगवं वादळ, बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिदिनानिमित्त खास फोटो

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss