spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

वादग्रस्त मोपलवारांचा आठव्यांदा कार्यकाळ वाढवून मिळवण्याचा प्रयत्न, दोन पदांसाठी धडपड

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या ‘वर्षा’निवासस्थानी स्थानापन्न झालेल्या गणरायाच्या दर्शनासाठी येणाऱ्या पाहुण्यांसाठी तीन दिवसीय स्नेहभोजन सोहळा आयोजित केला आहे. यात दुसऱ्या दिवशी राज्यातील आयएएस आणि आयपीएस अधिकाऱ्यांना निमंत्रित केले गेले. गणरायाच्या दर्शनाच्या निमित्ताने सनदी अधिकारी ,ज्येष्ठ पोलीस अधिकाऱ्यांमधील आणि वरिष्ठ संपादकांतील सुसंवाद वाढीला लागावा यासाठी मुख्यमंत्री शिंदे यांचे प्रयत्न सुरू असताना राधेश्याम मोपलवार यांच्या सारख्या वादग्रस्त अधिकाऱ्यांना निवृत्ती नंतरही फडणवीस- शिंदे ज्या स्वरूपाच्या पायघड्या घालू पहात आहेत त्यामुळे अश्या स्नेहभोजनांनी सरकार बद्दलचा स्नेह खरंच वाढणार का कि अडचणी वाढणार याची चर्चा वरिष्ठ अधिकाऱ्यांत ‘वर्षा’ वर बुधवारी रात्री सुरू होती. या ज्येष्ठ प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या निमंत्रितांच्या यादीत ‘वॅार रूम’चे प्रमुख असूनही मोपलवार यांना स्थान देण्यात आले नव्हते. त्यांना आठव्यांदा कार्यकाळ वाढवून देण्याबाबतच्या फाईलवर मुख्यमंत्री शिंदे यांनीबुधवारी मध्यरात्री पर्यंत स्वाक्षरी केली नव्हती. तशी स्वाक्षरी झाल्यास राधेशाम मोपलवार हे इतका वेळा कार्यकाळ वाढवून मिळणारे देशांतील पहिले उदाहरण असेल असे एका ज्येष्ठ सनदी अधिकाऱ्याने सांगितले.

राज्य सरकारच्या महाराष्ट्र राज्य रस्ते विकास मंहामंडळ (एमएसआरडीसी) चे व्यवस्थापकीय संचालक म्हणून राधेशाम मोपलवार फेब्रुवारी २०१८ मध्ये निवृत्त झाले. ते २००४ च्या तुकडीचेआयएएस अधिकारी आहेत. निवृत्तीनंतर त्यांना आतापर्यंत सात वेळा कार्यकाळ वाढवून देण्यात आला. एकनाथ शिंदे हे सार्वजनिक बांधकाम(उपक्रम वगळून) हेच एमएसआरडीसीचे प्रमुख होते. तेव्हा अनेकदा वेगवेगळ्या विषयांवरून मोपलवार – शिंदे यांच्यात खटके उडत असत. कारण आधी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, त्यानंतर मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांचे पाठबळ मोपलवार यांच्यापाठीशी होते. त्यामुळे आपल्या खात्याच्या मंत्र्यांपेक्षा मोपलवारांची आस्था लक्षवेधीरित्या मुख्यमंत्र्यांकडेच असते. तरीही मुंबई- नागपूर हिदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृध्दी महामार्ग चार वेळा तारखा देऊनही त्याचं उद्घाटन करता आलेले नाही. हा महत्वाकांक्षी महामार्ग अद्यापही पूर्ण होऊशकलेला नाही. यासाठी मात्र व्यवस्थापकीय संचालक मोपलवार हेच सर्वस्वी जबाबदार नाहीत तर त्याला अनेक प्रशासकीय घटक जबाबदार आहेत.

हेही वाचा : 

अहमदनगरमध्ये दहशतवादी हल्ल्याचा धोका निर्माण, शिर्डीत अचानक कलम १४४ लागू

कामाचा उरक असूनही मोपलवार यांचा खूपच वादग्रस्त अधिकाऱ्यांमध्ये समावेश होतो. २०१७ मध्ये विधानसभेच्या अधिवेशनातच तत्कालिन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना ६ महिनेसक्तीच्या रजेवर पाठवले होते. त्यासाठी मोपलवार यांची एक वादग्रस्त ॲाडिओ क्लीप वायरलहोऊन सरकारवर जोरदार टिका झाली होती. त्याच वादग्रस्त मोपलवार यांना एकनाथ शिंदे हेमुख्यमंत्री होताच मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयाच्या वॅार रूमचे महासंचालक बनवण्यात आले आहे. त्याआधी त्यांचे थेट मुख्यमंत्री कार्यालयात येण्याचे प्रयत्न सुरू होते. त्यावर माध्यमांमधून जोरदारटिका झाल्याने त्यात बदल करून त्यांना ‘वॅार रूम ‘मध्ये आणण्यात आले. मात्र राज्यसरकारने मान्यता दिलेल्या १४० पदांमध्ये मोपलवारांच्या महासंचालक या पदाचा समावेश नाही. अश्यातचत्यांना दिलेल्या सातव्या सेवाकाळची मुदत ३० ॲागस्टला संपली आहे.त्यामुळे मोपलवार पुन्हाएकदा आठव्यांदा कार्यकाळ वाढवून मिळवण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत.

वॅाररूमच्याजबाबदारीसह त्यांनी एमएसआरडीसीच्या प्रमुखपदाची सुत्रेही स्वतःलाच मिळवण्यासाठीहालचाली सुरू केल्या आहेत. वॅाररूम सोबतच एमएसआरडीची जबाबदारी ठेवण्याच्या मोपलवारयांच्या हालचाली मुख्यमंत्री शिंदे यांची डोकेदुखी वाढवू शकते. याबाबत एक निवृत्त मुख्य सचिवनाव न सांगण्याच्या अटीवर म्हणाले, नव्या मुख्यमंत्र्यांनी निवृत्त अधिकाऱ्यांकडे एकापेक्षा अधिक कार्यभार दिल्यास त्यातून सरकारी आस्थापनांचे इतर अधिकारी नाराज होऊन सरकारच्या कामाकाजावर त्याचा परिणाम होऊ शकतो. एका शक्तीशाली मुख्यसचिवांनी ठाकरे सरकारच्या काळात बांधकाम क्षेत्रातील एका नियामक मंडळांच्या प्रमुखाची जबाबदारी घेताना मुख्यमंत्रयांच्या प्रधान सल्लागार पदाची जबाबदारी सोडली होती याकडे या निवृत्त अधिकाऱ्याने लक्ष वेधले.

आंतरधर्मीय विवाह प्रकरणातील अमरावतीमधील पीडित युवती अखेर सापडली

राधेशाम मोपलवार यांच्या सर्वपक्षीय हितसंबंधांमुळे त्यांना मिळणाऱ्या झुकत्या मापांबद्दल प्रशासकीय अधिकारी खुलेपणाने विरोध करताना दिसत नाहीत. मात्र वॅाररूम मधील अधिकाऱ्यांनी काही दिवसांपूर्वीच मोपलवार यांच्या कार्यशैलीची आणि कार्यालयीन शिष्टचाराची तक्रारमुख्यमंत्र्यांकडे केली होती. मुख्यमंत्री कार्यालयाचे विद्यमान प्रधान सचिव भूषण गगराणीयांच्याकडे सिडकोचे प्रमुख असताना काही महिने एमएसआरडीसीचा कार्यभारही आला होता. तेव्हा मोपलवार यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आल्याच्या काळात त्यांचे वाद झाले होते. त्याच मोपलवार यांना आता पुन्हा वॅाररूमसह एमएसआरडीसीची जबाबदारी दिल्यास प्रशासकीयअधिकाऱ्यांच्या नाराजी बरोबरच मुख्यमंत्री – उपमुख्यमंत्र्यांना माध्यमांच्या टिकेलाही सामोरे जावे लागणार आहे.

दक्षिण भारतातील ओनम सणाच्या दिवशी, बळीराजा येतो प्रजेला भेटायला

याबाबत प्रतिक्रिया जाणून घेण्यासाठी मुख्यमंत्री शिंदे यांना संपर्क साधला असता पुण्याच्या दौऱ्यावर असल्याने फोन ऐकण्यात व्यत्यय येतोय. गणेशभक्तांची तुफान गर्दी आहे, मुख्यमंत्री मुंबईत आल्यावर बोलतील अशी माहिती त्यांच्या स्वीयसचिवांनी दिली.

Latest Posts

Don't Miss